-
राज्यात ओमायक्रोनचं संकट गडद होत असताना, बीडमध्ये मात्र भाजपा नेत्याच्या पुत्राच्या लग्नामध्ये करोनाचे नियमांचं उल्लंघन झाल्याचं पहायला मिळालं आहे.
-
करोनाच्या सर्व नियमांना झुगारून भाजपा नेत्याच्या मुलाचा शाही विवाह सोहळा बीड शहरात पार पडला आहे.
-
या विवाहाला खासदार, आमदारांसहीत माजी मंत्री आणि अधिकाऱ्यांनी देखील हजेरी लावली होती.
-
माजी आमदार बाजीराव जगताप यांचा मुलगा आणि भाजप नेते मोहन जगताप यांच्या बंधूच्या विवाह सोहळ्यात करोनाचे नियम पायदळी तुडविण्यात आले.
-
बीड शहरातील आशीर्वाद लॉन्समध्ये हा विवाह पार पडला.
-
ओमायक्रोनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घालून दिलेली नियमावलीची पायमल्ली लोकप्रतिनिधींकडून होत असल्याचं बीडमध्ये दिसून आले आहे.
-
या लग्न सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्यांपैकी अनेकांच्या तोंडावर मास्क दिसत नव्हते.
-
अनेक महिला या मास्क शिवायच लग्नच्या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच लोकांनी मास्क घातलं होतं.
-
स्टेजवरील अनेकांनी मास्क घातलं नव्हतं.
-
वाजत गाजत नवरदेवाची मिरवणूकही काढण्यात आली.
-
या मिरवणुकीमध्ये शेकडोच्या संख्येने लोक सहभागी झाले होते.
-
अनेकजण अगदी गर्दी करुन रस्त्यावरच नाचाताना दिसले. या वेळी करोना नियमांअंतर्गत येणाऱ्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडवण्यात आला.
-
सांयकाळीही मोठ्या संख्येने या लग्नामध्ये उपस्थित असणारे लोक विवाहसोहळा आयोजित करण्यात आलेल्या लॉनबाहेर नाचत होते.
-
मोठ्या आवाजात डिजे लावून लग्नात आलेल्यांनी डान्स केल्याचं दिसून आलं.
-
या लग्नाचे व्हिडीओ आता व्हायरल झाले असून, नियम फक्त सर्वसामान्यांना आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं