-
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
अमोल कोल्हे यांच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत.
-
अमोल यांच्या पत्नीचं नाव अश्विनी कोल्हे आहे.
-
अश्विनी या सुद्धा डॉक्टर आहेत.
-
डॉ. अश्विनी कोल्हे या केईएम रुग्णालयात २००९ पासून कार्यरत आहेत.
-
अमोल आणि अश्विनी यांना आद्या आणि रुद्र ही दोन मुले आहेत.
-
आद्या ही ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत काम करताना दिसली होती.
-
सोशल मीडियावर ते मुलांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात.
-
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज अशा दोन्ही भूमिका साकारून अमोल कोल्हे घराघरात पोहचले आहेत.
-
एक यशस्वी अभिनेता ते राजकारणी या त्यांच्या प्रवासात पत्नीचा मोलाचा वाटा आहे.
-
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते.
-
या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली होती.
-
त्यांनी २०१४ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला.
-
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : डॉ. अमोल कोल्हे / इन्स्टाग्राम)

आजचे राशिभविष्य: मार्च महिन्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा असणार? ‘या’ राशींना जोडीदाराची उत्तम साथ व भागीदारीत होईल लाभ