-
अनाथ मुलांच्या सर्वागीण विकासासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या आणि अनाथांची माय या नावानेच ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सपकाळ (७४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले.
-
दीड हजारांहून अधिक अनाथ मुला-मुलींचे त्या संगोपन करीत होत्या. सिंधुताई सपकाळ यांना गेल्या वर्षी ‘पद्मश्री‘ने गौरवण्यात आले होते.
-
प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या दीड महिन्यांपूर्वी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या काळात त्यांच्यावर हार्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच सिंधुताईंना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी माय पुन्हा लेकरांना पोरकं करुन गेल्याची भावना व्यक्त केली.
-
सिंधुताई या महानुभाव पंथाचे आचरण करत होत्या. त्या कृष्णभक्त होत्या. त्यामुळेच सिंधुताई यांच्या पार्थिवावर आज (५ जानेवारी) ठोसरपागा येथे महानुभाव पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
-
सिंधुताईंच्या पार्थिवावर अग्निसंस्कार न करता दफन करण्यात आलं. महानुभाव पंथामध्ये केल्या जाणाऱ्या अंत्यसंस्काराला ‘निक्षेप’ असं म्हटलं जातं.
-
सिंधुताईंच्या निधनाच्या वृत्तानंतर महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केल्याचं पहायला मिळालं.
-
अनेकांनी आपल्या फेसबुकवर तसेच व्हॉट्सअप स्टेटसवरुन सिंधुताईंनी श्रद्धांजली वाहिली.
-
सिंधुताई आज आपल्यात नसल्या तरी त्याचं कार्य आणि आठवणी सदैव आपल्यामध्ये राहणार आहेत अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
-
सिंधुताईंच्या आठवणी आणि किस्से चर्चेत असतानाच सोलापूरच्या तरुणाने साकारले सिंधुताईंचे शिल्पही चर्चेत आलं आहे.
-
सोलापूर येथील शिल्पकार सागर रामपूरे यांनी हे शिल्प साकारलं आहे. सध्या या शिल्फाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (येथून पुढील फोटो सौजन्य: Sagar Rampure Designs फेसबुक पेजवरून साभार)
-
या शिल्पामध्ये सिंधुताई एका छोट्या बाळाला घेऊन खुर्चीवर बसल्याचे दिसत आहे.
-
एका वर्षाच्या अथक प्रयत्नांनतर सागरने २०१९ मध्ये हे शिल्प साकारले आहे.
-
विशेष म्हणजे हे मातीचे शिल्प नसून सिलिकॉनपासून ते साकारण्यात आलं आहे.
-
या शिल्पामधील प्रत्येक भाग हा सिलिकॉनपासून साकारण्यात आलाय.
-
हे शिल्प बनवण्यासाठी सागरने सिंधूताईंचे खास फोटोशूट केले होते.
-
या फोटोंच्या सहाय्याने त्याने एका वर्षात हे शिल्प साकारले.
-
सोलापुरमधील सागरच्या स्टुडिओमध्ये हे शिल्प पाहता येईल.
-
सिंधुताईंच्या या शिल्पाची त्यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा चर्चा असल्याचं सोशल मीडियावर दिसून येत आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”