-
पंजाब दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक झाल्याने भाजपा विरुद्ध काँग्रेस असा वाद चांगलाच तापल्याचं चित्र सध्या दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आपण त्यांच्या सुरक्षेसाठी दिवसाला किती खर्च होतो (PM SPG security budget per day) हे या गॅलरीमधून जाणून घेणार आहोत.
-
पंतप्रधानाचा ताफा ज्या रस्त्याने जाणार होता त्या रस्त्यावर फिरोझपूरमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याने १५ ते २० मिनिटं पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवर अडकून होता.
-
यावेळेस सर्वच पोलीस आणि कमांडो आणि अधिकारी रस्त्यावर सुरक्षा पुरवण्यासाठी उतरले होते.
-
अखेर मोदींच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेत सभा रद्द करुन ताफा पुन्हा मागे फिरला. या प्रकरणामध्ये केंद्र सरकारने म्हणजेच गृहमंत्रालयाने राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला असून ही सुरक्षेमधील मोठी त्रुटी होती असं म्हटलं. अती महत्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेमध्ये गंभीर धोका निर्माण झाल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं म्हटलंय.
-
पंतप्रधानांना सुरक्षा पुरवाणारे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या जवानांनी मोदींचा ताफा अडवण्यात आल्यानंतर तातडीने गाडीला चारही बाजूने घेरलं आणि सुरक्षा पुरवली.
-
मात्र पंतप्रधान एखाद्या दौऱ्यावर असताना एसपीजीबरोबरच राज्य सरकारची म्हणजेच राज्यांच्या पोलिसांचीही जबाबदारी असते की पंतप्रधानांना सुरक्षा पुरवण्यात यावी.
-
आता आपल्याला पोलिसांसंदर्भात तर ठाऊक आहे पण पंतप्रधानांना सुरक्षा पुरवणारं हे एसपीजी म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप सुरक्षा काय असते आणि त्यासाठी किती खर्च केला जातो, या गटाची स्थापना कधी कुठे कशी झाली, ते कोणाला सुरक्षा पुरवता हे पाहूयात…
-
२ जून १९८८ मध्ये भारताच्या संसदेमध्ये एका अधिनियम पारित करण्यात आला. यामध्ये पंतप्रधानांना सुरक्षा पुरवणाऱ्या जवानांची निवड पोलीस आणि पॅरामिलेट्री फोर्समधून केली जायची. यामधूनच नंतर एसपीजीचा जन्म झाला.
-
सपीजी ही देशातील प्रमुख व्यक्तींना सुरक्षा देणारी सर्वात महत्वाचं सुरक्षा दल आहे.
-
पूर्वी पंतप्रधानांबरोबरच इतर महत्वाच्या व्यक्तींनाही एसपीजी सुरक्षा दिली जायची. मात्र आता ही सुरक्षा केवळ पंतप्रधानांना मिळते.
-
स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजे एसपीजीच्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील कायद्यामध्ये २०१९ साली बदल करण्यात आला. या बदलामुळे आता केवळ पंतप्रधानांना एसपीजी सुरक्षा पुरवली जाते. देशातील चार व्यक्तींना देण्यात येणारी ही विशेष सुरक्षा आता केवळ पंतप्रधानांना पुरवली जाते.
-
कायद्यामध्ये बदल करण्यात येण्याआधी पंतप्रधानांबरोबर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांची दोन्ही मुले म्हणजेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना एसपीजी सुरक्षा पुरवली जायची.
-
त्यामुळेच एसपीजीअंतर्गत येणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी झाली असली तरी त्यासाठी दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये १० टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याचे २०२० साली स्पष्ट झाले.
-
संसदेमध्ये पंतप्रधानांना देण्यात येणाऱ्या एसपीजी सुरक्षेसंदर्भात २०२० च्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. “सध्या देशामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपकडून (एसपीजी) सुरक्षा पुरवण्यात येणाऱ्या व्यक्तींची माहिती द्यावी,” अशी मागणी डीएमके पक्षाचे नेते दयानिधी मारन यांनी यांनी केली होती.
-
मारन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी देशात केवळ एकाच व्यक्तीला एसपीजी सुरक्षा देण्यात येत असल्याची माहिती दिली. मात्र रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींच्या नावाचा उल्लेख उत्तरामध्ये केला नाही. तरी बदललेल्या कायद्यानुसार केवळ पंतप्रधानांचा एसपीजी सुरक्षा देण्यात येते हे उघड आहे.
-
मारन यांच्या प्रश्नामध्ये विचारण्यात आलेल्या सीआरपीएफ सुरक्षेअंतर्गत असणाऱ्या अती महत्वाच्या व्यक्तींची माहिती रेड्डींनी दिली नाही. सुरक्षेच्या कारणामुळे ही माहिती देता येणार नाही असं रेड्डींनी स्पष्ट केलं. सीआरपीएफ सध्या देशातील ५६ अती महत्वाच्या व्यक्तींना सुरक्षा पुरवते इतकीच माहिती रेड्डींनी दिली होती.
-
केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी एखाद्या व्यक्तीला किती धोका आहे यासंदर्भात दिलेल्या अहवालाच्या आधारे त्याला किती सुरक्षा पुरवण्यात यावी हे ठरवले जाते. वेळोवेळी या सुरक्षेचा आढावा घेतला जातो. या अहवालाच्या आधारेच सुरक्षा वाढवली किंवा कमी केली जाते असं रेड्डी यांनी सांगितलं होतं.
-
एसपीजीची स्थापना का करण्यात आली? > देशामध्ये एसपीजीचे तीन हजार विशेष जवान आहेत. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एसपीजीची स्थापना करण्यात आली. राजीव गांधी पंतप्रधान असताना या सुरक्षादलाची स्थापना कऱण्यात आली होती.
-
पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा पुरवणे हे एसपीजीचे मुख्य उद्दीष्ट होतं. त्यामुळेच सोनिया गांधी आणि राहुल गांधी तसेच प्रियंका गांधी यांना एसपीजी सुरक्षा पुरवण्यात येत होती.
-
एसपीजी जवानांना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण दिलं जातं. अमेरिकेतील स्टेट सीक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सला जे प्रशिक्षण दिलं जातं तसंच हे प्रशिक्षण असतं.
-
पंतप्रधानांच्या चारही बाजूंनी त्यांना वेढा घालून सुरक्षितपणे त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना हे जवान सिक्युरीटी कव्हर देतात.
-
एसपीजी जवानांबरोबरच पंतप्रधानांच्या ताफ्यामध्ये एक डझन गाड्या असतात.
-
यामध्ये बीएमडब्ल्यू सेव्हन सीरीजच्या सिडान, ६ बीएमडबल्यू एक्स थ्री आणि एक मर्सिडीज बेन्झ असते.
-
याचबरोबरच आपत्कालीन स्थितीमध्ये रुग्णवाहिका म्हणून वापरता येईल अशापद्धतीची विशेष रचाना मर्सिडीज बेन्झ आणि टाटा सफारी जॅमरसारख्या गाड्याही ताफ्यात असतात.
-
यामध्ये बीएमडब्ल्यू सेव्हन सीरीजच्या सिडान, ६ बीएमडबल्यू एक्स थ्री आणि एक मर्सिडीज बेन्झ असते. याचबरोबर या ताफ्यामधील गाड्या अनेकदा बदलत असल्या तरी त्या आलीशान आणि सुरक्षित असतात.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भाजपाचा देशातील मुख्य चेहरा आहेत. अगदी राज्यातील निवडणुकांपासून ते वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी मोदी देशभरात दौरे करतात. मोदींनी मागील सात वर्षांच्या कार्यकाळामध्ये अनेक परदेश दौरेही केले आहेत.
-
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दहा वर्षांमध्ये केलेल्या परदेश दौऱ्यांपेक्षा मोदींनी पाच वर्षात अधिक परदेश दौरे केले आहेत. मनमोहन सिंग यांनी दहा वर्षात ९३ परदेश दौरे केले तर मोदींनी अवघ्या सहा वर्षात ९३ हून अधिक परदेश दौरे केले आहेत. परदेश दौऱ्यामध्येही मोदींभोवती एसपीजी कमांडोजचे सुरक्षाकडे असते.
-
खर्च किती? > एसपीजीसाठीची आर्थिक तरतूद सातत्याने वाढताना दिसत आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार २०१४-१५ मध्ये जेव्हा मोदी सरकार सत्तेत आलं तेव्हा एसपीजीचं बजेट २८९ कोटी इतकं होतं.
-
सन २०१५-१६ मध्ये हे बजेट वाढवून ३३० कोटी रुपये करण्यात आलं. २०१९-२० च्या आर्थिक वर्षामध्ये एसपीजीसाठीचं बजेट ५४० कोटी १६ लाख इतकं वाढवण्यात आलं.
-
त्यानंतर २०२१-२२ साली एसपीजीचं बजेट ४२९ कोटी ५ लाख इतकं ठेवण्यात आलं. नवीन नियमांच्या बदलांनुसार आता केवळ पंतप्रधानांना म्हणजेच मोदींना एसपीजीची सुरक्षा पुरवली जाते.
-
म्हणजेच पंतप्रधान मोदींना सुरक्षा पुरवण्यासाठी रोज एसपीजीवर तब्बल १ कोटी १७ लाख रुपये खर्च केले जातात.
२०२० च्या आकडेवारीनुसार मोदींना सुरक्षा पुरवण्यासाठी आता एसपीजीला ५९२ कोटींचा निधी देण्यात आला होता. -
म्हणजेच या वर्षाचा हिशोब केल्यास मोदींना एसपीजी सुरक्षा पुरवण्यासाठी दिवसाचा खर्च १ कोटी ६२ लाख रुपये इतका होता. म्हणजेच दर मिनिटाला मोदींच्या सुरक्षेसाठी ११ हजार २६३ रुपये खर्च व्हायचे. आज म्हणजेच २०२२ मध्ये ही आकडेवारी वेगळी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. ही सुरक्षा पुरवण्याची सर्व जबाबदारी थेट गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येते. (सर्व फोटो पीटीआय, एएनआय, आयएएनएस, रॉयटर्सवरुन साभार)
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…