-
जॉर्डनच्या राजकुमारी तसेच संयुक्त अरब अमिरातचे (युएई) पंतप्रधान आणि दुबईचे राजा शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांच्या सहाव्या पत्नी म्हणजेच दुबईच्या राणी हया बिंत अल हुसैन यांना घटस्फोटानंतर ५ हजार ५०० कोटी रुपये पोटगी मिळणार आहे.
-
लंडनमधील उच्च न्यायलयाने मुलांच्या कस्टडीसंदर्भातील खटल्यामध्ये हा महत्वपूर्ण निर्णय दिला असून या निर्णयामुळे हया बिंत अल हुसैन पुन्हा चर्चेत आल्यात.
-
मात्र सध्या केस जिंकल्यामुळे चर्चेत असणाऱ्या हया यापूर्वी अनैतिक संबंधांमुळे चर्चेत आल्या होत्या.
-
एका वृत्तानुसार राजकुमारी हया बिंत हुसैन यांचे त्यांच्या बॉडीगार्डशी संबंध असल्याचा खुलासा याच वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये करण्यात आलेला. हया बिंत हुसैन यांचे तीन बॉडीगार्ड्ससोबत अनैतिक संबंध असल्याचं सांगण्यात आलं.
-
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार राजकुमारींचे त्यांच्या ब्रिटिश बॉडीगार्डबरोबर संबंध होते. हे संबंध राजापासून लपवण्यासाठी हया यांनी बॉडीगार्डला १२ कोटी रुपये दिले होते.
-
राजकुमारी या बॉडीगार्ड्सला महगाड्या भेट वस्तूही द्यायच्या.
-
राजकुमारीने बॉडीगार्डला भेट म्हणून दिलेल्या वस्तूंमध्ये ५० लाखांची बंदूक आणि १२ लाखांच्या घड्याळाचा समावेश आहे.
-
आपले बॉडीगार्डबरोबर असणारे संबंध जगासमोर येऊ नयेत यासाठी राजकुमारी हया यांनी १२ कोटी रुपये खर्च केले. आपल्यामधील संबंधांबद्दलची माहिती कधीच जगासमोर येऊ नये अशी हया यांची इच्छा होती. मात्र तसं घडलं नाही आणि या प्रकरणाचा भांडाफोड झाला.
-
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राजकुमारी हया बिंत अल हुसैन यांनी कोणतीही पूर्वसूचना न देताना दुबईचे राजा शेख मोहम्मद बिन राशिद अल मक्तुम यांना शरिया कायद्यानुसार घटस्फोट दिला.
-
दुबईच्या राजाला हयाने पूर्वसूचना न देता शरिया कायद्यानुसार फेब्रुवारी २०१९ मध्ये घटस्फोट दिला.
-
मागील काही वर्षांपासून हया बिंत अल हुसैन ब्रिटनमध्ये राहत आहेत.
-
हया आणि त्यांच्या प्रियकर २०१६ पासून एकमेकांना ओळखू लागले. त्यानंतर त्यांच्या प्रियकराने हया यांच्यासाठी बॉडीगार्ड म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
-
४६ वर्षीय हया आणि ३७ वर्षीय बॉडीगार्ड रसेल फ्लावर या दोघांमधील हे नातं दोन वर्षांसाठी टिकलं.
-
डेली मेलच्या वृत्तानुसार, राजकुमारी हया यांचा बॉडीगार्ड हा विवाहित होता. मात्र हया यांच्याबरोबरच्या प्रकरणासंदर्भातील माहिती समोर आल्यानंतर त्याचा संसार मोडला.
-
हया यांचा बॉडीगार्ड राहिलेल्या रसेलच्या पत्नीच्या सांगण्यानुसार हया यांनी कोट्यावधी रुपये आणि महागड्या भेटवस्तू देऊन रसेलला यामध्ये अडकवल्याची शक्यता आहे.
-
२०१८ पासून ब्रिटनमध्ये राहणाऱ्या हया या दुबईचे राजा शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांची सहावी आणि सर्वात कमी वय असणारी पत्नी ठरलेल्या.
-
राजकुमारी हया जिथे जिथे जायच्या तिथे त्यांच्या हा बॉडीगार्ड त्यांची सोबत करायचा.
-
रसेलला हया यांनी आधी रोलेक्स आणि नंतर वाढदिवसानिमित्त ऑडेमर्स पिगेट या महागड्या ब्रॅण्डची घड्याळं गिफ्ट केली होती.
-
आपला पती घरी आल्यानंतरही अनेक तास हया यांच्याशी फोनवरुन गप्पा मारायचा असं रसेलच्या पत्नीचं म्हणणं आहे. दोघांमध्ये बराच काळ फोनवर बोलणं सुरु असायचं यावरुनच रसेलच्या पत्नीला या दोघांच्या संबंधांबद्दल पहिल्यांदा शंका आणि २०१६ साली हे प्रकरण जगासमोर आलं.
-
मात्र हे प्रकरण समोर आल्यानंतर बॉडीगार्डबरोबर असणाऱ्या प्रेम संबंधांच्या आरोप हया यांनी सुरुवातीला फेटाळले.
-
बॉडीगार्डसोबतचं प्रेमप्रकरण जगासमोर आल्यानंतर राजकुमारी हया यांनी दुबई कायमचे सोडले. त्या ब्रिटनमध्ये राहतात.
-
मुलांचा ताबा मिळावा म्हणून त्यांनी ब्रिटनमधील न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये निकाल हया यांच्या बाजूने आणि दुबईच्या राजाच्या विरोधात लागला होता.
-
२०२० साली हया बिंत अल हुसेन ३१ दशलक्ष पौंड इतकी रक्कम घेऊन देश सोडून पळून गेल्याची माहिती समोर आल्यानंतर जगभरातील वृत्तपत्रांमध्ये यासंदर्भातील बातम्या छापून आल्या होत्या.
-
हया आणि शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांना दोन मुलं आहेत. याच दोन मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालयाने दुबईच्या राजाला हया यांना ५ हजार ५०० कोटी देण्याचे आदेश दिलेत.
-
न्यायमूर्ती फिलिप मूर यांनी निकाल देताना हया बिंत अल हुसैन आणि दोन्ही मुलांच्या जीवाला आयुष्यभर धोका असल्याचा मुद्दा लक्षात घेवून एवढी मोठी रक्कम देण्याचा आदेश दिल्याचं स्पष्ट केलंय. शेख यांच्याकडूनच या तिघांच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे.
-
“ती (हया बिंत अल हुसैन) स्वत:साठी पैसा मागत नाहीय. तिला केवळ तिच्या सुरक्षेसाठीचा मोबदला हवाय. लग्न मोडल्याने जे नुकसान झालं आहे त्याचा मोबदला तिला हवाय,” असं न्यायालयाने दुबईच्या राज्याच्या विरोधात निकाल देताना म्हटलंय.
-
न्यायालयाने शेख यांना दिलेल्या निर्देशानुसार २५१ मिलियन पाउंडची रक्कम पुढील तीन महिन्यांमध्ये हया बिंत अल हुसैन यांना द्यावी लागणार आहे. या पैशांमधून हया ब्रिटनमधील आपल्या बंगल्याच्या देखरेखीचा खर्च करु शकतील असंही न्यायालयाने म्हटलंय.
-
शेख यांनी दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्चही उचलणे आवश्यक असल्याचंही न्यायालयाने म्हटलंय. जलीला (१४) आणि जायद (९) या दोघांच्या शिक्षणासाठी ९.६ मिलियन पाउंडची रक्कम टप्प्याटप्प्यात देण्यात यावी असं न्यायालयाने निकालामध्ये म्हटलंय.
-
तसेच मुलांची देखभाल करण्यासाठी ११.२ मिलियन पाउंडची रक्कम दर वर्षी देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. दोन्ही मुलं सज्ञान होईपर्यंत ही रक्कम शेख यांना दरवर्षी द्यावी लागणार आहेत.
-
या संपूर्ण रक्कमेसाठी २९० मिलियन पाउंडची रक्कम एचएसबीसी बँकेमध्ये गँरंटी म्हणून ठेवावी लागणार आहे. ब्रिटनमधील कोणत्याही कौटुंबिक कलहाच्या न्यायालयीन खटल्यामधील ही सर्वात मोठी नुकसान भरपाईची रक्कम आहे. मात्र असं असलं तरी ही रक्कम हया बिंत अल हुसैन यांनी मागणी केलेल्या रक्कमेपेक्षा फार कमी आहे. हया यांनी १.४ बिलियन पाउंडची मागणी केली होती. “शेख यांच्या प्रभावापासून मला माझ्या मुलांना मुक्त करायचं आहे,” असं हया यांनी न्यायालयाला सांगितलं. (सर्व फोटो रॉयटर्स, एएफपी आणि सोशल नेटवर्किंगवरुन साभार)

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच