-
देशातील श्रीमंतांच्या ‘फोर्ब्स’ नियतकालिकाकडून जाहीर क्रमवारीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांनी अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
-
४ अब्ज डॉलर वाढीसह अंबानी यांची एकूण संपत्ती ९२.७ अब्ज डॉलरवर गेली आहे.
-
अंबानी हे सातत्याने या यादीमध्ये झळकताना दिसत आहेत.
-
अंबानी हे सलग १४ व्या वर्षी श्रीमंत भारतीयांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत.
-
गुरुवारी म्हणजेच ७ ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर झालेल्या ‘फोर्ब्स’च्या यादीनुसार, देशातील पहिल्या १०० श्रीमंत भारतीयांची एकत्रित संपत्ती ७७५ अब्ज डॉलरच्या घरात जाणारी आहे.
-
सरलेल्या वर्षात (२०२०) त्यांच्या संपत्तीत ५० टक्क्यांची म्हणजे २५७ अब्ज डॉलरची भर पडली.
-
टाळेबंदीमुळे हजारो लोकांचे रोजगार बुडाले, तर बहुतांशांचे उत्पन्न घटले, मात्र याच काळात देशातील श्रीमंतांनी भरभराट अनुभवली.
-
अंबानी हे केवळ भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत नाहीयत तर आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतही त्यांचा समावेश आहे.
-
अंबानींपाठोपाठ श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर अदानी समूहाचे गौतम अदानी आहेत.
-
अदानी समूहाचे गौतम अदानी यांची संपत्ती ७४.८ अब्ज डॉलर इतकी आहे.
-
गेल्यावर्षी अदानींच्या संपत्तीत तिप्पट वाढ झाली आहे.
-
अदानींच्या संपत्तीत २०२१ मध्ये ४९.५ अब्ज डॉलरची भर पडली.
-
जानेवारीपासून सुमारे २१ टक्के वाढ राखणाऱ्या भांडवली बाजारात समूहाच्या वधारत्या समभाग मूल्यानेही अदानींच्या वाढत्या संपत्तीत सिंहाचा वाटा राखल्याचे ‘फोर्ब्स’ने नमूद केले आहे.
-
मध्यंतरी अदानी यांच्या शेअर्सला चांगलाच फटका बसला होता. मात्र त्याच वेगाने ही कंपनी या आर्थिक फटक्यामधून सावरल्याचं दिसून आलं.
-
२०२० मध्ये अंबानी आणि अदानी यांच्या संपत्तीत ६३.५ अब्ज डॉलरचे अंतर होते ते आता कमी होऊन १७.९ अब्ज डॉलर इतके राहिले आहे.
-
तिसरे स्थान ‘एचसीएल टेक्नॉलॉजीज’चे अध्यक्ष शिव नाडर यांनी पटकावले आहे.
-
शिव नाडर यांची संपत्ती ३१ अब्ज डॉलर इतकी आहे.
-
‘डी-मार्ट’ किराणा दालने चालवणाऱ्या ‘अॅव्हेन्यू सुपरमार्ट’चे संस्थापक राधाकृष्ण दमानी यांनी श्रीमंतांच्या यादीत चौथे स्थान मिळविले.
-
दमानी यांची संपत्तीही २०२० मध्ये १५.४ अब्ज डॉलरवरुन जवळपास दुप्पट २९.४ अब्ज डॉलर झाली आहे.
-
पाचव्या स्थानी ‘सीरम इन्स्टिट्यूट’चे मालक सायरस पूनावाला यांचा समावेश आहे.
-
पूनावाला यांची संपत्ती ११.४ अब्ज डॉलरवरुन वाढत २०२१ मध्ये १९ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
-
आर्सेलर मित्तलचे लक्ष्मी मित्तल १८.८ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सहाव्या स्थानी आहेत.
-
त्यापाठोपाठ सावित्री जिंदाल १८ अब्ज डॉलरसह सातव्या स्थानी आहेत.
-
सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत.
-
श्रीमंत भारतीयांच्या यादीत उदय कोटक आठव्या स्थानी आहेत.
-
उदय कोटक यांची संपत्ती १६.५ अब्ज डॉलर्स इतकी आहे.
-
नवव्या स्थानी ‘शापूरजी पालनजी’चे पालनजी मिस्त्री यांचा क्रमांक लागतो.
-
पालनजी मिस्त्री यांची संपत्ती १६.४ अब्ज डॉलर इतकी आहे.
-
कुमार मंगलम बिर्ला गेल्या वर्षीच्या १४ व्या स्थानावरुन श्रीमंतांच्या यादीत १० व्या स्थानावर पोहचेले आहेत.
-
कुमार मंगलम बिर्लांची निव्वळ संपत्ती ७.३ अब्ज डॉलरवरुन वाढून १५.८ अब्ज डॉलरवर पोहोचलीय.
-
या यादीमध्ये सहा नवश्रीमंतांची भर पडली आहे.
-
‘क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी’चे अशोक बूब हे २.३ अब्ज डॉलरसहीत ९३ व्या स्थानी आहेत.
-
‘दीपक नाइट्राइड’चे दीपक मेहता हे २.०५ अब्ज डॉलरसहीत ९५ व्या स्थानी आहेत.
-
‘अल्काईल अमाईन्स केमिकल्स’चे योगेश कोठारी हे १.९४ अब्ज डॉलरच्या संपत्ती सहीत ९५ व्या स्थानी आहेत.
-
तरुण अब्जाधीशांमध्ये ‘बायजू’चे दिव्या गोकुलनाथ हे ४.०७ अब्ज डॉलरसहीत ४७ व्या स्थानी आहेत.
-
तसेच ‘झीरोदा ब्रोकिंग’चे निखिल कामथ हे सुद्धा २.५९ अब्ज डॉलरच्या संपत्तीसहीत या यादीत आहेत.
-
निखिल कामथ या यादीमध्ये ८६ व्या स्थानी आहेत.
-
दिव्या आणि निखिल दोन्ही अब्जाधीश अवघ्या ३५ वर्षांचे आहेत.
-
फोर्ब्सने जाहीर केलेली ही श्रीमंतांची यादी सध्या उद्योग विश्वात चांगलीच चर्चेत आहे. (सर्व फोटो रॉयटर्स, पीटीआय, एएनआय, एपी, सोशल नेटवर्किंग आणि संबंधित कंपन्यांच्या वेबसाईटवरुन साभार)

Aajche Rashi Bhavishya : चार चौघात सन्मान ते प्रचंड धनलाभ; तुमच्या राशीसाठी शिवयोग ठरणार का शुभ? वाचा राशिभविष्य