-
सध्या सोशल नेटवर्किंगपासून टीव्ही श्रेत्रामध्ये सर्वाधिक चर्चेत असणारा कार्यक्रम आहे, शार्क टँक इंडिया.
-
नवउद्योजकांना आर्थिक हातभार लावण्यासाठी मदतीचा हात पुढे करणारे शार्क म्हणजेच मोठे गुंतवणूकदार आणि या उद्योजकांच्या एकसो एक भन्नाट कल्पना असं या आगळ्यावेगळ्या रिअॅलिटी शोचं रुप आहे.
-
शार्क टँक इंडियामधील शार्क हे आज घरोघरी ओळखीचे चेहरे झाले आहेत.
-
विशेष म्हणजे अमन गुप्ता, पियुष बन्सल, अनुपम मित्तल, अशनीर ग्रोव्हर, नमिता थापर यासारखे चेहरे तर आता तरुणाईला लगेच ओळखू येऊ लागलेत.
-
या कार्यक्रमाने रोजच्या वापरातील कंपन्यांमधील हे बडे चेहरे कोण आहेत हे समोर आणलंय. विशेष म्हणजे लाखो रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या या लोकांची संपत्ती आहे तरी किती असा प्रश्न अनेकांना पडतोय. त्यावरच या गॅलरीमधून टाकलेली नजर.
-
विनिता सिंग या शार्क टँक इंडियामधील आघाडीच्या महिला गुंतवणुकदारांपैकी एक आहेत.
-
फार विचारपूर्वक पद्धतीने गुंतवणूक करणाऱ्या विनिता या शुगर कॉसमॅटिक कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक आहेत.
-
विनिता यांची एकूण संपत्ती ५९ कोटी इतकी आहे.
-
कार्यक्रमामध्ये फार उशीरा प्रवेश केलेल्या शार्क म्हणजेच गझल अलघ.
-
ममाअर्थ कंपनीच्या संस्थापक असणाऱ्या गझल या प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि कम्युनिटी मॅनेजमेंट क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.
-
अल्पावधीमध्ये त्यांच्या कंपनीने अमाप प्रसिद्धी मिळवलीय.
-
गझल यांची एकूण संपत्ती १४८ कोटी इतकी आहे.
-
फार विचार करुन गुंतवणूक करणारा या कार्यक्रमामधील आणखीन एक शार्क म्हणजे अनुपम मित्तल.
-
पिपल ग्रुपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी असणारे अनुपम हे भारतीय ई कॉमर्स इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक आहेत.
-
शादी डॉट कॉम, मकान डॉट कॉमसारख्या साईट्समागील कनसेप्ट या अनुपम यांच्याच सुपिक डोक्यातील आहेत. त्यांनी ओलामध्येही एक कोटींची गुंतवणूक केलीय. ही कंपनीच्या मालकीच्या दोन टक्के इतकी आहे.
-
अनुपम यांची एकूण संपत्ती १८५ कोटी इतकी आहे.
-
नमिता थापर या शार्क टँक इंडियामधील आघाडीच्या महिला गुंतवणूकदार आहेत.
-
इमिक्युअर फार्मास्युटिकल्स या औषध विक्री क्षेत्रातील कंपनीच्या मुख्य निर्देशक असणाऱ्या नमिता थापर या भारतीय उद्योगजगतामधील एका ग्लॅमरस चेहऱ्यापैकी एक आहेत.
-
नमिता या त्यांच्या कमेंट्समुळे आणि गुंतवणूक करण्याच्या पद्धतीमुळे सोशल मिडियावर चर्चेचा विषय आहेत.
-
त्यांच्या कमेंटस आणि वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मिम्सचाही भाग झाली आहेत.
-
नमिता या २००१ पासून अमेरिकेतील वेगवेगळ्या कंपन्यांशी संलग्न आहेत. त्यांनी फायनान्स आणि मार्केटींगमध्ये बरंच काम केलं आहे.
-
नमिता यांना त्यांच्या कामासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. नमिता यांची एकूण संपत्ती ६०० कोटींच्या आसपास आहे. ही आकडेवारी २०२१ ची आहे.
-
पियूष बन्सल हे ३६ वर्षांचे असून ते या कार्यक्रमामधील सारासार विचार करुन गुंतवणूक करणारे शार्क म्हणून ओळखले जातात.
-
लेन्सकार्ट या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणारे पियूष हे देशातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक आहेत.
-
लेन्सकार्टची २०१० साली स्थापना करण्याआधी पियूष हे २००७ साली अमेरिकेमध्ये मायक्रोसॉफ्टसाठी काम करायचे.
-
शार्क टँकमध्ये येणाऱ्या तंत्रज्ञानासंदर्भातील स्टार्टअपमध्ये गुंतवणुकीला आपली पहिली पसंती असल्याचं पियूष सांगतात. पियूष यांची एकूण संपत्ती ही ६०० कोटी इतकी आहे.
-
अमन गुप्ता हा बोट या डिजीटल डिव्हाइज बनवणाऱ्या कंपनीचा सहसंस्थापक आहे.
-
हेडफोन्स आणि इयरफोन हे मुख्य प्रोडक्ट विकणारी ही कंपनी आज तरुणाईमध्ये फार लोकप्रिय आहे.
-
त्याचप्रमाणे अमनही आता या कार्यक्रमामुळे तरुणाईत लोकप्रिय झाला आहे.
-
अनेक स्टार्टअप सुरु करणारे अमननेच गुंतवणूक करावी असं सांगताना या कार्यक्रमात दिसतात. अमनची एकूण संपत्ती ७०० कोटी रुपये इतकी आहे.
-
शार्क टँक इंडियामधील सर्वात फटकळ मतप्रदर्शन करणारा शार्क म्हणून अशनीर यांचं नाव घेतलं जातं.
-
आयआयटी दिल्ली, आयआयएम अमहदाबादचे माजी विद्यार्थी असणारे अशनीर हे भारत पे या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य निर्देशक आहेत.
-
अशनीर यांनी कोटक बँकेचे उपाध्यक्ष पदही भूषवलं आहे. सध्या त्यांच्या भारत पे कंपनीची सेवा १५० शहरांमध्ये ७५ लाख दुकानदार वापरतात.
-
अशनीर यांची एकूण संपत्ती ७०० कोटी इतकी आहे.
-
वयाच्या ४० व्या वर्षी अशनीर हे देशातील सर्वात यशस्वी कोट्याधीशांपैकी एक होते. (सर्व फोटो सोनी टीव्ही आणि शार्क टॅक इंडियावरुन तसेच सोशल नेटवर्किंगवरुन साभार)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…