-
हिवाळ्यात मुंबई, पुणे आणि कोणक किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये बुधवार सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे नेटकरी मजेशीर मीम्स शेअर करत आहेत. (Photo- Twitter)
-
सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून पावसाची रिपरिप सुरु आहे. त्यामुळे वाटतंय बर्फ पडणार आहे असं मीम्स शेअर केलं आहे. (Photo- Twitter)
-
दक्षिणपूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तेथून पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती झाली आहे. त्यामुळे पाऊस पडत आहे. (Photo- Twitter)
-
येत्या २४ तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. (Photo- Twitter)
-
पुढील तीन दिवस राज्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने मंगळवारी व्यक्त केली आहे. (Photo- Twitter)
-
पाऊस गेला असं वाटत असताना सरी बरसत असल्याने लोकांची अशी अवस्था झाल्याचं मीम्सद्वारे दर्शवण्यात आलं आहे. (Photo- Twitter)
-
डिसेंबर महिन्यात कधीच पाऊस पाहिला नसल्याचं मीम्सही सर्वांत लक्ष वेधून घेत आहे. (Photo- Twitter)
-
पाऊस पडल्यानंतर काही जण चहा भजीचा आस्वाद घेत आहेत. त्यावरही मीम्स शेअर करण्यात आलं आहे. (Photo- Twitter)
-
मुंबईत प्रत्येक ऋतूत पाऊस पडत असल्याचं मीम्स शेअर करण्यात आलं आहे. (Photo- Twitter)
-
हिवाळा आणि उन्हाळ्यात पाऊस पडत असल्याने थ्री इडियट्स चित्रपटातील मै परमनंट हू यावरही एक मीम्स तयार करण्यात आलं आहे. (Photo- Twitter)
महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन