-
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा देणारा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाने घेतलाय. ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक एक येथे उभारलेल्या ‘छाबय्या विहंग गार्डन’ या गृहसंकुलातील अनधिकृत बांधकामासाठी ठाणे पालिकेने ठोठावलेला दंड व त्यावरील व्याज वित्त विभागाचा विरोध डावलून माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय.
-
यामुळे आता सरनाईक यांना पाठवलेली ४ कोटी ३३ लाख ९७ हजारांची नोटीस रद्द होणार असून ही रक्कम आता सरनाईक यांना भरावी लागणार नाहीय. एवढी मोठी सवलत देण्यात आल्याने सरनाईक कुटुंब पुन्हा चर्चेत आहे.
-
कधी ईडीने केलेली कारवाई तर कधी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अशा वेगवेगळ्या कारणांसाठी मागील बऱ्याच काळापासून वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणारे सरनाईक या दंडमाफीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. ठाण्यातील राजकारणामध्ये दबदबा असणाऱ्या प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल आपण या गॅलरीमध्ये जाणून घेऊयात…
-
कोणता नियम मोडला? > आमदार सरनाईक यांनी उभारलेल्या गृहसंकुलातील १३ मजली इमारतींमधील चार मजले अनधिकृत असल्याने ठाणे महानगरपालिकेने नोटीस बजावली होती. विहंग गार्डनमध्ये बांधकाम चटईक्षेत्र निर्देशांक (कंस्ट्रक्शन टीडीआर) च्या माध्यमातून पालिकेस माजिवडा येथे शाळा बांधून दिली असून त्याचा अनुज्ञेय चटईक्षेत्र निर्देशांक विहंग गार्डन येथील इमारतीमध्ये वापरल्याने कोणत्याही नियमाचा भंग झालेला नसल्याचा दावा सरनाईक यांनी सरकारकडे केला होता. तर टीडीआर मंजूर करून न घेताच सरनाईक यांनी बांधकाम केल्याने ते अनधिकृत ठरवत तत्कालीन महापालिका आयुक्तांनी हे बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते.
-
कालांतराने हे बांधकाम दंड आकारून नियमित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्यानुसार तीन कोटी ३३ लाख ९६ हजार दंड भरण्यास सांगण्यात आले होते. यापैकी २५ लाख रुपये विकासकाने म्हणजेच सरनाईक यांनी महापालिकेकडे जमा केले. मात्र, उर्वरित रक्कम भरली नाही.
-
त्यामुळे एप्रिल २०१८ ते जानेवारी २०२१ दरम्यानची तीन कोटी ८ लाख ९७ हजार थकबाकी आणि त्यावरील १८ टक्के प्रमाणे एक कोटी, २५ लाखाचे व्याज भरण्याबाबत विकासकास म्हणजेच सरनाईक यांना नोटीस बजाविण्यात आली होती.
-
मात्र आता मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे ४ कोटी ३३ लाख ९७ हजारांची नोटीस रद्द होणार असून सरनाईक यांना दिलासा मिळणार आहे.
-
एखाद्या प्रकल्पाला अशी सवलत दिल्यास अन्य अनधिकृत बांधकामांसाठी अशीच मागणी पुढे येईल, असा धोक्याचा इशाराही वित्त विभागाने दिला होता. परंतु, शिवसेनेकडे असलेल्या नगरविकास विभागाने स्वपक्षीय वादग्रस्त आमदाराला खूश करण्यासाठी चुकीचा पायंडा पाडला आहे.
-
दंड व त्यावरील व्याज माफ केल्याने राज्य शासनावर प्रत्यक्ष बोजा पडणार नाही, या एका मुद्यावर मंत्रिमंडळाने प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामाला अभय दिले आहे.
-
मात्र सरनाईक आणि त्यांची मुलं यापूर्वीही वेगवेगळ्या प्रकरणांमुळे चर्चेत आली आहेत. कधी ईडीने केलेल्या कारवाईमुळे तर इतर आरोप प्रत्यारोपांमुळे हे कुटुंब चर्चेत असतं.
-
प्रताप सरनाईक यांच्या कुटुंबाबद्दल तसेच त्यांच्या संपत्तीबद्दल आणि राजकीय प्रवासावर नजर टाकल्यास असं दिसून येईल की ठाकरे कुटुंबियांसोबत त्यांचे अगदी घरोब्याचे संबंध आहेत. कसा आहे सरनाईक यांचा हा प्रवास पाहुयात सविस्तर…
-
प्रताप सरनाईक हे २०१९ साली शिवसेनेकडून सलग तिसऱ्यांदा विधानसभेत आमदारपदी निवडून आले आहेत. सरनाईक हे ठाण्यातील ओवळा माजिवाडा मतदारसंघाचे आमदार आहेत.
-
सरनाईक यांचा जन्म वर्ध्याचा असून ते ६५ वर्षांचे आहेत. लहानपणीच ते वर्ध्यातून मुंबईला स्थायिक झालेत.
-
प्रताप सरनाईक यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं आहे. डोंबवली पूर्वेतील एस. व्ही. जोशी शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं.
-
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ रिक्षाही चालवली. त्यानंतर सरनाईक राष्ट्रवादीचे सदस्य झाले आणि १९९७ साली त्यांनी सक्रीय राजकरणामध्ये उडी घेतली.
-
सरनाईक हे सध्या जरी शिवसेनेत असले तरी त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ही राष्ट्रवादीमधून झाली.
-
१९९७ साली ते पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले.
-
२००८ मध्ये सरनाईकांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
-
लगेचच पुढच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रताप सरनाईकांना पक्षाकडून तिकीट मिळाले आणि ते ठाण्यातून शिवसेनेच्या तिकीटावर आमदार झाले.
-
प्रताप सरनाईक यांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव विहंग असून धाकट्या मुलाचे नाव पूर्वेश आहे. दोघेही युवासेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत.
-
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचे घनिष्ठ संबंध आहेत.
-
पूर्वेश सरनाईक हे युवासेनेचे सचिव असून युवासेनेच्या कामांमध्ये ते सक्रियपणे सहभागी होतात.
-
पूर्वेश यांची पत्नी परिशा सरनाईक या ठाणे महानगरपालिकेत नगरसेविका आहेत. त्या प्रभाग क्रमांक २९ चे प्रतिनिधित्व करतात.
-
विहंग ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष म्हणून प्रताप सरनाईक यांचं नाव १९८९ पासून ठाणे शहरातील अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये नोंद केलेलं आहे.
-
विहंग शांतिवन, विहंग गार्डन, सृष्टी कॉम्प्लेक्स, विहंग रेसिडेन्सी, विहंग टॉवर, विहंग पार्क, रौनक टॉवर, विहंग आर्केड आणि रौनक आर्केड असे विहंग रिअल इस्टेटने उभारलेले अनेक रहिवासी प्रकल्प ठाण्यात आहेत.
-
घोडबंदर रोडला मानपाड्याजवळ प्रताप सरनाईक यांचे विहंग्ज इन हे थ्री-स्टार हॉटेलही आहे.
-
विहंग्ज पाम क्लबचीही मालकीही सरनाईक यांच्या विहंग्ज ग्रुपकडे आहे. स्विमिंग पूल, हेल्थ क्लब, जाकूझी आणि स्क्वॅश अशा अत्याधुनिक सोयी या क्लबमध्ये आहेत.
-
ठाण्यामध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या करण्यात ज्या प्रमुख राजकीय नेत्यांच्या समावेश होता त्यात प्रताप सरनाईक यांचं नाव आवर्जून घेतलं जातं.
-
सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली संस्कृती युवा प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे वर्तकनगर येथे दहीहंडीचे आयोजन केलं जातं.
-
अर्णब गोस्वामींविरोधात हक्कभंगाची प्रस्ताव आणण्यापासून ते कंगानाविरोधात उघडपणे भूमिका घेतल्याने महिला आयोगाने नोटीस पाठवण्यापर्यंत अनेक गोष्टींमुळे सरनाईक कायमच चर्चेत राहिल्याचे पहायला मिळालं आहे.
-
मध्यंतरी त्यांनी उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं होतं. ज्यात त्यांनी ईडीच्या कारवाईनंतर भाजपा शिवसेना संघर्षामध्ये आमच्यासारख्यांना त्रास होतो अशापद्धतीचं वक्तव्य करत भाजपासोबत समेट करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख असणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे केलेली.
-
अनेक सार्जनिक व्यासपीठांवर सरनाईक कुटुंबातील सदस्य एकत्र दिसून येतात.
-
सध्या शिवेसेना आणि राष्ट्रवादी राज्यामध्ये एकत्र सत्तेत असल्याने ठाणे महानगरपालिकेच्या अनेक कार्यक्रमांमध्ये शिवसेना राष्ट्रवादीचे नेते एकत्र दिसून येतात. अशाच एका कार्यक्रमातील हा फोटो ज्यामध्ये सरनाई त्यांचे जुने पक्ष सहकारी असणाऱ्या जितेंद्र आव्हाडांसोबत दिसत आहेत.
-
सरनाईक यांनी २०१९ साली निवडणूक अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण (स्थावर आणि जंगम एकत्रित) मालमत्ता १२५ कोटींहून अधिक आहे. (सर्व फोटो एनएनआय आणि प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक यांच्या फेसबुक पेजवरुन साभार)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”