-
दिवाळी.. वर्षांतला मोठा सण, ज्याची आतुरतेने वाट पाहिली जाते.
-
आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे दिवाळी.
-
महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबाची एक वेगळी ओळख आहे.
-
दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र जमले आहेत.
-
पवार कुटुंबाने दिवाळीतील महत्वाचे पर्व असणारा पाडव्याचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला.
-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
-
शरद पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी पवार कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र जमले होते.
-
दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी राज्यातील अनेक कार्यकर्ते पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी बारामतीला येत असतात.
-
दिवाळी पाडव्याला हितचिंतकांच्या स्नेहभेटी होतात.
-
पण, करोनाच्या संकटामुळे गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.
-
भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची वीण अधिक घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज…
-
या सणाच्या निमित्ताने पवार कुटुंबीयांनी एकत्रित येऊन उत्साहाने हा सण साजरा केला.
-
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या बहिणींनी औक्षण केले.
-
पवार कुटुंबात शरद पवार, अजित पवार आणि रोहित पवार यांना घरातील सदस्य ओवाळताना दिसत आहेत.
-
सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना ओवाळतानाचाही व्हिडीओ शेअर केलाय.
-
पवार कुटुंबीयांचा हा आनंदमय सोहळा खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केला.
-
सध्या हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुप्रिया सुळे / इन्स्टाग्राम)

Amol Kolhe: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हे यांचे धक्कादायक विधान; शरद पवारांच्या सूचनेबाबत म्हणाले…