-
भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे.
-
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणाऱ्या संचलनामध्ये या वर्षीही महाराष्ट्राच्या चित्ररथाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
-
राजपथावर झालेल्या संचलनात यंदा ‘महाराष्ट्रातील जैवविविधता’ या विषयावर आधारित चित्ररथ सादर करण्यात आला.
-
या चित्ररथावर सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील फुले व प्राण्यांच्या प्रजातीचा समावेश करण्यात आला.
-
कास पठाराचा चित्ररथात समावेश झाल्याने सातार्यासाठी ही बाब भूषणावह ठरली.
-
कास पठाराला फुलांची व्हॅली म्हणूनही ओळखले जाते.
-
पश्चिम घाटावरील जैवविविधता समृद्ध क्षेत्र म्हणून २०१२ मध्ये संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (युनेस्को)ने जागतिक नैसर्गिक वारसास्थळ घोषित केले होते.
-
हे विविध प्रकारच्या हंगामी वन्य फुलांसाठी आणि स्थानिक फुलपाखरांच्या प्रजातींसाठी ओळखले जाते.
-
फुलांच्या ८५० पेक्षा जास्त प्रजाती या पठारावर आढळून येतात. ज्यात ऑर्किड, झुडूप आणि मांसाहारी वनस्पतींचा समावेश आहे. त्यामुळे हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ बनले आहे.
-
कास पठाराप्रमाणेच माळढोक पक्षी, ग्रेट इंडियन बस्टर्ड आणि खेकड्याच्या नवीन शोधलेल्या प्रजातींची प्रतिकृती देखील आहे.
-
याशिवाय वाघ, फ्लेमिंगो, मासे, गिधाड आणि घुबडाची प्रतिकृती आहे.
-
चित्ररथावरील महाराष्ट्राचा राज्यपक्षी ‘हरियाल’च्या प्रतिकृतीवर अनेकांच्या नजरा खिळल्या. शेकरू हा राज्यप्राणी तर हरियाल हा राज्यपक्षी आहे.
-
चित्ररथाच्या पुढच्या भागात महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू ‘ब्ल्यू मॉरमॉन’च्या आठ फूट उंचीच्या देखण्या प्रतिकृतीने चित्ररथाची शोभा वाढवली.
-
राज्याच्या चित्ररथात फुलपाखराचे आठ फूट उंच आणि सहा फूट रुंद मॉडेल असेल.
-
प्रतिकृती घेऊन जाणार्या स्टेजला जारुल आणि ताम्हण या राज्य फुलांनी सुशोभित केले आहे.

Highest Total in Champions Trophy: इंग्लंड संघाने घडवला इतिहास, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील उभारली सर्वात मोठी धावसंख्या