-
योगी आदित्यनाथ त्यांच्या जनता दरबार या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी थेट समोरासमोर येऊन संवाद साधतात.
-
अनेकजण मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्यासाठी मिळणाऱ्या या संधीचा फायदा घेत आपलं म्हणणं रोकठोकपणे मांडतात.
-
मात्र योगी यांच्या जनता दरबारमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वसामान्यांना काही नियमांचे पालन करावं लागतं.
-
यापैकी सर्वात महत्वाचा नियम म्हणजे या जनता दरबारमध्ये योगी आदित्यनाथ सहभागी झालेल्या तक्रारदाराच्या समोर येताच खुर्चीवर बसलेल्या त्या तक्रारदाराच्या मागून येऊन योगी यांचे सुरक्षारक्षक तक्रारदाराच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवतात.
-
पण योगींच्या जनता दरबारमध्ये हे असं का केलं जातं यामागील कारणही अगदी या कृतीप्रमाणेच हटके आहे. जाणून घेऊयात त्याचबद्दल…
-
सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा नियम महिला पुरुष सर्वांसाठीच लागू आहे.
-
महिला तक्रारदारांच्या खांद्यांवर महिला सुरक्षारक्षक हात ठेवतात तर पुरुषांच्या खांद्यांवर पुरुष सुरक्षारक्षक हात ठेवतात.
-
योगींच्या जनता दरबारमध्ये सहभागी होण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. म्हणजेच या जनता दरबारमध्ये किती लोक येऊ शकतात, हे लोक कोणत्या ठिकाणीवरुन येणार, कसे येणार, जनता दरबार कुठे भरवला जाणार हे सर्व आधीच निश्चित केलं जातं.
-
जनता दरबार कधी आणि कुठे भरवायचा, दिवसातील कोणत्या वेळी तो भरवायचा या संपूर्ण निर्णय हा योगीच घेतात.
-
दरबारदरम्यान ५० ते १०० लोकांना मुख्यमंत्री त्यांच्या घरी बोलवतात. अर्जाद्वारे या लोकांची निवड केली जाते.
-
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असणाऱ्या कार्यालयाकडे यासंदर्भातील अर्ज दाखल करावा लागतो.
-
अर्ज केल्यानंतर उत्तर प्रदेशमधील कानाकोपऱ्यामधून आलेल्या अर्जांची तातडीने प्रकरण सोडवण्यासंदर्भातील अग्रक्रमाने प्राधान्य दिलं जातं.
-
लोकांना कॉल करुन मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जनता दरबारमध्ये बोलवलं जातं.
-
जनता दरबारमध्ये येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी खुर्चा रांगेत ठेवलेल्या असतात. या खुर्च्यांवर हे लोक बसले की त्यांच्या मागे येऊन एक एक सुरक्षारक्षक उभा राहतो.
-
योगींना पुरवण्यात आलेल्या झेड प्लस सुरक्षेचा स्तर वाढवून सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफ कमांडोंची एक तुकडी तैनात केलीय. ही तुकडी कायम योगी यांच्यासोबत असते.
-
योगींच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या सीआयएसएफ कमांडोंच्या या तुकडीमध्ये किमान २५ कमांडो असतात. याच तुकडीतील लोक तक्रारदारांच्या खांद्यांवर हात ठेवतात.
-
योगी यांच्या सुरक्षेसाठी तक्रारदारांच्या खांद्यावर हात ठेवला जातो.
-
सुरक्षेसंदर्भात कोणताही चुकीचा प्रकार जनता दरबारदरम्यान घडू नये यासाठी ही विशेष सोय करण्यात आलीय.
-
मात्र एका मुलाखतीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी या कृतीमागील वेगळंच स्पष्टीकरण दिलं होतं.
-
वयस्कर व्यक्ती किंवा महिला आपल्या पाया पडू नये किंवा आपल्यासमोर हात जोडून याचना करु नये म्हणून सुरक्षारक्षक त्यांच्या खांद्यावर हात ठेवतात असं योगी म्हणाले होते.
-
भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना आईप्रमाणे आदर दिला जातो. त्यामुळेच मला त्यांनी माझ्यासमोर हात जोडणे किंवा पाया पडणं आवडत नाही, असं योगी म्हणाले होते.
-
माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव सुद्धा आपल्या कार्यकाळामध्ये दर महिन्याच्या शेवटच्या बुधवारी जनता दरबारच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवायचे. (सर्व फोटो सोशल नेटवर्किंग आणि एएनआयवरुन साभार)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”