-
हा फोटो तुम्हाला एडीटींगची कमाल वाटत असेल तर जरा थांबा.
-
छप्पर खाली आणि फरशीच्या बाजूचा भाग आकाशाकडे अशा अवस्थेतील हे घर खरोखर अस्तित्वात आहे.
-
दरवर्षी हजारो पर्यटक या घराला भेट देतात असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
-
हे घर बाहेरुन जितकं भन्नाट दिसतंय त्याहून अधिक चमत्कारिक ते आतून आहे.
-
अर्थात आतापर्यंतचे फोटो पाहून तुम्ही गोंधळला असणार पण जरा थांबा कारण हा गोंधळ अजून वाढणार आहे. हे घर नक्की कुठे आहे आणि ते असं काय याबद्दल आपण जाणून घेऊयात…
-
जगात एकाहून एक भन्नाट गोष्टी आहे. याच भन्नाट गोष्टींमध्ये समावेश होतो दक्षिण आफ्रिकेमधील एका उलट्या घराचा.
-
जोहान्सबर्गपासून ४५ मैलांवर असणाऱ्या बॉर्डरस्ट्रोम येथे हे उलटं घर आहे.
-
हे घर केवळ बाहेरुनच नाही तर आतूनही उलटं आहे.
-
या घरातील फोटो पाहून तुम्ही सुद्धा चक्रावून जाल यात शंका नाही.
-
या घराचे फोटो सोशल मीडियावर अनेकांना चक्रावून सोडतात. म्हणजे फोटो पाहूनच घराचं छप्पर कुठे आहे आणि लाद्या कुठे आहेत हे पाहता क्षणी समजत नाही.
-
घराचं छप्पर जमीनीच्या बाजूला बांधण्यात आलंय तर जो लाद्यांचा भाग असतो तो छप्पराच्या जागीय.
-
या आगळ्या वेगळ्या रचनेमुळे जगभरातून लोक इथे पर्यटनासाठी येतात आणि अर्थात घर पाहून चक्रावून जातात.
-
या घराला फारच ब्राइट रंग देण्यात आल्याने अजून गोंधळ वाढतो.
-
या घराच्या रचनेबरोबरच त्याचे रंगही लक्ष वेधून घेतात. काही पर्यटकांना या घराचा रंग आवडतो तर काहींना याची रचना.
-
हार्टबीस्टपोर्टजवळ असणारं हे घर आता सोशल मीडियावरुन जगभरामध्ये लोकप्रिय होत आहे. हे येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळ झालंय.
-
येथे भेट देणाऱ्या लोकांचा आधी गोंधळ उडतो आणि नंतर केवळ त्यांचे कॅमेरा बोलतात, कारण येथे आलेत आणि फोटो काढले नाहीत असे पर्यटक इथे सापडणं कठीण आहे.
-
घराच्या छप्पराला लटकलेले सोफे, खुर्च्या आणि फर्निचर आणि छप्परावर बसलेले लोक असे हे फोटो सोशल मीडियावर पाहिल्यावरही गोंधळ उडतो.
-
गुरुत्वाकर्षणाच्या नियमांनाही आव्हान देतील असेच हे फोटो आहेत.
-
किचनमध्ये उभं राहिलं तरी माणसं लटकत असल्याचा भास होतो.
-
या ठोमध्ये लटकणारा लॅपटॉप हा छताकडे आहे. नीट फोटो पाहिलात तर तुम्हाला कळेल.
-
किंवा या फोटोतील कमोड हे छताला लावण्यात आलंय.
-
या फोटोंमध्ये लोक सरळच उभी आहेत पण घराची रचना अशी आहे की ते लटकत असल्यासारखे वाटतायत.
या घराला भेट देण्याची वेळ मर्यादित आहे. हे घर पर्यटकांसाठी सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळातच सुरु असते. -
काहीतरी अटके पाहण्यासाठी येथे केवळ दक्षिण आफ्रिकेतूनच नाही तर जगभरातील पर्यटक येतात.
-
या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी तिकीट घ्यावं लागतं.
-
या घराच्या प्रमोशनसाठी एक इन्स्टाग्राम पेज तयार करण्यात आलं आहे.
-
या अकाऊंटवरुन फोटोही उलटेच टाकले जातात.
-
तुमचं जग अप साईड डाऊन फिरवणारं हे घर असल्याचं सांगितलं जातं.
-
काहीतरी भन्नाट गोष्ट साकारुन पर्यटकांना आकर्षित करण्याचा या घराचा हेतू साध्य होत असल्याचं दिसत आहे.
-
या घराचे फोटो टाकले जातात त्या पेजला नऊ हजार ९०० हून अधिक फॉलोअर्स आहेत. (सर्व फोटो instagram/upsidedownhousesa वरुन साभार)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच