-
युक्रेन आणि रशियादरम्यान युद्धाला सुरुवात झालीय. या युद्धाचे जागतिक राजकारणावर आणि अर्थकारणावर परिणाम होत असून जगभरामध्ये या युद्धाची चर्चा आहे.
-
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीच गुरुवारी या युद्धाची घोषणा केलीय. हे युद्धा टाळता येणार नाही असं म्हणत त्यांनी युद्धाची घोषणा केलीय.
-
पुतिन यांच्या भाषणानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये युक्रेनमधील २५ ठिकाणांवर हवाई हल्ले रशियाने सुरु केले. मात्र तुम्हाला बलाढ्य रशियाच्या विरोधात उभ्या राहिलेल्या युक्रेनचं नेतृत्व कोणं करतंय आणि ती व्यक्ती आधी काय करायची हे माहितीय का?
-
युक्रेनचं नेतृत्व त्यांचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की करत आहेत. २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली असून या संकटाच्या प्रसंगात तेच युक्रेनची भूमिका जगासमोर मांडतायत.
-
राष्ट्रध्यक्ष होण्यापूर्वी वोलोडिमिर झेलेन्स्की हे एक अभिनेते आणि कॉमेडियन होते. वयाच्या १७ व्या वर्षापासून ते कॉमेडी करण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागले होते. त्यांनी आपल्या करियरची सुरुवात स्टॅण्डअप कॉमेडियन म्हणून केली आणि ते आज युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून जगभरात चर्चेत आहेत.
-
आज रशियाला आम्ही शेवटपर्यंत लढणार सांगणारे वोलोडिमिर झेलेन्स्की या वादात राहिलेल्या देशाचे सर्वोच्च नेते होण्याआधी अभिनेते होते.
-
वयाच्या १७ व्या वर्षी वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी केव्हीएन नवाच्या लोकल कॉमेडी शोमधील टीमचा सदस्य म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
-
त्यानंतर त्यांना राष्ट्रीय स्तरावरील एका कॉमेडी शोमध्ये आपल्या टीमसोबत सहभागी होण्याची संधी मिळालेली. ही स्पर्धा वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या टीमने १९९७ साली जिंकली होती.
याच वर्षी म्हणजेच १९९७ साली वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आपल्या पहिल्या गटापासून वेगळं होतं कॉमेडी स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी केव्हर्तल ९५ नावाचा गट स्थापन केला. -
वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या या गटाला तुफान लोकप्रियता मिळाली. १९९८ ते २००३ दरम्यान देशभरामध्ये हा गट लोकप्रिय झाला. सर्वाधिक कमाई करणारा गट म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली.
-
वोलोडिमिर झेलेन्स्की हे सध्या ज्या मॉस्कोला आम्ही घाबरत नाही असं सांगत आहेत त्याच मॉस्कोमध्ये त्यांच्या या गटाने लोकांचं मनोरंजन केलं होतं. या गटाने बराच काळ मॉस्कोमध्ये शो केले.
-
सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर निर्माण झालेल्या अनेक देशांमध्ये वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या गटाने दौरे करुन कार्यक्रम सादर केले.
-
२००३ साली वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या या गटाने युक्रेनमधील १ प्लस १ या चॅनेलसाठी मालिका निर्मिती करण्यास सुरुवात केली.
-
२००५ मध्ये वोलोडिमिर झेलेन्स्कीच्या गटाने इंटर नावाच्या युक्रेनमधील दुसऱ्या एका वाहिनीवरही मालिका निर्मिती सुरु केली.
-
मनोरंजन क्षेत्रामधील नवाजलेलं नाव म्हणून समोर येत असतानाच वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी २००८ साली लव्ह इन द बीग सीटी नावाच्या फिचर फिल्ममध्ये काम केलेलं.
-
त्यानंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही ते झळकले होते. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या तिसऱ्या भागामध्येही वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी लोकांना हसवलं होतं.
-
वोलोडिमिर झेलेन्स्की हे आता लोकप्रिय नट म्हणून उदयास आले होते.
-
त्यांनी ऑफिस रोमान्स, अवर टाइम यासारखे त्यांचे चित्रपट युक्रेनबरोबरच रशियापासून विभक्त झालेल्या देशांमध्ये चांगलेच गाजले.
-
२०१२ मध्ये वोलोडिमिर झेलेन्स्की यांची रिझव्हस्काय व्हेर्सेस नेपोलियन हा चित्रपट प्रदर्शित झाला. याच वर्षी त्यांचा ८ फर्स्ट डेट हा गाजलेला चित्रपट सुद्धा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दोन सीक्वेल २०१५ आणि २०१६ ला प्रदर्शित झालेले.
-
वोलोडिमिर झेलेन्स्की हे २०१० ते २०१२ दरम्यान इंटर या टीव्ही चॅनेलचे बोर्ड मेंबर आणि जनरल प्रोड्युसर होते.
-
२०१४ मध्ये वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या संस्कृतिक मंत्रालयाने रशियन कलाकारांवर बंदी घालण्याच्या निर्णयाचा विरोध केला होता.
-
२०१५ मध्ये युक्रेनमध्ये रशियन कलाकार आणि इतर कामांसाठी येणाऱ्या रशियन लोकांवर बंदी घालण्यात आलेली. मात्र याला विरोध केल्याचा राग मनात ठेऊन २०१८ मध्ये युक्रेन सरकारने वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती.
-
२०१५ मध्येच वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सर्व्हंट ऑफ द पीपल नावाच्या कार्यक्रमामध्ये काम केलं होतं. विशेष म्हणजे या कार्यक्रमात त्यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची भूमिका साकारली होती.
-
२०१७ साली प्रदर्शित झालेल्या वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या स्वॅते या सिरीजवर युक्रेनमध्ये बंदी घालण्यात आली.
वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी यात काम केलं होतं. मार्च २०१९ मध्ये यावरील बंदी हटवण्यात आली. -
वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियन भाषेमधील कार्यक्रमांची निर्मिती केली. त्यांचा पहिला युक्रेनी भाषेतीच चित्रपट ‘आय, यू, ही शी’ हा होता.
-
वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या या चित्रपटाची स्क्रीप्ट आधी युक्रेनीयन भाषेत लिहिण्यात आली. त्यानंतर अभिनेत्रीसाठी त्याचा रशियन अनुवाद करण्यात आलं. नंतर हे संवाद युक्रेनीयन भाषेत डब करण्यात आले. (सर्व फोटो रॉयटर्स, सोशल मीडिया आणि युक्रेन पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून साभार)
‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स