-
ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या नॅचरल बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये एका भारतीय वंशाच्या महिलेने बाजी मारलीय.
-
हरियाणामधीरल झज्जर जिल्ह्यातील लहानशच्या गावातील नीरु समोताने ऑस्ट्रेलियातील नॅचरल बॉडी बिल्डिंग स्पर्धेत बाजी मारली आहे.
-
नीरु मागील बऱ्याच वर्षांपासून ऑस्ट्रेलियामध्ये वास्तव्यास आहे.
-
नीरुने आतापर्यंत अनेकदा बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्ये भाग घेतलाय आणि त्या जिंकल्याही आहेत.
-
अशीच एक स्पर्धा नुकतीच ऑस्ट्रेलियामध्ये संपन्न झाली. ज्यामध्ये नीरुने आपल्या मेहनतीच्या बळावर पाच पदकांवर नाव कोरलं आहे.
-
नीरुने या स्पर्धेमध्ये तीन सुवर्ण पदकं आणि दोन रौप्य पदकं पटकावली आहेत.
-
या स्पर्धेतील यशानंतर नीरुने प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण मूळ भारतीय वंशाचे असल्याचा आवर्जून उल्लेख केलाय.
-
पदक विजेता म्हणून मुलाखतीदरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना मी मूळची हरियाणामधील झज्जर जिल्ह्यातील एका छोट्याश्या खेड्यातून आलेय, असं नीरु म्हणाली.
-
नीरुने थीमवेअर स्पर्धेमध्ये एक पदक पटकावलं.
-
तसेच स्विमसूट कॅटेगरीमध्येही नीरुने बाजी मारली.
-
नीरु आता स्पर्धा जिंकल्यामुळे प्रकाशझोतात आली असली तरी इथपर्यंत पोहचण्यासाठी तिने फार मेहनत केली आहे.
-
सध्या सोशल मीडियावर नीरुच्या विजयाची चर्चा असली तरी ती सोशल मीडियावर फार सक्रीय आहे.
-
अनेकदा ती जीममधील फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करत असते.
-
मागील बऱ्याच काळापासून नीरु बॉडी बिल्डींगच्या श्रेत्रामध्ये नाव कमवण्यासाठी मेहनत घेतेय.
-
नीरु ऑस्ट्रेलियामधील अनेक स्पर्धांमध्ये अगदी उत्साहाने सहभागी होते.
-
नीरुच्या मेहनतीचे आता हळूहळू चीज होऊ लागलं आहे.
-
नीरु रोज अनेक तास जीममध्ये व्यायाम करत असते.
-
अनेकदा नीरु तिच्या अॅब्सचे तसेच जीमधील वर्क आऊटचे फोटो पोस्ट करत असते.
-
निरुचे सोशल मीडियावर अगदी काही शे फॉलोअर्स असले तरी आता तिला स्पर्धांच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळू लागलीय.
-
अनेकदा ती वेगवेगळ्या फोटो शूटमधील फोटो आपल्या अकाऊंटवरुन शेअर करत असते.
-
तिने पोस्ट केलेल्या अनेक फोटोंमध्ये तिने या क्षेत्रात नाव कमवण्यासाठी जीममध्ये घेतलेली मेहनत दिसून येत असल्याच्या कमेंट तिचे चाहते करतात.
-
नीरुला एक छोटी मुलगी आहे. अनेक फोटोंमध्ये ही चिमुकली तिच्या आईसोबत दिसते.
-
नीरुने केवळ हौस म्हणून व्यायाम करण्यास सुरुवात केली आणि आज ती थेट बॉडी बिल्डींग स्पर्धेची विजेती ठरलीय.
-
या विजयासाठी नीरुने तिचे प्रशिक्षक मनोज मुकुंदा यांचे आभार मानले आहेत. (सर्व फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन