-
आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी अनेक खेळाडूंना त्यांच्या फ्रेंचायझींनी सोडले. यामध्ये अनेक मोठ्या नावांचाही समावेश आहे. संघासाठी भरीव योगदान देऊनही या खेळाडूंना आता आपल्या नशीबावर अवलंबून राहावे लागणार आहे. मेगा लिलावात त्यांच्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.
-
केएल राहुलला पंजाब किंग्जने कायम ठेवले नाही. राहुल हा भारतीय क्रिकेट संघाचा महत्त्वाचा सदस्य मानला जातो. त्याला या लीगमधील ९४ सामन्यांचा अनुभव आहे. विशेष म्हणजे तो विकेटकीपिंगमध्येही निष्णात आहे. राहुलने आतापर्यंत आयपीएलमधील ९४ सामन्यांमध्ये २ शतके आणि २७ अर्धशतकांसह ३२७३ धावा केल्या आहेत.
-
आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा शिखर धवनलाही दिल्ली कॅपिटल्सने कायम ठेवले नाही. शिखरने या टी-२० लीगमध्ये ५७८४ धावा केल्या आहेत, जो सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट कोहली (६२८३ धावा) नंतर दुसऱ्या स्थानावर आहे.
-
नुकतेच कसोटी पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरला त्याच्या संघ दिल्ली कॅपिटल्सनेही कायम ठेवले नाही. या संघाचे कर्णधारपदही त्यांनी सांभाळले आहे. विशेष म्हणजे त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ प्रथमच या लीगच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. अय्यरने आयपीएलमधील ८७ सामन्यांमध्ये १६ अर्धशतकांसह एकूण २३७५ धावा केल्या आहेत.
-
ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू डेव्हिड वॉर्नरलाही त्याची फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादने कायम ठेवलेले नाही. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १५० सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर ५४४९ धावा आहेत. या टी-२० लीगमध्ये वॉर्नरने ४ शतके आणि ५० अर्धशतके झळकावली आहेत.
-
अनुभवी ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनलाही दिल्ली कॅपिटल्सने कायम ठेवले नाही. अश्विनने आयपीएल २०२१मध्ये १३ सामने खेळले आणि ७ विकेट घेतल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी तो टीम इंडियाचा भाग आहे.
-
विक्रमी पाच वेळा चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्या आणि त्याचा मोठा भाऊ कृणाल पंड्याला सोडले आहे. हार्दिक काही दिवसांपासून त्याच्या फिटनेससाठी झगडत होता. २०१६ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
-
अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानला त्याची आयपीएल फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादने सोडले असून, लिलावात त्याच्यावर बोली लावणार आहे. आयपीएलशिवाय राशिद जगभरातील टी-२० लीगमध्ये खेळतो.

बुलढाण्यातील केस गळतीचे रहस्य उलगडले; रोजच्या आहारातील अन्न ठरतंय कारणीभूत, जाणून घ्या कारण