-
सध्या सगळीकडेच व्हॅलेंटाईन वीकचं अगदी जोरदार सेलिब्रेशन सुरु आहे. प्रेमी युगूलांमुळे वातावरणातही प्रेमाचे वारे वाहू लागलेत.
-
फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स अॅपवर तर प्रेमाचा पाऊस पडतोय. त्यामुळे सगळंच कसं प्रेममय झालंय.
-
१४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे आहे. इतरांप्रमाणे तुमचाही व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पार्टनरसोबत डेटवर जाण्याचा प्लॅन असेल तर थोडा वेळ काढून काही खास गोष्टींबद्दल आवर्जून वाचा.
-
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत पहिल्यांदाच डेटवर जात असाल तर थोडं सबुरीने घ्या. बॉलिवूड चित्रपटांत दाखवतात त्याप्रमाणे लगेच तुमचं प्रेम व्यक्त करू नका. एकमेकांना समजून घ्यायला थोडा वेळ द्या. कारण ‘सबर का फल मीठा होता है’.
-
पण जर तुम्ही तुमच्या पार्टनरला आधीपासून ओळखत असाल आणि तुमचं एकमेकांवर खूप प्रेम असेल तर मग कशाला घाबरताय? बिनधास्त ‘आय लव्ह यू’ म्हणून टाका.
-
कधी कधी आपल्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडत नाहीत. तुम्ही प्लॅन केल्याप्रमाणे व्हॅलेंटाईन डे साजरा होत नसेल तर निराश होऊ नका. तुमच्या पार्टनरला थोडा वेळ द्या. कदाचित, पुढे जाऊन तुमच्या मनातील भावना पार्टनरपर्यंत नक्की पोहोचतील.
-
पार्टनरसोबत डेटवर असताना चुकूनही दुसऱ्या मुलीकडे बघू नका. यामधून तुम्ही तुमच्या पार्टनरला महत्त्व देत नाही आहात, असं जाणवतं.
-
ही टीप खास मुलींसाठी आहे. अनेक मुलींना सतत बोलायची सवय असते. यावेळी डेटवर मात्र तुमच्या पार्टनरला बोलू द्या.
-
कदाचित, तुम्हाला काही तरी खास ऐकायला मिळेल. ज्यामुळे तुमचा व्हॅलेंटाईन डे एकदम स्पेशल होऊन जाईल.
-
बॉलिवूड चित्रपट बघून काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करू नका. शांत ठिकाणी डेटवर जाऊन पार्टनरसोबत गप्पा मारत आठवणीत राहील असा व्हॅलेंटाईन डे साजरा करा.
-
डेटवर असताना मुलांनी चुकूनही पैसे दाखवून मोठेपणा करायला जाऊ नका. यामुळे तुमच्या पार्टनरवर तुमच्याबद्दल वाईट छाप पडू शकते.
-
पार्टनरला प्रेमाने आणि आपुलकीने वागणूक देऊन ते तुमच्यासाठी किती खास आहेत याची जाणीव करून देऊ शकता.

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य