जगामध्ये इंजीनियरर्सचे कौशल्य आणि हुशारी दाखवणारी एकाहून एक भन्नाट उदाहरणं आहेत. याच उदाहरणांपैकी एक आहे ऑरा स्काय पूल. -
या हॉटेलमधून दुबईची संपूर्ण स्कायलाइन दिसते.
दुबईमधील या स्काय पूलचे वैशिष्ट्य हे आहे की हा स्विमिंग पूल जमीनीपासून २०० मीटर उंचीवर आहे. हा स्विमिंगपूल ३६० डिग्री व्ह्यू असणारा आहे. या स्विमिंग पूलमधून समोर गल्फच्या खोऱ्यामधील अरबी समुद्र आणि पहावे तिथेपर्यंत दुबईचं दर्शन होतं. या स्विमिंग पूल इतक्या उंचीवर जगातील इतर कोणताही स्विमिंग पूल नाहीय. हा स्विमिंग पूल अरेबियन गल्फ होरायझन वर बनवण्यात आलाय. -
येथून दुबईमधील प्रसिद्ध वर्ल्ड बेटांचा समुह सुद्धा दिसतो.
-
ऑरा स्काय पूलमधून दिसणारा दुबईचा एरियल व्ह्यू थक्क करणारा आहे.
ऑरा स्काय पूलमध्ये तीन वेगवेगळ्या स्तरांमधील बुकींग करता येते. सकाळचे सेशन, सनसेट सेशन आणि फूल डे सेशन. प्रत्येक तिकीटासोबत सनबेड आणि बेडस्पोकचं वेलकम पॅकेज मिळतं. यामध्ये पूल लाऊंचमध्येही प्रवेश दिला जातो. हा स्विमिंग पूल ५० व्या मजल्यावर आहे. पाम टॉवर इमारत ही पाम जुमेराह बेटावर बांधलेली आलिशान इमारतही येथून दिसते. या स्विमिंग पूलला ७५० मीटर स्वेअर लाऊंच स्पेसमध्ये बनवण्यात आलं आहे. येथे येऊन दुबईचा ३६० डिग्री नजरा पाहता येतो. स्विमिंग पूलच्या वरील भागामध्ये दोन मजले आहेत. येथून पर्यटकांना स्विमिंग पूलबरोबरच समोरचे विहंगम दृष्य दिसते. -
या ठिकाणी सेंट रेजिस हे आलिशान हॉटेल असून येथे एकावेळी ३०० पाहुणे राहू शकतात.
-
या पाहुण्यांसाठी सकाळी दहा वाजल्यापासून ते सुर्यास्तापर्यंत हा पूल खुला असतो.
-
या ठिकाणाहून दुबईचं रात्रीचं दृष्य तर डोळ्याचं पारणं फेडणार असतं.
-
दरवर्षी मोठ्या संख्येने येथे पर्यटक येतात.
या पूलच्या सर्व स्तरांचे बूकींगचे दर वेगवेगळे आहेत. जे तीन-साडेतीन हजारांपासून आठ- नऊ हजारांपर्यंत आहे. (सर्व फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)
Pune Crime News : पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपीने तरुणीला काय सांगितलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम