-
अमेरिकेतील प्रसिद्ध विद्युत कार म्हणजेच इलेक्ट्रीक कार उत्पादक कंपनी म्हणजे ‘टेस्ला’ (Tesla) (फोटो: Indian Express)
-
अनेकांना हवी हवीशी वाटणाऱ्या या कार कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क (Elon Musk) हे आहेत. (फोटो: Indian Express)
-
मुकेश अंबानींसह भारतात फक्त चार जणांकडे टेस्ला कार आहे. (फोटो: Indian Express)
-
मुकेश अंबानी हे देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे नाव घेतले जाते. अफाट संपत्तीचे मालक मुकेश अंबानी यांच्याकडे अनेक वाहने आहेत. यामध्ये त्याच्याकडे टेस्ला कार देखील आहे. (फोटो: Indian Express)
-
मुकेश अंबानी यांच्याकडे दोन टेस्ला कार आहेत. त्याने २०१९ मध्ये टेस्लाचे S100D मॉडेल विकत घेतले. (फोटो: जनसत्ता)
-
यानंतर मुकेश अंबानी यांनी दुसरी टेस्ला कार खरेदी केली. टेस्लाचा X 100D देखील रिलायन्स चीफच्या संग्रहात आहे. (फोटो: जनसत्ता)
-
भारतातील टेस्ला कारच्या मालकांमध्ये मुकेश अंबानींशिवाय रितेश देशमुखचेही नाव आहे. रितेशकडे टेस्ला मॉडेल एक्स कार आहे. (फोटो: Financial Express)
-
एस्सार ग्रुपचे प्रशांत रुईया यांच्याकडेही टेस्लाची मॉल एक्स कार आहे. या कारची किंमत सुमारे २ कोटी रुपये आहे. (फोटो: Financial Express)
-
टेस्ला कार मालकांच्या यादीत चौथी भारतीय अभिनेत्री पूजा बत्रा आहे. पूजाकडे टेस्ला मॉल ३ कार आहे. ती अमेरिकेत राहात असताना तिने कार विकत घेतली. (फोटो: जनसत्ता)
भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल