-
रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन आठवडा उलटल्यानंतरही दोन्ही बाजूने हल्ले प्रतिहल्ले सुरु असून हे युद्धसंकट दिवसोंदिवस गंभीर होत चाललेय.
-
युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी बोलणी करण्यास रशिया तयार आहे, मात्र युक्रेनची लष्करी आधारभूत संरचना नष्ट करण्यासाठीचे आमचे प्रयत्न सुरूच राहतील, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लॅवरॉव्ह यांनी म्हटले आहे.
-
रशियाच्या आक्रमणामुळे १० लाखांहून अधिक लोक युक्रेनमधून बाहेर पडले असून, या शतकातील हे सर्वात जलदगतीने झालेले निर्गमन अ्सल्याचे संयुक्त राष्ट्रांनी गुरुवारी सांगितले.
-
, रशियन फौजांनी युक्रेनमधील दुसऱ्या मोठय़ा शहरावरील आणि सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या दोन बंदरांवरील हल्ले वाढवले आहेत.
-
निर्वासितांची ही संख्या लक्षात घेता, युक्रेनच्या लोकसंख्येपैकी २ टक्क्यांहून अधिक लोकांना गेल्या सात दिवसांत देशाबाहेर पडणे भाग पडले आहे. हे सामूहिक स्थलांतर सुमारे १५ लाख लोकसंख्येच्या खारकिव्ह शहरात नजरेला पडत होते.
-
रणगाडे व इतर वाहने गेले काही दिवस राजधानी किव्हच्या बाहेर थांबलेले असताना, युक्रेनमध्ये अनेक आघाडय़ांवर युद्ध सुरू आहे.
-
थांबवण्याच्या उद्देशाने बोलण्यांची दुसरी फेरी गुरुवारी उशिरा शेजारच्या बेलारूसमध्ये होणे अपेक्षित होते, तथापि दोन्ही देशांकडे त्यासाठी कुठलेही सामायिक मुद्दे नाहीत.
-
या युद्धात रशियाने प्रथमच त्याच्या लष्करी हानीची माहिती देताना, आपले ५०० सैनिक ठार व सुमारे १६०० सैनिक जखमी झाल्याचे सांगितले आहे.
-
युक्रेनने त्याच्या सैन्याचे नुकसान अद्याप जाहीर केले नाही. रशियाने युद्धात त्याचे जवळपास ९ हजार सैनिक गमावल्याचे युक्रेनच्या लष्करप्रमुखांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
-
एकीकडे लष्करी नुकसान होतं असलं तरी दुसरीकडे सर्वसामान्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्यात आलंय.
-
इमारतीच्या इमारती हवाई हल्ल्यांनी उद्धवस्त करण्यात आल्या आहेत.
-
रशियाने मोठ्याप्रमाणात आपला लष्करी फौजफाटा युक्रेनमध्ये पाठवलाय. पण युक्रेनही त्यांना कडवा प्रतिकार करताना दिसतंय.
-
दोन्हीकडील संघर्षामध्ये मधल्यामध्ये सर्वसामान्य माणसं होरपळली जात आहेत.
-
लष्करी कारवायांमध्ये अनेक ठिकाणी अशाप्रकारे जळून किंवा मोडून पडलेल्या वस्तूंचे ढीग युक्रेनमधील शहरांमध्ये दिसतायत.
-
बऱ्याच ठिकाणी घरंही जाळण्यात आली आहेत.
-
रस्त्यावर अनेक ठिकाणी लष्करी वहाने , तोफा जळलेल्या किंवा बंद पडलेल्या अवस्थेत दिसत आहेत.
-
ज्या ठिकाणी बॉम्ब हल्ले झाले त्या जागा तर एखाद्या भंगाराच्या गोडाउनप्रमाणे दिसत आहेत.
-
लाखो लोक युक्रेन सोडून स्थलांतरित झाली असली तर अनेकजण शहर सोडायला तयार नाहीत.
-
युक्रेनमधील जवळजवळ सर्वच शहरांमध्ये आता रस्त्यावर रणगाडे आणि तोफा दिसत आहेत.
-
रशियाने युक्रेनविरोधातील युद्ध सुरु तेव्हा २४ फेब्रुवारीच्या पहाटेच अनेक रणगाडे युक्रेनमध्ये शिरले.
-
वाटेत दिसतील त्या गोष्टी नष्ट करत या रगणाड्यांनी राजधानी किव्हच्या दिशेने वाटचाल सुरु केलीय.
-
युक्रेनच्या सैन्याकडून बंडखोर प्रांतांमधून युक्रेनमध्ये शिरणाऱ्या रशियन लष्कराला फारसा विरोध झाला नाही तरी शहरी भागांमध्ये आल्यावर रशियन लष्कराच्या तुकड्याच गोंधळले्या दिसून आल्या.
-
युक्रेनमधील शहरांतील लष्करी वाहनांचे फोटो सध्या सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.
-
त्याही या वाहनांवर लिहिण्यात आलेली अक्षरं अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
खास करुन इंग्रजीमधील झेड अक्षर असणारी अनेक वाहने या ताफ्यामध्ये दिसत असल्याने हे रशियाचं मिशन झेड असल्याची चर्चाही सोशल मीडियावर रंगल्याचं पहायला मिळालं. मात्र या अक्षरांचा खरा अर्थ आता समोर आलाय. जाणून घेऊयात नक्की काय आहे या अक्षरांचा अर्थ…
-
व्ही या अक्षराचा अर्थ होतो की संबंधित लष्करी वाहन हे रशियन मरिन्स तुकडीचा भाग आहे.
-
झेड हे अक्षर असणारी वाहने रशियन लष्कराच्या पूर्व लष्करी तुकडीतील असतात.
-
चौकोनामध्ये झेड अक्षर असणाऱ्या गाड्याही या युक्रेन युद्धामध्ये अनेकदा दिसून आल्यात.
-
चौकोनामध्ये झेड अक्षर असणाऱ्या गाड्या या दक्षिण लष्करी तुकडीतील असतात.
-
या दोन तुकड्यांमधील बरीची वाहनं युक्रेन युद्धात दिसण्यामागील मुख्य कारण म्हणजे पूर्व आणि दक्षिण भागांमधून युक्रेनमध्ये प्रामुख्याने आक्रमण करण्यात आलंय.
-
चौकोनामधील झेड अक्षरांवाल्या गाड्या क्रिमियाकडील लष्करी तुकडीचा भाग असतात.
-
रशियाने युक्रेनच्या पूर्वेला असणाऱ्या बंडखोर प्रांतांमधून आणि २०१४ साली ताब्यात घेतलेल्या क्रिमीयामधून लष्करी आक्रमण केल्याने या तुकड्यांमधील गाड्या युक्रेन युद्धात मोठ्या प्रमाणात आहेत.
-
ओ अक्षर असणाऱ्या वाहनांचा संबंध बेलारुस सीमेशी आहे.
-
ओ अक्षर असमारी लष्करी वहाने ही बेलारुसच्या बाजूने हल्ला करणाऱ्या लष्करी तुकडीमधील असतात.
-
रशियाने पूर्व आणि दक्षिणेकडून स्वत:च्या तळांवरुन हल्ला केल्याने त्यावर झेड तर बेलारुसच्या मदतीने हल्ला चढवलेल्या गाड्यांवर ओ असं लिहिलं आहे. ओ लिहिलेल्या वाहनांचे प्रमाण तुलनेनं कमी आहे.
-
एक्स अक्षर असणारी वहाने रमाझ काडरोव्ह तुकडीचा भाग असतात.
-
एक्स अक्षर असणाऱ्या तुकड्या या ‘चेचेन स्पेशल फोर्स’म्हणूनही ओळखल्या जातात.
-
‘चेचेन स्पेशल फोर्स’ही तुकडी पुतिन यांनी स्थापन केली आहे. मात्र या तुकडीतील अनेक सैनिकांचा युक्रेनने खात्मा केल्याचा दावा केला जातोय.
याच प्रमाणे ए अक्षर असणाऱ्या गाड्याही रशियन लष्कराच्या तुकडीत आहेत. -
ए अक्षर असणाऱ्या गाड्या या विशेष तुकड्यांच्या असतात. त्यांना वेगवेगळी कामं वाटून दिलेली असतात. म्हणजेच गाड्या, तोफांवरील ही अक्षरं ती वाहने कोणत्या तुकडीतील आहेत हे दर्शवण्यासाठी वापरण्यात आलीयत. (सर्व फोटो : रॉयटर्स, एपीवरुन साभार)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा