-
लोकसभेच्या २०१९ मधील निवडणुकीदरम्यान प्रकाशझोतात आलेल्या महिला अधिकारी रीना द्विवेदी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
-
लिंबू कलरची साडी आणि भुरळ पाडणारं सौंदर्य यामुळे रीना यांचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले होते.
-
नेटकऱ्यांनी त्यांनी ‘मिस जयपूर’चाही किताब दिला होता.
-
आता उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीनिमित्त त्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर प्रकाशझोतात आल्या आहेत.
-
लोकसभेच्या २०१९ मधील निवडणुकीदरम्यान प्रकाशझोतात आलेल्या महिला अधिकारी रीना द्विवेदी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
-
मात्र पूर्वी आपल्या साडीतील सौंदर्याने अनेकांना घायाळ करणाऱ्या रीना द्विवेदी यंदा इलेक्शन ड्युटीवर एकदम मॉडर्न लूकमध्ये दिसत आहेत.
-
रीना यांचे वेस्टर्न लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
-
उत्तर प्रदेशमधील चौथ्या टप्प्याचं मतदान आज पार पडत आहे. यापूर्वी काल तयारीनिमित्त रीना या ब्लॅक सिव्हलेस टॉप आणि व्हाइट ट्राउझरमध्ये दिसून आल्या.
-
मोहनलालगंज विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर यंदा रीना यांना इलेक्शन ड्युटीसाठी नियुक्त करण्यात आलंय.
-
डोळ्यांवर काळा गॉगल लावलेल्या रीना यांचे फोटो मागील वेळेप्रमाणे पुन्हा एकदा व्हायरल झाले आहेत. त्यांनी मतदान केंद्रावर प्रवेश करतानाचे हे फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेत आहेत.
-
रीना यांनी काल त्यांच्या अधिकार क्षेत्राखालील मतदान केंद्राची पहाणी केली.
-
लिंबू कलरची साडी नेसून इव्हीएम मशीन घेऊन जातानाचे रीना यांचे फोटो तीन वर्षांपूर्वी जसे व्हायरल झालेले तसेच त्यांचे फोटो आताही व्हायरल झालेत.
-
हाताता इव्हीएम मशीन, डोळ्यावर गॉगल आणि फोनवर बोलताना चालत जातानाचे रीना यांचे फोटो सोशल मीडियावर फार शेअर होतायत. त्या आल्या आणि त्यांनी पुन्हा त्यांच्या चाहत्यांची मनं आपल्या बोल्ड लूकने जिंकल्याची चर्चा सोशल नेटवर्किंगवर आहे.
-
रीना यांची ड्युटी २०१९ मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान लखनऊमधील कृष्णा नगरच्या महानगर इंटर कॉलेजमध्ये होती.
-
त्यावेळी रीना यांनी मतदानाच्या दिवशी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती.
-
रीना या २०१९ नंतर एवढ्या लोकप्रिय झाल्या आहेत की त्या जिथे जातात तिथे त्यांच्यासोबत लोक सेल्फी काढण्यासाठी गर्दी करतात.
-
काही वर्षांपूर्वी रीना यांचे फोटो व्हायरल झाले होते तर यंदा त्यांनीच हे फोटो शेअर केले आहेत.
-
सोशल मीडियावरही रीना फार सक्रीय असून तिथेही त्या स्वत:चे अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे २ लाख ७८ हजार फॉलोअर्स आहेत. (सर्व फोटो सोशल नेटवर्किंगवरुन साभार)

IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?