-
दरवर्षी दिवाळी आली की आवर्जून आठवते ती जाहिरात म्हणजे मोती साबणाची जाहिरात.
-
‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’ हे वाक्य आणि दिवाळी हे जसं काही समीकरणचं झालं आहे.
-
‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’, या जाहिरातीतून ‘अलार्म काका’ म्हणून घरोघरी पोहचलेले आजोबा महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये ओळखीचा चेहरा झालाय.
-
मात्र यंदाची दिवाळीला हे आजोबा आपल्या सोबत नाही.
-
मोती साबणाच्या जाहिरातीमध्ये दिसणारे आजोबा म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर याच वर्षी २१ सप्टेंबर रोजी निधन झाले.
-
वयाच्या ९६ व्या वर्षी विद्याधर करमरकर यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटांत काम केले होते.
-
विलेपार्ले येथे राहणाऱ्या करमरकरांनी नोकरी सांभाळून आपल्या अभिनयाची आवड जोपासली होती.
-
ते जाहिरात आणि चित्रपटामध्येही अनेक छोट्य़ा छोट्या भूमिकांच्या माध्यमातून अभिनय करायचे.
-
‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘सास बहू और सेन्सेक्स’ आदी हिंदी चित्रपटांतून त्यांनी काम केले होते.
-
याचबरोबर ‘गेम विथ अनुपम खेर’, ‘दोस्ती यारीयां मनमर्जिया’, ‘लंच बॉक्स’, ‘एक थी डायन’, ‘एक व्हिलन’ यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.
वडिलांच्या किंवा आजोबांच्या छोटेखानी भूमिकांमधून ते अनेकदा समोर आले. -
मराठी – हिंदी चित्रपटांबरोबरच ‘इंडियन ऑइल’, ‘पेप्सीगोल्ड’, ‘हेन्ज टोमॅटो केचप’च्या जाहिरातींमध्ये ते झळकले होते.
-
तसेच ‘लिनोवो कॉम्प्युटर्स’, ‘एशियन पेंट’ यासारख्या कंपन्यांच्या जाहिरातींतूनही त्यांनी काम केले होते.
-
मात्र त्यांची मोती साबणाची जाहिरात प्रचंड गाजली होती.
-
यापुढील प्रत्येक दिवाळीला ही जाहिरात दिसेल तेव्हा या आजोबांची आठवण नव्याने ताजी झाल्याशिवाय राहणार नाही. (सर्व फोटो सोशल नेटवर्किंग आणि युट्यूबवरुन साभार)
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल