-
केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रविवारी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली. या प्रकरणामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसहीत आठ जणांना एनसीबीने अटक केली होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्या क्रूझवर जाऊन तपासणी सुरु करत ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत.
-
धक्कादायक बाब म्हणजे मलिक यांनी आर्यन सोबत अटक करण्यात आलेल्या अरबाज मर्चंटला घेऊन जाणाऱ्या व्यक्ती या एनसीबीच्या अधिकाऱ्यांपैकी नसल्याचं म्हटलं आहे.
-
एएनआय या वृत्तसंस्थेच्या व्हिडीओमध्ये अरबाज मर्चंटला घेऊन जाणारी व्यक्ती ही केपी गोसावी आहे असं मलिक यांनी म्हटलं आहे.
-
याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रकरणातील लोकांना ताब्यात घेणाऱ्यांमध्ये असणाऱ्या एका व्यक्तीचं नाव मनिष भानुषाली असून तो भाजपाचा उपाध्यक्ष असल्याचं मलिक म्हणालेत.
-
मलिक यांनी या पत्रकार परिषदेमध्ये मनिष भानुषालीचे अनेक दिग्गज नेत्यांसोबत फोटो असल्याचं एक पीपीटीच सादर केलं आहे. पाहुयात राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषदेमध्ये सादर केलेल्या या पीपीटीमधील फोटो.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनिष भानुषाली यांचा हा फोटो राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेमध्ये शेअर करण्यात आलाय.
-
मोदींच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोहतही मनिष भानुशाली यांचा फोटो आहे.
-
ही पाहा राष्ट्रवादीने शेअर केलेल्या पीपीटीमधील मोदी आणि शाह यांच्यासोबत भानुशाली यांच्या फोटोंची स्लाइड.
-
मनिष भानुशाली हे एकदा नाही तर अनेकदा अमित शाह यांना भेटल्याचं फोटोंवरुन दिसून येत आहे.
-
भानुशाली यांनी मोदींचीही अनेकदा भेट घेतलीय, असं फोटोंवरुन स्पष्ट होतंय.
-
राष्ट्रवादीनेच हे फोटो प्रसारमामध्यमांसोबत शेअर केलेत.
-
मनिष भानुषालीचे मोदींसोबतचे एकूण चार फोटो या पीपीटीमध्ये आहेत.
-
मोदींच्या वाढदिवसानिमित्त मनिष भानुषालीने केलेल्या फेसबुक पोस्टचेही स्क्रीनशॉर्ट शेअर करण्यात आलेत.
-
मोदींची किमान चार वेळा तरी भानुशाली यांनी भेट घेतल्याचं या पीपीटीमधून स्पष्ट होतंय.
-
सध्या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या जे.पी. नड्डांसोबत भानुशाली यांनी काढलेला फोटोही या पीपीटीत देण्यात आलाय.
-
नुकतेच केंद्रीय मंत्री झालेल्या नारायण राणेंसोबत भानुशाली यांचा हा फोटोही पीपीटीमध्ये आहे.
-
ही पाहा पीपीटीमधील ती स्लाइड ज्यात भानुशाली भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत दिसत आहे.
-
केंद्रात मंत्री असणाऱ्या रावसाहेब दानवेंसोबत मनिष भानुषाली.
-
विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मनिष भानुषाली.
-
राष्ट्रवादीने शेअर केलेल्या पीटीटीमधील या फोटोंचा स्क्रीनशॉर्ट
-
भाजपा आमदार आशिष शेलार यांच्यासोबत मनिष भानुषाली.
-
मनिष भानुषालीने मोदींप्रमाणेच फडणवीस यांचीही अनेकदा भेट घेतल्याचं फोटोंमधून स्पष्ट होतंय.
-
हे फोटो राष्ट्रवादीने शेअर केलेल्या पीपीटीमधील आहेत.
-
डोंबिवलीचे भाजपा आमदार रविंद्र चव्हाणांसोहबत भानुशाली यांचा हा फोटोही पीपीटीत आहे.
-
गुजरातमधील भाजपा नेत्यासोबत मनिष भानुषाली.
-
हे फोटोसुद्धा पीपीटीमध्येच आहेत.
-
भाजपाच्या अनेक नेत्यांसोबत भानुशालीचे फोटो आहेत.
-
हा भानुशालीच्या फेसबुक प्रोफाइलचा स्क्रीनशॉर्टही राष्ट्रवादीने शेअर केलाय. यात भाजपासंदर्भातील स्पष्ट उल्लेख दिसून येतोय.
-
भानुषालीच्या फेसबुकवरुन गुजरात कनेक्शन दिसून येत असल्याकडेही राष्ट्रवादीने लक्ष वेधलं आहे.
-
भाजपाचा झेडा घेऊन जल्लोष करताना मनिष भानुषाली.
-
मनिष भानुषालीचे भाजपा कनेक्शन दाखवणारे हे सर्व फोटो राष्ट्रवादीने समोर आणलेत.
-
आर्यन सोबत फोटो व्हायरल झालेल्या व्यक्तीचं नाव नाव केपी गोसावी असं आहे.
-
केपी गोसावीचा भाजपाशी काहीही संबंध नसल्याचं त्याच्या फेसबुक प्रोफाइल इन्फॉर्मेशनवरुन तरी दिसून येतं आहे. (सर्व फोटो राष्ट्रवादीच्या सौजन्याने)
US Illegal Immigrants: भारतीय नागरिकांना साखळदंड बांधून अमेरिकेतून पाठवलं? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?