-
हे फोटोज पाहून सुरूवातीला तुम्हाला काश्मीरमधलं सौंदर्य आहे, असा भास होईल… पण थोडं थांबा…हे काश्मीर नव्हे तर दिल्ली आहे…सध्या हे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागले आहेत. या फोटोजवरून सोशल मीडियावर नेटिझन्सनी वेगवेगळे मीम्स देखील शेअर केले आहेत. नक्की काय आहेत हे फोटो, जाणून घेऊयात…(Photo: ANI)
-
देशाची राजधानी दिल्ली नुकतंच छठ पुजा मोठ्या उत्साहात पार पडली. यादरम्यानचे हे फोटोज समोर आले आहेत. हे फोटोज दिल्लीतल्या यमुना नदीचे आहेत. ……(Photo: ANI)
-
या फोटोंमध्ये दिसत असलेले ढग हे ढग नसून तो आहे विषारी रसायनाचा फेस. आणि जिथे या महिला उभ्या आहेत, ती आहे तमाम भारतीयांसाठी पवित्र असं स्थान असलेली यमुना नदी! ……(Photo: ANI)
-
या फोटोजना पाहून कुणी ‘यमुना नदीत बर्फ’ जमल्याचं सांगत आहेत, तर कुणी याला ‘फ्री बबल बाथ’ म्हणतंय. कुणी हे फोटोज शेअर करत ‘अंटार्कटिका आहे की काश्मीर’ असा प्रश्न विचारत आहेत. ……(Photo: ANI)
-
या फोटोमध्ये महिला हातात पूजेची थाळी घेऊन ढगात उभ्या असल्यासारख्या दिसत आहेत. सर्वत्र सफेद ढग आणि त्यात या महिला! पूर्वीच्या महाभारत मालिकेमध्ये देवलोकातील मंडळी जशी ढगातून प्रकट व्हायची, तशाच प्रकारे या महिला देखील थेट ढगातूनच प्रकट होऊन पूजा करत आहेत असंच वाटतंय. ……(Photo: ANI)
-
यमुना नदीचे असे फोटोज व्हायरल होण्याची ही काही पहिली वेळ नाही. दरवर्षी यमुना नदीवल असं दृश्य पहायलं मिळतं आणि त्याचे फोटोज याआधीच बऱ्याचदा व्हायरल झाले आहेत. ……(Photo: ANI)
-
खरं यमुना नदीत हे जमा झालेले बर्फ नाहीत तर, वायुप्रदूषणासोबतच जलप्रदूषणामुळे यमुना नदीच्या पाण्यावर हे विषारी फेस तयार झालाय. याचाच तवंग दिसून येतोय. (Photo: PTI)
-
यमुना नदीतल्या पाण्यात अमोनियाची पातळी वाढली आहे. त्यामुळे असा फेस तयार झाला आहे. अमोनियाची पातळी वाढल्यानं पाणीपुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. ……(Photo: ANI)
-
दूरवरुन बघितले तर हे तुकडे जणू यमुनेत पांढरे ढग खाली उतरल्यासारखे वाटतात. तिथल्या नागरिकांनी ही दृश्यं कॅमेऱ्यात कैद केली आहेत. हा वाढणारा फेस कोरोना काळात चिंता वाढवणारा आहे. बिहार आणि दिल्लीकरांसाठी ही धोक्याची घंटाच म्हणायला हवी. ……(Photo: ANI)

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन