-
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी पाच दिवसांपूर्वी युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केल्यापासून त्यांच्याविरोधात जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये आंदोलनं, मोर्चे काढले जात आहेत. पुतिन यांची ही भूमिका चुकीची असल्याचा दावा करणारे अनेक पोस्टर्स हातात घेऊन आंदोलनकर्ते युक्रेनच्या राष्ट्रध्वजासहीत रस्त्यावर उतरुन आंदोलन करताना दिसत आहेत. अशाच काही पुतिनविरोधी आंदोलनाच्या फोटोंवर नजर टाकूयात… (फोटो रॉयटर्सवरुन साभार)
-
पॅरिसमधील पुतिनविरोधी मोर्चातील हे पोस्टर ज्यात हिटलर पुतिन यांच्या गालाला हात लावत असल्याचं व्यंगचित्र आंदोलनकर्त्यांनी पोस्टर म्हणून वापरलंय. (येथून पुढील सर्व फोटो एपीवरुन साभार)
-
दक्षिण फ्रान्समधील एका आंदोलनामध्ये युक्रेनवरील बॉम्बचा वर्षाव रोखण्याची मागणी करणारं पोस्टर.
-
मॅक्सिकोमध्ये पुतिन यांना हिटलर म्हणत झळकावण्यात आलेलं पोस्टर.
-
लंडनमधील पुतिन आणि रशियाविरोधी आंदोलनातील हा फोटो.
-
सायप्रस या छोट्याश्या देशामध्येही पुतिनविरोधी आंदोलन करण्यात आलं.
-
ब्राझीलमधील आंदोलनामध्ये शांततेचा संदेश देण्यात आला.
-
भारतामध्येही अहमदाबाद येथे नागरिकांनी सर्व धर्मीयांची प्रार्थना असं पोस्टर झळकावत युद्धाला विरोध केला.
-
पॅरिसमधील आंदोलनामध्ये युक्रेनचा झेंडा झळकावताना एक तरुणी.
-
टर्कीमधील रशियन दुतावासासमोर महिलांनी रशियाविरोधात पोस्टर्स झळकावत आंदोलन केलं.
-
अमेरिकेतील फिलाडेल्फीयामधील रशियाविरोधी आणि युक्रेनसमर्थक रॅलीची झलक.
-
फार उशीर होण्याआधी युक्रेनला मदत कसा अशी मागणी करणारं हे पोस्टर आहे ब्रुसेल्समधील आंदोलनातील.
-
शनिवारी सर्बियामध्ये झालेल्या आंदोलनातील फोटो.
-
लुथेनिया या देशामध्येही पुतिनविरोधी रॅली काढण्यात आली.
-
अमेरिकेतील व्हाइट हाऊसबाहेरही युक्रेन समर्थकांनी एकत्र येऊन रशियाने केलेल्या हल्ल्याचा विरोध केला.
-
युद्धाला विरोध करणाऱ्यांना रशियामधील सेंट पिटर्सबर्ग चौकामधून पोलिसांनी अशाप्रकारे ताब्यात घेतलं.
-
ग्रीसमधील रशियन दुसावासासमोरील आंदोलनातील फोटो ज्यात पुतिन हे नर्कात जळून खाक होतील अशा अर्थाचं पोस्टर आंदोलनकर्त्यांनी पकडलंय.
-
पॅरिसमधील आंदोलनातील पुतिनविरोधी पोस्टर.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख