-
जगभरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव होऊन जवळजवळ दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झालाय. करोनाआधी आणि करोनानंतर असं वर्गीकरण करता येईल एवढा परिणाम या साथीने जगावर केलाय. अगदी प्रवास, पर्यटन, शैक्षिण क्षेत्र आणि आरोग्य क्षेत्राबरोबरच मानवी जीवनाशी नगडीत सर्वच क्षेत्रांवर करोनाचा परिणाम केलाय.
-
करोनाचा प्रादुर्भाव जगभरातील अनेक देशांमध्ये झाला असून दिवसोंदिवस तो अधिक धोकायदायक ठरत आहे. अनेक ठिकाणी हा विषाणू स्वत:चं रुप बदलत नव्या स्वरुपात म्हणजेच व्हेरिएंटमध्ये समोर येतोय. त्यामुळेच लसीकरणाचाही त्याच्यावर फारचा परिणाम होताना दिसत नाहीय.
-
करोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. या देशात सध्या ओमायक्रॉनचा वेगाने प्रादुर्भाव होतोय.
-
अमेरिकेत मागील दोन वर्षांमध्ये आठ लाख जणांना करोनामुळे प्राण गमावावा लागलाय. अजूनही अमेरिकेत करोनाचा प्रादुर्भाव सुरुच आहे.
-
मात्र त्याचवेळेस एकीकडे अमेरिका, चीन, भारत यासारख्या जागतिक अर्थसत्तांना मोठा फटका बसलेल्या करोनापासून आजही काही देश अगदी सुरक्षित आहेत.
-
२०१९ मध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून आतापर्यंत करोनाचा एकही रुग्ण आढून न आलेले तब्बल १० देश असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते.
-
या देशांपैकी अनेक देश हे छोट्या छोट्या बेटं आहेत. पॅसिफिक आणि अटलांटिकच्या समुद्रामध्ये असणाऱ्या या देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव न होण्याचं सर्वात मोठं कारण ठरलं आहे ते म्हणजे हे देश सर्व बाजूने समुद्राने वेढलेले आहेत.
-
अर्थात नैसर्गिक परिस्थितीबरोबरच काही देशांनी लागू केलेल्या कठोर निर्बंधांमुळे आणि बदललेल्या प्रवास धोरणांमुळे या देशांमध्ये करोनाचा फैलाव झाला नाही.
-
यापैकी दोन देशांमध्ये हुकुमशाही असल्याने त्या देशांमध्ये करोनाची काय परिस्थिती आहे याची ठोस आकडेवारी उपलब्ध होऊ शकलेली नाही.
-
अर्थात याच गोष्टीमुळे या दहा देशांमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नसला तरी काही प्रकरण दाबली गेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेसोबतच इतर संघटनांनी शक्यता व्यक्त केलीय.
-
असं असलं तरी या देशांचा समावेश सध्या तरी करोनाचा एकही रुग्ण नसणाऱ्या देशांमध्येच करता येईल. पाहूयात असे देश नक्की कोणते आहेत आणि त्यांनी काय उपाययोजना केल्या.
तुवालु >> जगाच्या पाठीवर केवळ २६ चौ. कि. मी. क्षेत्रफळाचा आणि इनमिन १२ हजार लोकसंख्येचा आणि तोही संयुक्त राष्ट्रसंघाने एक सार्वभौम देश म्हणून मान्यता दिलेला असा एखादा देश आहे या गोष्टीवर अनेकांचा विश्वासच बसणार नाही! वर वर्णन केलेल्या देशाचे नाव आहे ‘तुवालु’! -
नऊ छोट्या बेटांचे मिळून बनलेले हे द्वीपराष्ट्र दक्षिण पॅसिफिक महासागरात ऑस्ट्रेलिया आणि हवाई बेटांच्या साधारण मध्यावर आणि फिजी बेटांच्या उत्तरेला वसलेले असून हा देश राष्ट्रकूल समुहाचा भाग असूनही त्यांनी वेळीच करोना निर्बंध लागू केले. यामध्ये क्वारंटाइन करण्याचाही समावेश होता.
-
तुवालुमधील दर १०० व्यक्तींपैकी ५० जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे असं जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते.
-
तोकलौ >> जागतिक आरोग्य संघटनेनं दक्षिण पॅसिफिक समुद्रामधील तोकलौ या लहान लहान बेटांपासून बनलेल्या देशाचा समावेश करोनामुक्त देशांच्या यादीत केलाय.
-
एकूण तीन लहान लहान बेटांपासून बनलेल्या या देशाचं एकूण क्षेत्रफळ आहे १० चौरस किलोमीटर. य
-
तोकलौची लोकसंख्या अवघी दीड हजार इतकी असून या देशात कोणतेही विमानतळ नाहीय.
-
तौकलौला जाण्यासाठी न्यूझीलंडवरुन बोटीचा पर्याय उपलब्ध आहे. इतर देशांपासून फार दूर असल्याने या देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही.
-
सेंट हिलीना >> दक्षिण अटलांटिक समुद्रामध्ये असणारा हा छोटा बेटवजा देश खरं तर ब्रिटीशांच्या ताब्यात असणाऱ्या काही मोजक्या देशांपैकी आहे.
-
सेंट हिलीना हा देश आणि येथील प्रदेश हा जगातील सर्वात दुर्गम भागांपैकी एक मानला जातो.
-
जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार सेंट हिलीना येथील दर १३८ व्यक्तींपैकी १०० जणांचं लसीकरण पूर्ण झालंय.
-
या देशाची लोकसंख्या चार हजारांहून थोडी अधिक आहे. या देशाचं आकारमान छोटं असलं तरी त्यांचं स्वतंत्र्य विमानतळ आहे.
-
पिटकॅरन बेटे >> पॅसिफिक महासागरामधील चार लहान मोठ्या बेटांपासून हा देश तयार झालाय.
-
सीआयएच्या वेबसाईटवरील पिटकॅरन बेटांच्या माहितीनुसार या देशामध्ये कायमस्वरुपी वास्तव्यास असणाऱ्या लोकांची संख्या अवघी ५० इतकी आहे.
-
पिटकॅरनमधील जवळजवळ सर्व लोक ही अॅडम्सटाऊन या गावामध्येच राहतात. इतर तीन बेटांवर लोकवस्ती अस्तित्वातच नाहीय. कमी लोकसंख्येमुळे येथे करोनाचा प्रादुर्भाव झालेला नाहीय.
-
न्यूवे >> हा देश जगातील सर्वात मोठ्या कोरल्स म्हणजेच प्रवाळांपासून बनलेल्या बेटांवर वसलेला आहे.
-
न्यूझीलंडपासून हा बेटवजा देश अडीच हजार किलोमीटर दूर दक्षिण पॅसिफिक महासागरामध्ये आहे.
-
न्यूवे देशाला करोनाविरुद्धच्या लढण्यामध्ये न्यूझीलंडने मदत केली. न्यूझीलंड हा करोनाशी सर्वात यशस्वीपणे दोन हात करणारा देश म्हणून ओळखला जातो.
-
नाऊरु >> दक्षिण प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येस असलेला नौरु किंवा नाऊरु हा सार्वभौम देश जगातला सर्वांत लहान प्रजासत्ताक देश म्हणून ओळखला जातो.
-
केवळ २१ चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेला नाऊरु हा देश जगातला तिसरा सर्वांत लहान देश आहे! यापेक्षाही कमी क्षेत्रफळ असलेले दोन देश आहेत : व्हॅटिकन सिटी आणि मोनॅको.
-
नाऊरु बेट तुवालू या द्वीपदेशाच्या वायव्येस १,३०० कि.मी., तर पापुआ न्यू गिनीच्या ईशान्येस प्रशांत महासागरात आहे.
-
या देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव न होण्याचं मुख्य कारण ठरलं या देशात लागू करण्यात आलेले निर्बंध.
-
मायक्रोनेशिया >> पॅसिफिक महासागरातल्या ओशियाना उपखंडामध्ये ६०० बेटांच्या समुहाला मायक्रोनेशिया म्हणतात.
-
आदिवासी पट्ट्यातील दर्यावर्दी आणि मच्छीमारांचे वास्तव्य असणाऱ्या या बेटांवर करोनाचा प्रादुर्भाव न होण्यामागील कारण म्हणजे करोनाविरुद्धच्या लढ्यात मोठ्या देशांनी केलेली मदत.
-
मायक्रोनेशियाला अमेरिका, चीन आणि जपानसारख्या देशांनी करोनाविरुद्धच्या लढ्यात मदत केल्याने येथे करोनाचा प्रादुर्भाव झाला नाही.
करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर येथील स्थानिक प्रशासनाने तातडीने कठोर निर्बंध लागू केले होते. -
किरीबात >> किरीबात हा देश हवाई बेटांच्या नैऋत्तेला ३२०० किमींवर आहे.
-
किरीबातमध्ये फार मोजक्या संख्येने विमानं येतात.
-
निर्बंध लागू केल्यानंतर त्यांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात आल्याने देशात करोनाचा प्रादुर्भाव झाला नाही.
-
उत्तर कोरिया >> करोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही असा दावा करणाऱ्या देशांमध्ये उत्तर कोरियाचाही समावेश होतो.
-
काही प्रसारमाध्यमांनी तर उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग-उनने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना थेट मारुन टाकल्याच्याही बातम्या दिल्यात. देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हे टोकाचं पाऊल उचलण्यात आल्याचं सांगितलं गेलं.
-
तुर्कमेनिस्तान >> करोनाचा प्रादुर्भाव न झालेल्या देशांपैकी एक देशमध्ये तुर्कमेनिस्तान. २७ ऑक्टोबर १९९१ रोजी सोव्हिएत राष्ट्रसंघातून बाहेर पडून तुर्कमेनिस्तान हा एक स्वयंशासित, स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला. तुर्कस्थान या दुसऱ्या एका देशाशी असलेल्या नामसाधम्र्यामुळे तुर्कमेनिस्तानच्या बाबतीत अनेक लोकांचा गोंधळ होतो.
-
तुर्कमेनिस्तानच्या सीमा अग्नेयेस अफगाणिस्तान, दक्षिणेस इराण, पश्चिमेस कॅस्पीयन समुद्र, वायव्येस कजाकिस्तान आणि ईशान्येस उज्बेकिस्तान यांच्या सीमांना मिळतात. तुर्कमेनिस्तानच्या पाच लाख चौ.कि.मी. क्षेत्रफळापैकी साधारणत: ७० टक्के क्षेत्रावर काराकुम वाळवंट पसरलेले आहे. एवढ्या देशांसोबत सीमा असणाऱ्या तुर्कमेनिस्तानमध्ये करोना रुग्ण नसल्याबद्दल शंका उपस्थित केली जाते.
-
बीबीसीसोबत बोलताना जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अधिकाऱ्याने तुर्कमेनिस्तानमध्ये करोनाचे रुग्ण नसतील असं म्हणणं योग्य वाटत नाही असं मत व्यक्त केलेलं. त्यामुळे हा देश ठोस माहिती समोर न आलेल्या देशांपैकी एक आहे.
-
ही सर्व माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीवर आधारित आहे. त्यामुळेच एकीकडे जग ओमायक्रॉनच्या संकटाला तोंड देत असतानाच दुसरीकडे असे देश आहेत हे फारच आश्चर्यात टाकणार आहे. (सर्व फोटो रॉयटर्स आणि विकिपिडियावरुन साभार)
‘गंगू तारुण्य तुझं बेफाम, गं जसा इश्काहचा ऍटम बाम’ आजीपुढं तरुणाई फिकी पडली; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल