-
गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि दलाल स्ट्रीटचे तसेच भारताचे ‘वॉरेन बफेट’ म्हणून ओळखले जाणारे ३४,३८७ कोटींचे मालक राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी ५ ऑक्टोबर २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच झुनझुनवालांसोबतचा एक खास फोटो शेअर केल्याने या भेटीची प्रसारमाध्यमांबरोबरच सोशल नेटवर्किंगवरही फारच चर्चा रंगल्याचं पहायला मिळालं.
-
राकेश झुनझुनवाला यांना भेटून फार आनंद झाला. ते फार बोलते, माहितीपूर्ण आणि भारताबद्दल हीरहिरीने बोलणारे असल्याचं मोदींनी त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलं होतं.
-
मात्र ही भेट नक्की कशासाठी झाली होती आणि या भेटीत काय काय चर्चा झाली याबद्दल झुनझुनवाला यांनी खुलासा केलाय.
-
नुकत्याच पार पडलेल्या इंडिया टुडेच्या कॉनक्लेव्ह २०२१ या कार्यक्रमामध्ये झुनझुनवाला सहभागी झाले होते. तेव्हा त्यांनी या भेटीबद्दलचा खुलासा केला.
-
मोदींना भेटण्याआधी झुनझुनवाला हे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनाही भेटले होते. या भेटीचा फोटो निर्मला यांच्या कार्यालयाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेला.
-
राकेश झुनझुनवाला हे दिल्लीत दिसणं तसं दुर्मिळ आहे, असं म्हणत पत्रकार राहुल कनवालने झुनझुनवाला यांना या भेटीसंदर्भात प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
-
आधी तुम्ही अर्थमंत्र्यांना भेटले नंतर तुम्ही पंतप्रधानांची भेट घेतली. त्यांनी तुम्हाला का बोलवलं हा प्रश्न बाजूला ठेऊयात. पण तुम्ही मोदींना आणि मोदींनी तुम्हाला काय सांगितलं?, असा थेट प्रश्न राहुलने विचारला.
-
“मी मधूचंद्राच्या दिवशी माझ्या पत्नीशी काय बोलणं झालं हे तुम्हाला सांगणार आहे का?, असा उपरोधिक प्रश्न झुनझुनवाला यांनी राहुल यांना विचारला.
-
झुनझुनवाला यांनी प्रश्नाला उत्तर म्हणून हा मजेदार प्रश्न विचारल्याने अनेकजण हसू लागले.
-
“ती एक हायफ्रोफाइल मिटींग होती. एक गोष्ट लक्षात घ्या की त्यांनी फोटो ट्विट केलाय,” असंही झुनझुनवाला या बैठकीबद्दल बोलताना म्हणाले.
-
“माझ्याकडे त्या भेटीचे फोटोही नाहीयत. मला तर फोनही घेऊन जायला परवानगी नव्हती,” असंही झुनझुनवाला म्हणालेत.
-
“त्यामुळे मला फोटो काढण्याची संधीच नव्हती. समोरची व्यक्ती पंतप्रधान आहे ऐवढाच विचार माझ्या डोक्यात होता,” असंही त्यांनी सांगितलं.
-
“मी भाजपा समर्थक आहे. मी मोदी समर्थक आहे,” असंही झुनझुनवाला म्हणाले.
-
तसेच झुनझुनवाला यांनी भारतीय अर्थव्यवस्था भरारी घेईल असं मला वाटतंय, असंही मत व्यक्त केलं.
-
तर याचबद्दल मी प्रेझेन्टेशन दिलं की मला असं का वाटतंय. मी त्यांना समर्थन का देतो हे ही त्यांच्या कानावर घातल्याचं झुनझुनवाला यांनी स्पष्ट केलं.
-
“पंतप्रधान मला का भेटले हे तुम्ही त्यांना विचारा,” असं झुनझुनवाला यांनी याचसंदर्भातील प्रश्नावर बोलताना आधी म्हटलं होतं.
-
मला ठाऊक नाही की ते मला का भेटले, असंही यावेळी बोलताना झुनझुनवाला म्हणाले. (सर्व फोटो सोशल नेटवर्किंग, ट्विटर, पीटीआय, रॉयटर्स आणि एपीवरुन साभार)

IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?