-
प्रत्येक देशात लष्कराला वेगळं महत्त्व असतंच, पण समुद्र किनारा असणाऱ्या देशांमध्ये नौदलाचंही तितकंच महत्त्व असतं.
-
नौदल सप्ताहानिमित्त गेटवे ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात नौदलाच्या जवानांची साहसी प्रात्यक्षिके सध्या सुरू आहे.
-
नौदल जवानांचे हेलिकॉप्टर्समधून थरारक प्रात्यक्षिके सादर केली.
-
येत्या शनिवारी (दि. ४) नौदल दिन साजरा होणार असून त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमांचा सरावही सध्या करण्यात येत आहे.
-
भारतीय नौदलातर्फे ४ डिसेंबर हा प्रतिवर्षी नौदल दिन म्हणून साजरा केला जातो.
-
देशभरात नौदल सप्ताह म्हणून विविध उपक्रमांनी साजरा होतो.
-
भारतीय उपसागराच्या हद्दीत महापूर, त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्ती किंवा आक्रमणाच्या वेळी आलेल्या प्रसंगांचा मुकाबला करताना तातडीची मदत पुरविण्यात नौदलाने नेहमी मोलाची कामगिरी बजावली आहे.
-
संरक्षण दलातील लष्कर व हवाई दलाच्या बरोबरीने नौदल अनेक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते.
-
नौदल जवानांचे साहसी कर्तब पाहून उपस्थित थक्क झाले होते.
-
(सर्व फोटो : गणेश शिर्सेकर, प्रदीप दास / इंडियन एक्सप्रेस)
![Sun transit in dhanishta nakshtra](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2024-06-08T201503.979.jpg?w=300&h=200&crop=1)
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा