-
भाऊ-बहिणीच्या नात्याचं, त्यांच्यातील प्रेमाचं प्रतीक म्हणजे रक्षाबंधनचा सण.
-
भारतीय संस्कृतीचे उत्तम दर्शन घडवणारा एक सण म्हणून रक्षाबंधनला ओळखले जाते.
-
श्रावणातील नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो.
-
रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताच्या मनगटावर राखी बांधते.
-
तसेच त्याला दीर्घ आयुष्य आणि सुख लाभू दे यासाठी प्रार्थना करते. तर त्याचवेळी भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.
-
अवघ्या दोन दिवसात २२ ऑगस्टला रक्षाबंधन साजरा केला जात आहे.
-
यंदाच्या वर्षी रक्षाबंधनाला बहिणींना राखी बांधण्यासाठी जास्त वेळ मिळणार आहे.
-
यंदा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त हा ११ तास १६ मिनिटे असणार आहे.
-
सकाळी ६.१५ पासून ते संध्याकाळी ५.३१ पर्यंत रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आहे.
-
रक्षाबंधनाच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ६ वाजून १५ मिनिटांपासून ते संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांपर्यंत असणार आहे.
-
राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त हा दुपारी १ वाजून ४२ मिनिटांपासून ते संध्याकाळी ४ वाजून १८ मिनिटांपर्यंत असेल. या वेळेत बहिणींना भावाला राखी बांधता येणार आहे.

Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार