-
गॅरेजमध्ये गाडी दुरुस्तीसाठी गेल्यानंतर नेहमीच मळलेले कपडे आणि हाताला तेल लागलेले मेकॅनिक असं चित्र पहायला मिळतं. मात्र फिलिपाइन्समधील एक महिला मेकॅनिक मॉडेलिंगही करते असं तुम्हाला सांगितल्याच नक्कीच आश्चर्य वाटेल.
-
ही मेकॅनिक फिलिपाइन्समधील असून सोशल मीडियावर तिची सध्या तुफान चर्चा आहे.
-
एकाच वेळेस दोन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या या मेकॅनिकचं नाव आहे टँटिन लेगास्पी मेनेसिस.
-
टँटिन ही स्वत:बद्दल बोलताना, ‘मी जगातील सर्वात सुंदर मेकॅनिक आहे,’ असं सांगते.
-
टँटिन ही स्वत:ला जगातील सर्वात सुंदर मेकॅनिक म्हणत असली तरी ती, “मी पुरुषांपेक्षा गाड्यांमध्ये आणि गाड्यांच्या इंजिन्सबद्दलची अधिक आवड आहे,” असंही आवर्जून सांगते.
-
“वयाच्या दहाव्या वर्षापासूनच मला गाड्यांबद्दल आकर्षण वाटू लागलं,” असं ती गाड्यांबद्दची आवड लहानपणापासूनच असल्याचं सांगताना म्हणते.
-
“मी गाड्या दुरुस्त करण्यासंदर्भातील गोष्टी लहानपणापासूनच शिकून घेण्याचा प्रयत्न करु लागले,” असं टँटिन सांगते.
-
पाच वर्षे इकडून तिकडून पाहून जमेल तसं शिकल्यानंतर वयाच्या १५ व्या वर्षी टँटिनने पहिल्यांदा गॅरेजमध्ये पाऊल ठेवलं.
-
सध्या टँटिन ही २६ वर्षांची असून तिचं गाड्यांबद्दलचं प्रेम कमी झालेलं नाही.
-
अनेकदा टँटिनकडे गाड्या दुरुस्ती करण्यासाठी आलेले ग्राहक तिच्यासोबत आवर्जून फोटो काढतात.
-
अनेकदा टँटिनला लिंगभेदी वक्तव्यांचाही समाना करावा लागतो. मात्र ज्याप्रमाणे तिने बिनधास्त प्रोफेशन निवडलंय तशीच बिनधास्त तिची विचारसणीही आहे.
-
पुरुषांनी केलेल्या वक्तव्यांचा मला फारसा फरक पडत नाही असं टँटिन सांगते. मला जे काम मनापासून आवडतंय ते मी करतेय असंही टँटिन ठामपणे सांगते.
-
पुरुषांच्या नजरांपासून दूर राहण्याला टँटिन पसंती देते. द सनमधील वृत्तानुसार टँटिन ही अनेकदा एकटीनेच काम करायला पसंती देते.
-
पुरुष सहकारी आजूबाजूला असल्यावर टँटिनला अवघडल्यासारखं होतं असं या वृत्तात म्हटलंय.
-
हे क्षेत्र पुरुषांचं वर्चस्व असणारं आहे असं सांगून टँटिनला या क्षेत्रात येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न जवळच्या नातेवाईकांकडून झाला. मात्र तिने ऑटोमोटिव्ह अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. नुकतच टँटिनने स्वत:चं गॅरेज सुरु केलं आहे.
-
टँटिन तिच्या गॅरेजमध्ये एकटीच काम करते. लहानपणापासूनच आपण गाड्यांच्या स्पेअरपार्टशी खेळायचो असंही टँटिन सांगते.
-
आपल्याला या गोष्टी म्हणजेच गाड्यांचे स्पेअरपार्ट्स वगैरे फार कूल वाटतात म्हणून त्याकडे आपण आकर्षित झालो असंही ती म्हणते.
-
पुरुषांचं लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा त्यांची मत्तेदारी मोडण्यासाठी मी या व्यवसायामध्ये आलेली नाही असं टँटिन स्पष्टपणे सांगते.
-
मला हे आवडतं म्हणून मी हे क्षेत्र निवडलं आहे. मला पुरुषांना इग्नोर करायला आता फार छान पद्धतीने जमतंय असंही टँटिन सांगते.
-
तिला कार्सप्रमाणे दुचाकी गाड्यांचीही विशेष आवड आहे.
-
हायस्कूलमध्ये असल्यापासूनच आपण मॅकेनिक होण्याचं ठरवलं होतं असं टँटिन सांगते. मात्र याला तिच्या शिक्षकांचा आणि पालकांचाही विरोध होता.
-
टँटिनला आता फार लोकप्रिय झाली असून तिला मॉडेलिंगच्याही ऑफर येऊ लगाल्यात.
-
सध्या टँटिन गॅरेज आणि मॉडेलिंग अशा दोन्ही गोष्टी एकाच वेळी संभाळतेय.
-
टँटिनचा गॅरेज लूक आणि मॉडेल म्हणून लूक अगदीच वेगळा आहे.
-
गाड्यांशीसंबंधित अनेक मासिकांसाठी आतापर्यंत टँटिनने फोटोशूट केलं आहे.
-
काही कॅलेंडर्स आणि मासिकांमध्ये तिच्या या भन्नाट करियरबद्दल लेखही छापून आलेत.
-
हल्ली अनेक पत्रकार टँटिनची मुलाखत घेण्यासाठी तिच्या गॅरेजला भेट देताना दिसतात.
टँटिनला भटकंतीची फार आवड आहे. टँटिन अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणावरील भटकंतीचे फोटो पोस्ट करत असते. -
भटकंतीला गेल्यानंतरही वेळ मिळेल तशी टँटिन आवर्जून गाड्या तर चालवतेच पण त्याचप्रमाणे भटकंतीचे फोटोही फॉलोअर्ससाठी पोस्ट करत असते.
-
मॉडेलिंग करायला लागल्यापासून टँटिन तिच्या इन्स्टाग्रामवरुन स्वत:चे मादक फोटोही पोस्ट करत असते.
इन्स्टाग्रामवर टँटिनचे १२ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. -
मिळालेली प्रसिद्धी आणि मॉडेलिंगमुळे टँटिनची आर्थिक परिस्थितीला हातभार लागतोय ही यामधील जमेची बाजू आहे. (सर्व फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)
महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन