-
१. नीरज चोप्रा – भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने इतिहास रचला आहे. नीरजने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताचे नाव उज्वल केले.
-
२. आर्यन खान – बॉलिवुडचा ‘किंग खान’ शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक झाली होती. जवळपास २६ दिवस तुरुंगात काढल्यानंतर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला होता.
-
३. शेहनाज गिल – अभिनेत्री शेहनाज गिलचा जवळचा मित्र अभिनेता आणि ‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचं जवळपास दोन महिन्यांपूर्वीच निधन झालं. सिद्धार्थ आणि शेहनाज याचं खास नात होतं. दोघं लग्न करणार अशाही चर्चा सुरु होत्या.
-
४. राज कुंद्रा – बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर दोन महिन्यांनंतर राजला जामीनही मंजूर झाला होता.
-
५. एलन मस्क – इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत जगात सर्वात दिग्गज कंपनी असलेल्या टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.
-
६. विकी कौशल – ‘मसान’, ‘संजू’ आणि ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ यांसारख्या चित्रपटांमुळे अभिनेता विकी कौशल लाखो तरुणींच्या मनावर राज्य करत आहे. अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच विवाहबंधनांत अडकणार आहेत.
-
७. पी. व्ही. सिंधू – टोक्यो ऑलिम्पिकमध्ये दिमाखात वाटचाल करणाऱ्या पी. व्ही. सिंधूने कांस्यपदक नावावर करत इतिहास रचला. इतिहास रचला आहे. या विजयासह, ती ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे.
-
८. बजरंग पुनिया – टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने फ्रीस्टाईल कुस्तीच्या ६५ किलो गटात कांस्यपदक पटकावले.
-
९. सुशील कुमार – भारतीय ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमार.
-
१०. नताशा दलाल – बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने नताशा दलालशी जानेवारीमध्ये लग्न केले. नताशा उद्योगपती राजेश दलाल व गौरी दलाल यांची मुलगी आहे.
Video : ‘ही दोस्ती तुटायची नाय!’ लक्ष्मीकांत बेर्डेंचा आभासी फोन आला अन्…; अशोक सराफ यांच्यासह सर्वांचे डोळे पाणावले, पाहा