-
युक्रेन रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरामध्ये रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबतच आणखी एक नाव चर्चे आहे ते म्हणजे वोलोडिमिर झेलेन्स्क. ते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत.
-
युक्रेनची राजधानी किव्हवर रशियाचे हल्ले वाढत आहे. रशियन सैन्य किव्हच्या दिशेने जात आहे. यादरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आपण किव्हमध्येच थांबणार असून कुटुंबीय देखील किव्हमध्येच आहेत असं सांगितलं आहे.
-
आपण देश सोडून पळून जाणार नसल्याचं राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले आहेत.
-
अशातच झेलेन्स्की यांनी शुक्रवारी किव्हमधून एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओत त्यांनी रशियन आक्रमणापासून किव्हचे रक्षण करण्याचे वचन दिले आहे.
-
“आम्ही सर्व इथे आहोत. आमचे सैन्य इथं आहे. आपल्या समाजातील नागरिक येथे आहेत. आम्ही सर्व इथे आमच्या स्वातंत्र्याचे, आमच्या देशाचे रक्षण करत आहोत, आणि कायम इथे असेच उभे राहू,” असं झेलेन्स्की राष्ट्रपती भवनाच्या बाहेर उभं राहून म्हटलं आहे.
-
युक्रेनच्या संरक्षण विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून झेलेन्स्की यांचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
-
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी ऑलिव्ह ग्रीन रंगाचा लष्करी पोशाख परिधान केला असून ते त्यांचे पंतप्रधान, प्रमुख कर्मचारी आणि इतर सहाय्यकांसोबत उभे आहेत.
-
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दबावाला या व्हिडीओतून ते प्रत्युत्तर देत आहेत.
-
रशियन सैन्य किव्ह येथे असल्याने अशा परिस्थितीत अमेरिकेने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना किव्ह सोडण्यास सांगितले.
-
पण राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. लढा येथे सुरु आहे. आम्हाला शस्त्रे आणि दारूगोळा हवा आहे, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
-
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यामध्ये शुक्रवारी मदतीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
-
एपी न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार, या चर्चेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी वोलोडिमिर झेलेन्स्की यांना युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढण्याचा ‘एक्झिट प्लान’ दिला.
-
मात्र, यावेळी वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियन फौजांचा प्रतिकार करण्याचा निर्धार व्यक्त करत आपण कीवध्येच राहणार असल्याचं स्पष्टपणे सांगत अमेरिकेची मदत नाकारली आहे.
-
एपी वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, झेलेन्स्की यांनी रशियाच्या विरोधात ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगत अमेरिकेची मदत नाकारली आहे.
-
झेलेन्स्कीने म्हटले आहे की लढा येथे आहे आणि मला राईड नव्हे तर अँटी-टँक दारूगोळा हवा आहे. गेल्या तीन दिवसांपासून रशियन सैन्य युक्रेनवर चारही बाजूंनी हल्ले करत आहे.
-
रशियन फौजा कीवमध्ये शिरल्या असताना राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी मात्र लढण्याचा निर्धार केला आहे.
-
“इथे लढा सुरू झाला आहे. मला दारुगोळा हवाय, बाहेर पडण्यासाठीचा मार्ग नव्हे”, असं वोलोडिमिर झेलेन्स्की ठामपणे म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांचा लढण्याचा निर्धार कायम असल्याचं दिसून येत आहे.
-
वोलोडिमिर झेलेन्स्की यांचा निर्धार गेल्या दोन दिवसांत अनेक बाबतीत दिसून आला आहे. शुक्रवारी त्यांनी जारी केलेल्या एका निवेदनामध्ये आपण देश सोडून पळून जाणार नसल्याचं ठामपणे म्हटलं आहे.
-
“शत्रूनं (रशिया) मला त्यांचा नंबर वन टार्गेट केलं आहे. माझं कुटुंब हे त्यांचं नंबर दोनचं टार्गेट आहे हेही मला माहिती आहे,” असं त्यांनी म्हटलंय.
-
“त्यांना युक्रेनच्या राष्ट्रप्रमुखालाच लक्ष्य करून युक्रेनला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करायचं आहे. पण मी कुठेही पळून जाणार नाही. मी राजधानीतच राहणार आहे. माझं कुटुंब देखील युक्रेनमध्येच आहे”, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
-
झेलेन्स्की यांनी शनिवारी (२६ फेब्रुवारी २०२२) पुन्हा अफवांवर विश्वास ठेऊ नका असे म्हणत आणखी एक व्हिडीओ ट्विट केला.
-
आम्ही शस्त्रे खाली ठेवणार नाही, असेही झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. एएफपीच्या वृत्तानुसार या व्हिडिओमध्ये त्यांनी फेक न्यूजवर विश्वास ठेवू नका असे म्हटले आहे.
-
“आम्ही आमची शस्त्रे खाली ठेवणार नाही. आमची शस्त्रे हीच आमची ताकद आहे. आम्ही येथे आहोत आणि आम्ही आमच्या देशाचे रक्षण करू. ही आपली मातृभूमी आहे. आपला देश, आपली मुले. आम्ही सर्वांचे संरक्षण करू,” असा संदेश झेलेन्स्की यांनी आपल्या देशवासियांना दिला आहे.
-
झेलेन्स्की यांनी हा व्हिडिओ युक्रेनच्या राष्ट्रपती भवनाजवळ शूट केला आहे.
-
झेलेन्स्की यांच्या या व्हिडिओचे जगभरातील लोकांनी कौतुक केले आहे. लोकांनी त्यांना हिरो म्हटले आहे.
-
युक्रेन सैन्यासोबतचे लष्करी गणवेशामधील त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
-
लष्करी जवानांसोबतचे बुलेट प्रूफ जॅकेट घातलेले वोलोडिमिर झेलेन्स्क यांचे फोटो जुने असले तरी सध्या ते ज्या पद्धतीने लढतायत त्यासाठी त्यांच्यावर हे फोटो शेअर करत कौतुकाचा वर्षाव केला जातोय.
-
अनेकांनी नेता असावा तर असा असं म्हटलंय. अनेकांनी वोलोडिमिर झेलेन्स्क हे फार हिंमत दाखवून युक्रेनचं नेतृत्व करत असल्याचं मत व्यक्त केलंय.
-
२०१९ मध्ये वोलोडिमिर झेलेन्स्क यांनी राष्ट्रध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली असून या संकटाच्या प्रसंगात तेच युक्रेनची भूमिका जगासमोर मांडतायत.
-
राष्ट्रध्यक्ष होण्यापूर्वी वोलोडिमिर झेलेन्स्की हे एक अभिनेते आणि कॉमेडियन होते. वयाच्या १७ व्या वर्षापासून ते कॉमेडी करण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागले होते. त्यांनी आपल्या करियरची सुरुवात स्टॅण्डअप कॉमेडियन म्हणून केली आणि ते आज युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून जगभरात चर्चेत आहेत.
-
रशियाने हल्ला चढवलेला असताना आपल्या देशवासियांचे आणि लष्कराचे धैर्य वाढवण्यासाठी वोलोडिमिर झेलेन्स्क सैनिकांसोबत चर्चा करत आहेत.
२०१५ मध्येच वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सर्व्हंट ऑफ द पीपल नावाच्या कार्यक्रमामध्ये काम केलं होतं. विशेष म्हणजे या कार्यक्रमात त्यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची भूमिका साकारली होती. -
२०१९ साली अभिनेते असणाऱ्या वोलोडिमिर झेलेन्स्क यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला तेव्हा काही देशांमध्ये त्यांची खिल्ली उडवण्यात आलेली. हा अभिनेता काय करणार असे प्रश्न काही देशांनी उपस्थित केलेले.
-
आज तेच वोलोडिमिर झेलेन्स्क रशियासारख्या बलाढ्य देशाविरोधात लढण्यासाठी आपल्या नागरिकांना आणि जवानांना प्रोत्साहन देत आहेत.
-
नाटो, पुतिन अनेक आंतरराष्ट्रीय आघाड्या युद्ध असं सारं काही वोलोडिमिर झेलेन्स्क योग्य पणे हाताळत असल्याचं अनेकांनी सोशल नेटवर्किंगवर म्हटलंय.
-
आपल्या देशासाठी एवढ्या ठापणे उबे राहणारे वोलोडिमिर झेलेन्स्क हे रिअल लाइफ हिरो असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. (फोटो सोशल मीडिया आणि रॉयटर्सवरुन साभार)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स