-
रतन टाटा सिर्फ नाम ही काफी हैं अशी ओळख करुन देता येईल असं हे व्यक्तीमत्व.
-
रतन टाटा हे देशातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी आणि समाजसेवेसाठी काम करणाऱ्यांपैकी एक आहेत.
-
मात्र त्याचवेळी रतन टाटांनी अनेक स्टार्टअप कंपन्यांना गरजेच्या काळात आर्थिक पाठिंबा दिलाय.
-
त्यापैकी अनेक कंपन्या आज आपआपल्या क्षेत्रात फार नाव गाजवत आहेत.
-
या गॅलरीमधून आपण पाहूयात रतन टाटांनी स्टार्टअप म्हणून मदत केलेल्या काही कंपन्यांबद्दलची माहिती.
-
पेटीएम – देशातील आघाडीची डिजीटल ट्रानझॅक्शन कंपनी म्हणून पेटीएमला आज ओळखलं जातं.
-
अर्थात मागील काही वर्षांमध्ये या कंपनीशी स्पर्धा करणाऱ्या अनेक कंपन्या बाजारपेठेत आल्या मात्र पेटीएमने या विभागामध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे.
ओला – ऑनलाइन टॅक्सी बुकींग सेवा पुरवणारी ही कंपनी आज आपल्यापैकी अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झालीय. -
ही कंपनी २०१० मध्ये सुरु झाली. या कंपनीला २०१५ मध्ये रतन टाटांनी आर्थिक पाठबळ दिलं होतं. ही कंपनी सध्या उबर या कंपनीला जोरदार टक्कर देताना दिसतेय.
-
कायझुंगा > हा एक ऑनलाइन तिकिटींग प्लॅटफॉर्म आहे. यामध्येही टाटांनी गुंतवणूक केलीय.
-
आकाश भाटीया, अर्पिता मुझूमदार आणि निती भाटीया यांनी २००७ मध्ये या कंपनीची स्थापना केली.
-
लॅबर्टी > आरोग्य सेवेमध्ये काम करणाऱ्या स्टार्टअप कंपन्यांमध्ये या कंपनीचा समावेश होतो.
-
चांगल्या डॉक्टर्सपर्यंत पोहचण्यासाठी रुग्णांना या कंपनीने एक माध्यम उपलब्ध करुन दिलीय. ओला, झोमॅटो प्रमाणे या माध्यमाच्या मदतीने वैद्यकीय क्षेत्रातील सेवांचा फायदा ग्राहकांना घेता येतो. या कंपनीमध्येही टाटांनी आर्थिक गुंतवणूक केलीय.
-
फर्स्टक्राय > बेबी केअर प्रोडक्टच्या क्षेत्रात काम करणारी ही कंपनी खेळणीही बनवते. या कंपनीची ओळख म्हणजे त्यांच्याकडून देण्यात येणारी सूट.
-
फर्स्टक्राय ही कंपनी २०१० साली स्थापन झाली असून २०१६ मध्ये टाटांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक केली.
-
लेन्सकार्ट >> देशातील सर्वात मोठी ऑनलाइन ऑप्टीकल सेवा देणारी ही कंपनी २०१० मध्ये स्थापन झाली आहे.
-
लेन्सकार्ट ही या क्षेत्रातील मत्तेदारी असणारी कंपनी असून इतर कोणतीही कंपनी तिच्या आसपासही नाही. टाटांनी यामध्येही गुंतवणूक केलीय.
-
झिवामी > हे एक ऑनलाइन लिंगरीज स्टोअर आहे. २०११ साली रिचा कार हिने या कंपनीची सुरुवात केली.
-
२०१५ साली सप्टेंबर महिन्यात रतन टाटा यांनी या कंपनीला आर्थिक पाठबळ दिलं आणि नंतर कंपनीने देशभरामध्ये आपला उद्योग व्यवसाय वाढवला.
-
अर्बन लॅडर > ऑनलाइन माध्यमातून फर्निचर विकणारी ही कंपनी फर्निचर उद्योगामधील सध्या ओळखीचं नाव आहे.
-
२०१५ साली रतन टाटांनी या कंपनीमध्ये पैसे टाकले. मात्र त्यांनी नक्की किती निधी या कंपनीला दिला हे मात्र गुलदस्तामध्येच आहे.
-
कारदेखो > या कंपनीबद्दल टीव्ही पाहणाऱ्याने ऐकलं नाही असं होणार नाही. जुन्या नव्या गाड्यांचे विक्रेते आणि ग्राहक यांच्यासाठीच्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मपैकी हा एक आहे.
-
गाड्यांच्या सुट्या भागांपासून ते गाडी विकत घेण्याआधी त्यांची तुलना करण्यापर्यंत अनेक पर्याय या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून या कंपनीलाही टाटांनी आर्थिक पाठबळ दिलंय.
-
अर्बन क्लॅप > सर्व कामांसाठी एकच प्लॅटफॉर्म या तत्वावर काम करणारी ही कंपनी मेट्रो शहरांमध्ये वेगवेगळ्या सेवा पुरवण्यासाठी लोकप्रिय आहे.
-
अर्बन क्लॅपमध्ये २०१५ साली टाटांनी गुंतवणूक केलेली.
-
रिपोज एनर्जी > या इंधनाची होम डिलेव्हरी करणाऱ्या स्टार्टअप कंपनीची सह संस्थापिका अदिती भोसले-वाळुंज ही मराठमोळी तरुणी आहे.
-
टाटा ग्रुप्सचे सर्वेसर्वा असणाऱ्या रतन टाटा यांनी अदितीच्या या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. (सर्व फोटो संबंधित कंपन्यांच्या वेबसाईट, गुगल प्लेस्टोअर आणि सोशल मीडियावरुन साभार)
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती