-
मुंबापुरीच्या पर्यटनस्थळांमध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय (राणीची बाग) गुरुवारपासून पुन्हा खुले करण्यात आले.
-
पहिल्याच दिवशी येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.
-
पालिकेने राणीच्या बागेच्या नूतनीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे.
-
या प्रकल्पाअंतर्गत राणीची बाग कात टाकू लागली आहे.
-
आधुनिक तंत्रज्ञान, देश-विदेशातील प्राणिसंग्रहालयांचा अभ्यास आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन याच्या आधारावर नव्याने बांधण्यात आलेले पिजरे आणि सुशोभीकरण यामुळे पर्यटकांची पावले राणीच्या बागेकडे वळू लागली आहेत.
-
त्यातच राणीच्या बागेचे रुपडे बदलल्यापासूनच पर्यटकांचा प्रतिसादात वाढू लागला आहे.
-
राणीच्या बागेतील हम्बोल्ट पेंग्विन आणि वाघ पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरले आहेत.
-
नव्याने खुले झालेले पक्षी दालनही पर्यटकांच्या पसंतीला उतरले आहे.
-
वन्य अधिवासातील या पक्ष्यांना काचेतून पाहता येते. यामध्ये धनेश, लांडोर, गोल्डन फेजन्ट, पोपटांचे विविध प्रकार, मिलिटरी मकाऊ, आफ्रिकन ग्रे पॅरेट, कॉकिटेल आदी अनेक पक्ष्यांचा समावेश आहे.
-
(सर्व फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

“माझ्या दोन्ही मुलांना हृदयविकार, उपचाराकरता आम्हाला भारतात राहू द्या”, पाकिस्तानी नागरिकाची भारताला विनंती!