-
आपल्या दैनंदिन आयुष्यातील अशा अनेक वस्तू असतात, ज्याचा आपण नेहमी वापर करतो. पण यातील काही गोष्टी आपल्या लक्षातही येत नाहीत.
-
आपण दररोज सकाळी उठल्यावर सर्वात आधी दात घासण्याचे काम करतो.
-
दात घासण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रश आणि टूथपेस्ट.
आपल्यातील अनेक जण ठराविक ब्रँडची टूथपेस्ट वापरतात. -
पण तुम्ही वापरत असलेल्या विविध कंपन्यांच्या टूथपेस्टवर सर्वात खालच्या बाजूला एक विशिष्ट रंग असतो.
-
हा रंग नेमका कशासाठी असतो? त्याचे महत्त्व काय? तो काय दर्शवतो? याची माहिती फार कमी लोकांना असते.
-
टूथपेस्टच्या खालच्या बाजूला लाल, निळा, हिरवा आणि काळा असे चार रंग असतात.
-
हे रंग त्या टूथपेस्टमध्ये रासायनिक पदार्थ आहेत की नाही याची माहिती देतात.
-
काळा रंग – टूथपेस्टच्या खालच्या बाजूला काळा रंग असेल तर तो अतिशय धोकादायक म्हणून ओळखला जातो. हा रंग असलेल्या टूथपेस्टमध्ये रासायनिक पदार्थ असतात.
-
त्यामुळे ही टूथपेस्ट खरेदी करतेवेळी थोडा विचार करावा.
-
लाल रंग – हा रंग असलेल्या टूथपेस्टमध्ये काळ्या रंगापेक्षा कमी प्रमाणात धोका असतो. कारण ही टूथपेस्ट रासायनिक पदार्थांबरोबरच नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन तयार केली जाते.
-
कारण ही टूथपेस्ट रासायनिक पदार्थांबरोबरच नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन तयार केली जाते.
-
निळा रंग – ही टूथपेस्ट पूर्णपणे नैसर्गिक वस्तूंचा वापर करुन तयार केलेली असून त्यासोबतच यात काही औषधी पदार्थांचाही वापर केलेला असतो.
-
त्यामुळे ही टूथपेस्ट आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. यामुळे अनेकजण टूथपेस्ट खरेदी करताना निळा रंग असलेली खरेदी करतात.
-
हिरवा रंग – या टूथपेस्टमध्ये फक्त नैसर्गिक पदार्थांचा वापर केलेला असतो. त्यामुळे ही टूथपेस्ट लहान मुलांसह वयस्कर व्यक्तींसाठी उपयोगी ठरते.

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीचं हिटमॅनकडून २ शब्दात कौतुक; रोहित शर्मा पोस्ट शेअर करत म्हणाला…