-
महागाईमुळे देशामधील सर्वसामान्य जनता त्रासलेली आहे.
-
खास करुन पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत आहे.
-
असं असतानाच दिवाळीदरम्यान केंद्र सरकारने पेट्रोलचे दर प्रती लिटरमागे ५ रुपयांनी आणि डिझेलचे दर प्रति लिटरमागे १० रुपयांनी कमी करुन सर्वसामान्यांना थोडासा दिलासा दिला.
-
मात्र त्यानंतरही भारतामधील इंधनाचे दर हे शेजारच्या नेपाळपेक्षा अधिकच आहेत.
-
त्यामुळेच बिहार आणि नेपाळच्या सीमाभागांमधील अनेकजण थेट शेजारच्या देशात जाऊन पेट्रोल भरुन येत आहेत.
-
नेपाळमध्ये भारतापेक्षा पेट्रोल आणि डिझेलचे दर हे फारच कमी आहेत. भारतामधील नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या बिहार किंवा उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल, डिझेल भरुन घेण्यापेक्षा अनेकजण नेपाळच्या हद्दीत जाऊन इंधन विकत घेताना दिसत आहेत.
-
नेपाळच्या सीमेवर असणाऱ्या बिहारमधील रक्सौलमध्ये पेट्रोलचा दर १०७ रुपये ९२ पैसे प्रति लिटर तर डिझेलचा दर ९२ रुपये ९८ पैसे प्रति लिटर इतका आहे.
-
विशेष म्हणजे भारत सरकारने नुकत्याच दिलेल्या सवलतीनंतरचे हे दर आहेत.
-
म्हणजेच भारत सरकारने सवलत दिल्यानंतरही बिहारमध्ये नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या प्रदेशांमध्ये पेट्रोलचे दर १०० च्या खाली आणि डिझेलचे दर ९० च्या खाली आलेले नाहीत.
-
भारताच्या हद्दीत येणाऱ्या बिहारमधील रक्सौला आणि नेपाळच्या हद्दीत भारताला लागून येणाऱ्या सीमाभागातील पर्सा या प्रदेशामधील इंधनाच्या दरांमध्ये मोठी तफावत आहे.
-
सीमेपल्याड म्हणजेच नेपाळमध्ये पेट्रोल हे बिहारमधील दरापेक्षा प्रति लिटर २५ रुपये १७ पैशांनी स्वस्त पडतं.
-
तर डिझेल प्रति लिटरमागे २० रुपये ९५ पैशांनी स्वस्त आहे.
-
याच कारणामुळे बिहारच्या या भागामधील अनेकजण नेपाळमध्ये जाऊन गाड्यांमध्ये इंधन भरुन येतात असं न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
-
बिहारमधील रक्सौला या प्रदेशाला लागून असलेल्या नेपाळमधील पर्सा येथे एक लिटर पेट्रोलची किंमत १३२.२५ नेपाळी रुपये म्हणजे भारतीय चलनानुसार ८२.६५ रुपये इतकी आहे.
-
तर डिझेलची किंमत ही प्रति लिटर ११५.२५ नेपाळी रुपये म्हणजेच भारतीय चलनानुसार ७२.०३ रुपये इतकी आहे.
-
याचाच अर्थ असा भारताऐवजी नेपाळमध्ये इंधन भरलं तर लिटरमागे २० ते २५ रुपयांची बचत होते.
-
याच कारणामुळे भारतीय थेट नेपाळमध्ये जाऊन गाड्यांमध्ये इंधन भरुन आणण्यालाही प्राधान्य देताना दिसतायत.
-
भारत आणि नेपाळमध्ये सीमाभागमध्ये दोन्हीकडील नागरिकांना येण्यासाठी परवानगी असल्याने इंधन भरण्यासाठी अनेक भारतीय सध्या नेपाळला चक्कर मारुन येत असल्याचं दिसतंय. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत, सौजन्य रॉयटर्स, पीटीआय)
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन