-
व्होडाफोन आयडिया (Vi) आणि एअरटेल (Airtel ) नंतर, आता मुकेश अंबानींची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने देखील आपले प्रीपेड प्लॅन महाग करण्याची घोषणा केली आहे
-
जिओने रविवारी (२८ नोव्हेंबर २०२१) प्रीपेड दरांमध्ये २१ टक्के वाढ करण्याची घोषणा केली. ही वाढ पुढील महिन्यापासून लागू होणार आहे.
-
पॅकच्या किमतीत वाढ करूनही, जिओने एअरटेल आणि व्ही (Vi) पेक्षा किमती कमी ठेवल्या आहेत, त्यानंतर टेलिकॉम उद्योगात किमतीची स्पर्धा कायम राहील असा विश्वास आहे.
-
मात्र, कंपनीने दर महाग केल्याबद्दल सोशल मीडियावर लोकांमध्ये नाराजी व्यक्त करत आहेत.
-
ट्विटर वापरकर्त्यांनी याला डिजिटल रॉबरी म्हटले आणि विचारू लागले की कंपन्या 5G नुसार पैसे आकारत असताना 2G स्पीड का देत आहेत?
-
यादरम्यान काही लोकांनी निषेधार्थ ट्विटरवर #BoycottJioVodaAirtel ट्रेंड करण्याचा प्रयत्न केला.
-
जगात टेलिकॉम कंपन्यांचा महिना २८ दिवसांचा का असतो? असा प्रश्नही नेटीझन्स विचारत आहेत.
-
नेटीझन्सने आवाहन केले की चला Jio, Vi आणि Airtel वर बहिष्कार टाका आणि BSNL वर स्विच करू.
-
आता वाढत्या दरवाढीमुळे पुन्हा BSNL वापरकर्ते वाढू शकतात.
-
दिल्लीमध्ये BSNL नसल्याने नेटीझन्स दुखः व्यक्त करत आहेत.
-
५१ रुपयांच्या जिओ डेटा व्हाउचरसाठीही, आता वापरकर्त्यांना ६१ रुपये, १०१ रुपयांच्या प्लॅनसाठी १२१ रुपये आणि २५१ रुपयांच्या प्लॅनसाठी ३०१ रुपये खर्च करावे लागतील.
-
जेवढी दरवाढ होते तेवढा स्पीडही कंपनी देत नाही असं नेटीझन्सचे म्हणणे आहे.
-
शेवटी हा व्यवसाय आहे असही म्हंटल जात आहे.
-
#BoycottJioVodaAirtel चा ट्रेंड
-
या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट हलणार आहे.
-
अनेकांच्या मते जिओ वापरणे बंद करायला हवे.
-
व्हायरल मिम
-
BSNL वापरायला सुरुवात करायचा सल्ला दिला जात आहे.
-
रोजच कोणत्या ना कोणत्या प्रकरच्या दरवाढीची घोषणा होत आहे त्यामुळे नेटीझन्स थकले आहेत.
-
काही नेटीझन्सच्या मते आता या सर्व दरवाढीवर एकच उपाय आहे ते म्हणजे BSNL (सर्व फोटो: ट्विटर )

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला धक्का; चीनच्या वस्तूंवर लादला १०४ टक्के आयात कर, ‘व्हाईट हाऊस’कडून मोठी घोषणा