-
करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव डेल्टापेक्षा अधिक वेगाने होत असल्याची माहिती सोमवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी दिली आहे.
-
जागतिक आरोग्य संघटनेनं करोनाच्या या नवीन विषाणूसंदर्भातील इशारा देताना त्याचा प्रादुर्भाव किती देशांमध्ये झालाय, प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करता येईल यासंदर्भातील माहिती दिलीय.
-
इतकच नाही तर लसीकरण पूर्ण झालेल्या किंवा यापूर्वी करोना होऊन गेलेल्यांनाही ओमायक्रॉनचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
-
डब्ल्यूएओचे महानिर्देशक ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी जिनेवामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सध्याच्या करोना परिस्थितीसंदर्भात सविस्तर माहिती दिली.
-
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ट्रेडोस यांनी, “आता समोर आलेल्या पुराव्यांनुसार करोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टाच्या तुलनेत फारच वेगाने पसरत आहे,” असं म्हटलंय.
-
ट्रेडोस यांनी करोना प्रतिबंधक लसीचे सर्व डोस घेतलेल्यांना किंवा यापूर्वी करोनावर मात केलेल्यांमध्येही या नवीन विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त केलीय.
-
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगामधील ८९ देशांमध्ये करोनाच्या या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केलाय.
-
कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका असणाऱ्या भागांमध्ये रुग्णसंख्या दीड ते तीन दिवसांमध्ये दुप्पटीने वाढत आहे, असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय.
-
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार अधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये मोठ्याप्रमाणात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव होत आहे. हा इशारा भारतासारख्या देशांसाठी धोक्याचा आहे.
-
“ओमायक्रॉनपासून वाचण्यासाठी सध्या सर्वोत्तम मार्ग हा लसीकरणाचा नसून मास्क वापरण्याचा आहे,” असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय.
-
“सोशल डिस्टन्सिंग, व्हेंटिलेशन आणि आरोग्यदायी वातावरण सध्या यावर मात करण्यासाठी सर्वोत्तम आहे. या सर्व गोष्टींचं पालन केल्यास प्रादुर्भाव टाळता येईल,” असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय.
-
जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना इशारा देताना डेनमार्ककडून सर्व देशांनी शिकवण घेतली पाहिजे असं म्हटलंय.
-
डेनमार्कमध्ये निर्बंध लागू करण्यास उशीर झाला आणि त्यामुळे करोनाच्या साथीने पुन्हा डोकं वर काढलं आहे.
-
ब्रिटनमध्ये करोना संसर्गाचे ९३ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत.
-
करोनाचा ओमायक्रॉन हा व्हेरिएंट सर्वात आधी दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळून आलेला.
-
त्यानंतर जगभरामध्ये त्याचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे.
-
दक्षिण आफ्रिका सरकारने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष उपाययोजना केल्यात.
-
जागतिक आरोग्य संघटनेनं यापूर्वीच करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या सर्व देशांना करोनाची लस मिळाली तरच साथीवर नियंत्रण मिळवता येईल असं स्पष्ट केलंय. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं पुढाकार घेऊन गरजू आणि मागास देशांना सधन देशांकडून लस पुरवठा करण्याची मोहीमही हाती घेतलीय. (सर्व फोटो प्रातनिधिक, सौजन्य: रॉयटर्स)

Kalyan Crime : “मराठी माणसं भिकारी, त्यांना मारा”; म्हणत लोखंडी रॉडने मारहाण; कल्याणच्या सोसायटीत तुफान राडा, नेमकं काय घडलं?