-
भारताचा स्फोटक फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंतने नुकत्याच त्याच्या गर्लफ्रेण्डला म्हणजेच ईशा नेगीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
मागील बऱ्याच काळापासून पंत आणि ईशाच्या नात्यांबद्दल सोशल मीडियावर चर्चा आहे.
-
दोघांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुनही त्यांच्या नात्यांमधील जवळीक दिसून येते.
-
दोन वर्षांपूर्वी पंतने ईशासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचे फोटो शेअर केले होते.
-
यानंतरपासूनच या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा सुरु झाल्या.
-
ईशा तशी कायमच तिच्या ग्लॅमरस लूक आणि पोस्टसाठी चर्चेत असते. यंदा मात्र ती पंतमुळे पुन्हा चर्चेत आहे.
-
नुकताच ईशाचा वाढदिवस झाला.
-
पंतने इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये ईशाचा एक फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
-
ईशानेही या शुभेच्छांना दिलेला रिप्लाय सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
-
ईशाने पंतच्या स्टोरीचा स्क्रीनशॉर्ट आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत या शुभेच्छांवर रिप्लाय दिलाय.
-
ईशाचा फोटो शेअर करत हार्ट इमोजीसहीत तिला टॅग करुन पंतने इन्स्टाग्राम स्टोरीमधून प्रेयसीला शुभेच्छा दिल्या.
-
हाच स्क्रीनशॉर्ट शेअर करत ईशाने पंतला, “आय लव्ह यू” असा रिप्लाय दिला.
-
ईशा ही मूळची देहरादूनची आहे. तिचा जन्म २० फेब्रुवारी १९९७ रोजी उत्तराखंड मधील देहरादूनच्या एका उच्चभ्रू कुटुंबात झाला.
-
ईशा ही एका श्रीमंत अशा राजपूत कुटुंबातून आहे. तिचे वडील यशस्वी उद्योजक आणि व्यावसायिक आहेत.
-
ईशाचे शालेय शिक्षण देहराडून मधील एका कॉन्व्हेंट शाळेत झाले आहे. तिने नोएडाच्या अमिटी महाविद्यालयातून कला शाखेतील पदवी (B.A.) संपादन केली आहे. तिने इंटेरिअर डिझायनर असून तिने या विषयातील तंत्रशुद्ध शिक्षण घेतले आहे. तसेच ती यशस्वी उद्योजिका आहे. (सर्व फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”