-
मेट्रोसह पुण्यातील विविध उपक्रमांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ मार्च रोजी पुणे दौऱ्यावर होते.
-
मोदींच्या हस्ते पुणे महापालिका भवन येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले.
-
पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यानंतर म्हणजे जवळपास ५० वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे महापालिकेला भेट देणारे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत.
-
त्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शिल्पकृती भेट म्हणून देऊ केली.
-
ही शिल्पकृती पुण्याच्या अश्विन कदम यांच्या मड स्टुडिओमध्ये साकारण्यात आली आहे.
-
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अश्विन कदम यांना आकर्षक शिल्पकृती तयार करण्यास सांगितले होते.
-
मुरलीधर मोहोळ आणि त्यांची टीम आमचं सोशल मीडिया पेज पाहून आमच्यापर्यंत पोहोचले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिल्पकृती तयार करण्यास सांगितलं असं मड स्टुडिओचे मालक आणि क्रिएटर अश्विन कदम यांनी सांगितलं.
-
अश्विन कदम यांनी तब्बल २ महिने मेहनत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची शिल्पकृती तयार केली.
-
विशेष म्हणजे या सुंदर शिल्पकृतीवर रत्ने, सोने आणि चांदीचे काम करण्यात आले आहे.
-
छत्रपती शिवाजी महाराजांचे ३२ मन सोन्याचे सिंहासन.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट द्यायची असल्याने याआधी महाराजांची कधीच तयार न झालेली उत्कृष्टअशी शिल्पकृती तयार करण्यास त्यांनी सांगितलं अशी माहिती अश्वीन कदम यांनी दिली.
-
आमच्याकडे फार कमी वेळ होता, पण आपण तयार करत असलेली शिल्पकृती पंतप्रधानांच्या घरी जाणार असल्याने उत्साह वाढला होता असं त्यांनी सांगितलं.
-
शिल्पकृती तयार करण्यासाठी अश्विन कदम आणि त्यांच्या टीमला पूर्ण दोन महिन्यांचा कालावधी लागला.
-
यामधील दोन आठवडे त्यांना चेहऱ्यावरील हावभाव आणि डोळ्यांवर काम करण्यास लागले.
-
ही शिल्पकृती एक मास्टरपीस असून २८ वेगवेगळे भाग वापरण्यात आले. तसंच अत्यंत बारीक गोष्टींवर लक्ष देण्यात आलं असल्याचं अश्विन कदम म्हणाले आहेत.
-
शिल्पकृती सजवण्यासाठी दागिने वापरण्यात आले आहेत. तसंच हाताने शिवलेल्या रेशमी कापडाने तिला सजवण्यात आलं आहे.
-
शिल्पावर वापरलेला रंग हा आयात केलेला उच्च दर्जाचा ऑटोमोटिव्ह रंग आहे, रंगाचा एक थर देखील 24K सोन्याच्या धूळीचा वापर करुन तयार केलेला आहे.
-
अजित पवार, उदयनराजे भोसले, देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या शिल्पकृतीचं कौतुक केलं आहे.
-
पुण्यातील अश्विन कदम हे आकर्षक शिल्पकृती तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
-
कदम यांच्याकडे देश विदेशातून शिल्पकृतीची विशेष मागणी असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : मड स्टुडिओ / फेसबुक)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा