-
रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले आहे. यामुळे जगभरातील लोक विचारात पडले आहेत. महायुद्ध सुरु होणार का असे अनेक प्रश्न त्यांना पडले आहेत.
-
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या या युद्धामुळे जगभरात तणाव वाढत आहे. अमेरिका, ब्रिटन यासारखी बलाढ्य राष्ट्रं आणि युरोपियन युनियननं रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत.
-
इतकं होऊनही रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी माघार न घेता युक्रेनवरील आक्रमणाची कारवाई सुरूच ठेवली आहे.
-
त्यामुळे सध्याच्या घडीला पुतिन यांना जगातील सर्वांत शक्तिशाली राजकीय नेता मानलं जातं आहे. युक्रेनला पूर्णपणे नष्ट करण्याचा पुतिन यांचा मानस असल्याचं म्हटलं जात.
-
पण तुम्हाला वाचून धक्का बसेल की हेच पुतिन कधीकाळी एका युक्रेनियन महिलेला घाबरत होते. या महिलेच नाव युलिया तायमोशेन्को असं होतं.
-
युलिया या युक्रेनमध्ये ‘गॅस क्वीन’ म्हणून ओळखल्या जात होत्या. त्या नॅचरल गॅसचा उद्योग सांभाळत होत्या.
-
युक्रेनमधील सर्वात यशस्वी बिझनेसवुमनमध्ये त्यांचा समावेश होता. त्यानंतर त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला.
-
काहीकाळानंतर त्या युक्रेनच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. २००५ मध्ये काही महिने आणि नंतर २००७ ते २०१० पर्यंतच्या काळात त्या युक्रेनच्या पंतप्रधान होत्या.
-
या कार्यकाळात त्यांनी उघडपणे रशिया आणि पुतिन यांचा विरोध केला होता. एवढचं काय तर त्यांनी बऱ्याचवेळा रशियाला आव्हान केले होते.
-
आपल्या देशाची एक इंच जमिनही रशियाच्या हाती लागू देणार नाही. मग, त्यासाठी युद्ध करावं लागलं तरी चालेल, असे युलिया नेहमीच म्हणायच्या.
-
आक्रमकता दाखवणारा रशिया युलिया यांना कधीही घाबरवू शकला नाही. युक्रेनमध्ये जेव्हा युलिया यांची सत्ता होती, तेव्हा रशिया नेहमीच दोन पावलं मागे होता.
-
युक्रेनच्या सध्याच्या संकटानंतर तेथील जनता आपल्या धाडसी महिला पंतप्रधानांची आठवण काढत आहे. युलिया यांच्या हातात देशाचे नेतृत्व असते तर आज परिस्थिती वेगळी असती असे त्यांना वाटते.
-
२००५ मध्ये, जगप्रसिद्ध फोर्ब्स मॅगेझिननं जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत युलिया तायमोशेन्को यांना तिसरं स्थान दिलं होतं.
-
युलिया या केवळ युक्रेनच्याच नाही तर पूर्वीच्या सोव्हिएत युनियन देशांतील पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यांनी आपल्या कार्यकाळात पाश्चिमात्य देशांशी चांगले संबंध ठेवले होते.
-
युक्रेनचा नाटोमध्ये (NATO) समावेश व्हावा यासाठी त्या सतत प्रयत्न करत होत्या. तर २०१० मध्ये त्यांनी राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवली होती.
-
यावेळी त्यांचा पराभव झाला आणि तेव्हापासून त्यांची राजकीय कारकीर्द संकटात आली. युलिया पंतप्रधान असताना, रशिया समर्थक असलेल्या राष्ट्रपती व्हिक्टर युश्न्कोव्ह यांनी त्यांना तुरुंगात पाठवलं होतं.
-
रशियाबरोबरच्या गॅस करारात भ्रष्टाचार केल्याचे आरोप ठेवून त्यांचा छळ करण्यात आला. २०११ ते २०१४ या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला.
-
तर, तुरुंगात असताना त्यांना युरोपियन युनियन आणि अमेरिकेसह जगातील अनेक देशांचा पाठिंबा मिळाला. (All Photo Credit : Yulia Tymoshenko Instagram)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख