-
भारताच्या हरनाज संधूने २१ वर्षांनंतर इतिहास रचला आहे.
-
हरनाजने ८० देशांतील स्पर्धकांना मागे टाकत मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला.
-
हरनाज संधूच्या या ऐतिहासिक विजयाची जगभरात चर्चा होत आहे.
-
मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकल्यापासून सोशल मीडियावर हरनाज संधूच्या नावाचा बोलबाला आहे.
-
मिस युनिव्हर्सशी संबंधित सर्व बातम्यांदरम्यान, लोकांच्या मनात हा प्रश्न वारंवार येतो की मिस युनिव्हर्स विजेत्याला ताजशिवाय दुसरे काय मिळते?
-
मिस युनिव्हर्सचा किताब पटकावल्यानंतरही तिच्यावर काही जबाबदारी असते का?
-
वृत्तानुसार, मिस युनिव्हर्सला एका वर्षासाठी डॉलर्समध्ये पगार दिला जातो. याशिवाय मिस युनिव्हर्स विजेत्या स्पर्धकासाठी शिष्यवृत्तीही उपलब्ध आहे.
-
मिस युनिव्हर्सच्या मुकुटाबाबतही करार होता. मिस युनिव्हर्स विजेती मुकुट परत करू शकते आणि त्यासाठी पैसे घेऊ शकते.
-
पण आतापर्यंत कोणत्याही विजेत्याने असे केले नाही. सर्व विजेत्यांनी तो मुकुट ठेवणे पसंत केले आहे आणि ते करारावर अवलंबून असते.
-
मिस युनिव्हर्स विजेत्याला न्यूयॉर्क शहरात एका वर्षासाठी एक अपार्टमेंट दिले जाते.
-
मिस युनिव्हर्स विजेत्याच्याही काही जबाबदाऱ्या आहेत.
-
विजेत्याला सामाजिक कार्य करावे लागते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या कल्याणकारी मोहिमेतही पाठिंबा द्यायचा असतो.
-
हरनाज संधूचा हा विजय देखील खास आहे कारण याआधी १९९४ मध्ये सुष्मिता सेन आणि २००० मध्ये लारा दत्ताने मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला होता.
-
हरनाजच्या विजयामुळे सोशल मीडियावर लोकांव्यतिरिक्त अनेक सेलिब्रिटीनींही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
हरनाजच्या सौंदर्यासोबतच तिच्या स्मार्टनेसचेही खूप कौतुक होत आहे.

Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा