-
देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान डॉक्टर, पॅरामेडिक्स, पोलीस आणि अत्यावश्यक सेवांशी संबंधित इतर कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कलाकारांनी राजस्थानच्या बिकानेरमधील एका भिंतीवर भित्तिचित्र रंगवली. (Source: PTI)
-
चेन्नईमध्ये देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना करोनाव्हायरस साथीच्या पार्श्वभूमीवर जागरूकता निर्माण रस्त्यावर चित्र काढण्यात आली आहेत. या चित्रावरील संदेश वाचत लोकं जात आहेत. (Source: PTI)
-
इंग्लंडच्या ब्रिस्टलमध्ये करोनाव्हायरसच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन केलं आहे. बँक्सी गर्लच्या भित्तिचित्रावर फेस मास्क लावण्यात आला आहे. भित्तिचित्र डच चित्रकार जोहान्स वर्मियर यांच्या गर्ल विथ पर्ल इअरिंगपासून प्रेरणा घेत तयार केलं आहे. (Source: AP)
-
लॉस एंजेलिसमध्ये “कॅन्सल प्लॅन्स नॉट ह्यूमॅनिटी” असा संदेश देश भित्तिचित्र रेखाटण्यात आलं आहे. (Source: AP)
-
हंगेरीच्या बुडापेस्टमध्ये “घरी राहा आणि एकमेकांची काळजी घ्या” असा संदेश देणारं भित्तीचित्र रेखाटण्यात आलं आहे. (Source: AP)
-
माथरे रूट्स युथ ग्रुपचे भित्तिचित्र कलाकार ब्रायन मुसासिया वानंदे, नैरोबी, केनियाच्या माथारे झोपडपट्टी आणि वस्तीमध्ये चित्राच्या माध्यमातून जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. (Source: AP)
-
डेन्व्हरमध्ये करोनाबाबत जनजागृतीसाठी एका इमारतीवर परिचारिकेचं चित्र साकारण्यात आलं आहे. या चित्राची नागरिक प्रशंसा करत आहेत. (Source: AP)
-
अमेरिकेतील डलासमध्ये एका रुग्णालयाजवळील भिंतीवर चित्र साकारण्यात आलं आहे. परिचारिका पूर्ण शक्तिने रुग्णांची सेवा करत आहे, असा संदेश देण्यात आला आहे. (Source: AP)
-
पोलंडच्या वार्सामध्ये डॉक्टर आणि करोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला आहे. तसेच करोनाकाळात उपचार करताना मृत पावलेल्या करोना योद्ध्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. (Source: AP)
-
लंडनध्ये करोनाबाबतची जनजागृती करणारं भित्तिचित्र रेखाटण्यात आलं आहे. स्ट्रीट आर्टिस्ट लिओनेल स्टॅनहोप यांनी हे चित्र रेखाटत संदेश दिला आहे. (Source: AP)
-
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष करोनाकाळात वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले. त्याचं मास्क काढणारं चित्र रिओ डी जनेरियोमध्ये रेखाटण्यात आलं आहे. या चित्राजवळून नागरिक मास्क घालून जाताना दिसत आहेत. (Source: AP
-
सेनेगलच्या डाकार येथे करोना विषाणूबाबत जनजागृतीसाठी भित्तिचित्र रेखटली जात आहेत. RBS क्रू मधील ग्राफिटी कलाकार भित्तीचित्रांवर काम करत आहेत. (Source: Reuters)
-
स्कॉटलँडच्या स्ट्रीट ग्लासगोमध्ये पायात करोनारुपी राक्षसाच्या बेड्या घातलेलं चित्र रेखाटमअयात आलं आहे. हे चित्र रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. (Source: AP)

Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश