-
पंतप्रधान मोदी ‘जी२०’ परिषदेसाठी इटलीच्या दौऱ्यावर आहेत.
-
२९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मोदी इटलीला रवाना झाले.
-
या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हेही आहेत.
-
मोदी ग्लासगो येथे रविवारपासून सुरू होणाऱ्या हवामान परिषदेसाठीही उपस्थित राहणार आहेत.
-
जवळजवळ नऊ तासाच्या प्रवासानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी२० देशांच्या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी रोममध्ये दाखल झाले.
-
मोदींना भेटण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी आणि भारतीयांनी मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळालं.
-
मोदींनीही परदेशातील या भारतीयांची निराशा केली नाही आणि हसत हसत त्याचं स्वागत स्वीकारलं.
-
जागतिक अर्थव्यवस्था आणि आरोग्य या विषयावरील या परिषदेच्या पहिल्या सत्रात मोदी भाग घेणार आहेत.
-
परिषदस्थळी इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांनी मोदी यांचे स्वागत केले.
-
मोदींना खास गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
-
पीएमओ आणि पंतप्रधान मोदींच्या ट्विटर हॅण्डलवरुन हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
-
मोदींनी २९ तारखेला सर्वात आधी युरोपीयन महासंघाच्या प्रमुखांची भेट घेतली.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हॅटिकन सिटी येथे रोमन कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली आणि त्यांना भारतभेटीचे आमंत्रण दिले.
-
पोप हे रोमन कॅथलिक या जगातील सर्वात मोठ्या धर्मपंथाचे सर्वोच्च धर्मगुरू आहेत. मोदी हे पोप यांची भेट घेणारे भारताचे पाचवे पंतप्रधान आहेत.
-
मोदींपूर्वी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, आय. के. गुजराल आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी ते पंतप्रधानपदी असताना पोप यांची व्हॅटिकन येथे भेट घेतली होती.
-
पोप यांच्याशी करोना विषाणू साथ आणि हवामान बदलामुळे निर्माण झालेली आव्हाने यांसह विविध विषयांवर चर्चा झाल्याचे ट्वीट मोदी यांनी भेटीनंतर केले. पोप यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. आमची ही भेट अतिशय सौहार्दपूर्ण होती. मी त्यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले, असे मोदी यांनी म्हटले आहे.
-
त्यानंतर जी २० देशांच्या अनेक नेत्यांची मोदींनी भेट घेतली. या भेटीचे काही खास फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आलेत.
-
अनेक नेत्यांनी भारतीय परंपरेनुसार नमस्कार करत वाकून मोदींचं स्वागत केलं.
-
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदो यांच्यासोबत चर्चा करताना पंतप्रधान मोदी.
-
सिंगापूरचे पंतप्रधान ली सियान लुंग यांनीही मोदींचे अशाप्रकारे नमस्कार करत स्वागत केलं.
-
भारत आणि सिंगापूरमधील द्वपक्षीय संबंध सुदृढ करण्यासंदर्भात मी पंतप्रधान ली सियान लुंग यांच्यासोबत चर्चा केल्याचं मोदींनी ट्विटर हॅण्डलवरुन फोटो ट्विट करत म्हटलं आहे.
-
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचीही मोदींनी गळाभेट घेतली.
-
इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी हिंदीमधून ट्विट करत दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील असं म्हटलं आहे.
-
जी २० देशांच्या परिषदेमध्ये मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांसोबत अनेक बड्या नेत्यांची भेट घेतली.
-
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा हा फोटो फारच व्हायरल होत असून दोघेही अगदी उत्हासाने चर्चा करताना दिसतायत. यावेळी बायडन यांनी एखाद्या जवळच्या मित्राच्या खांद्यावर हात ठेवतो त्याप्रमाणे मोदींच्या खांद्यावर हात ठेवल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे.
-
जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्केल आणि पंतप्रधान मोदी संवाद साधताना
-
अनेक नेते मोदींशी अगदी आपुलकीने आणि सविस्तर बोलत असल्याचं फोटोंमधून दिसून आलं.
-
पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी तर मोदींना सलाम केल्याचं सांगत जी २० परिषदेतील हा फोटो व्हायरल होतोय.
-
मोदींनी वेगवेगळ्या विषयांवर या नेत्यांशी चर्चा करत भारतासोबतचे या देशांचे संबंध अधिक घनिष्ठ होण्यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात भाष्य केल्याची माहिती देण्यात आलीय.
-
जी २० च्या नेत्यांचं खास फोटो सेशनही यावेळी पार पडलं. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)
IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?