-
भाजपाचे नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या रोकठोक बोलण्याबरोबरच स्टाइलसाठीही ओळखले जातात.
-
उदयनराजेंना गाड्यांचीही फार आवड असून ते अनेकदा चारचाकी गाड्या तसेच बाईक चालवण्याचा आनंद घेताना दिसतात.
-
उदयनराजेंकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. त्यातच आता नवीन सदस्याची भर पडली आहे.
-
सोशल नेटवर्किंगवर सध्या उदयनराजेंच्या ताफ्यातील या नवीन पाहुणीची चांगलीच चर्चा असून तिचे फोटो व्हायरल झालेत.
-
उदयनराजेंनी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर घेतलेली ही आलिशान गाडी बीएमडब्ल्यू कंपनीची आहे.
-
उदयनराजेंच्या गाड्यांची खासियत म्हणजे त्यांच्या सर्व गाड्यांचे क्रमांक हे ००७ आहेत. उदयनराजेंचे अनेक समर्थक आवर्जून त्यांची ही नंबरची स्टाइल फॉलो करताना दिसतात.
-
उदयनराजेंनी घेतलेल्या बीएमडब्ल्यू गाडीचा क्रमांक एमएच ११ डीडी ००७ असा आहे.
पुण्यामधील बीएमडब्ल्यू बावरीया मोटर्स या शो रुममधून घेतली असून त्यांनीही फोटो शेअर केले आहेत. -
उदयनराजेंनी घेतलेली गाडी बीएमडब्ल्यू एक्स सीरीजमधील आहे. ही गाडी बीएमडब्ल्यू एक्स फाइव्ह आहे.
-
उदयनराजेंकडे सध्या ऑडी, मर्सिडिज बेन्झ, एण्डेव्हर, मारुती जिप्सी अशा चार आलिशान गाड्या आहेत.
-
उदयनराजेंची पत्नी दमयंतीराजे यांच्याकडे पोलो ही आलिशान कार आहे.
-
उदयनराजेंनी घेतलेल्या या गाड्यांची किंमत एक कोटी रुपये इतकी आहे. (फोटो सौजन्य सोशल नेटवर्किंगवरुन साभार)
“आमची मान शरमेने खाली…”, तनिशा भिसेंच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय; यापुढे डिपॉझिट…