-
जगभरातील देशांना कोरोना महामारीच्या विळख्यात आणणाऱ्या चीनमध्ये सध्या या संसर्गाने कहर केला आहे. चीनमध्ये गेल्या दोन वर्षांतील सर्वांत मोठी रुग्णवाढ पाहायला मिळत आहे. (Photo : Reuters)
-
शनिवारी चीनमध्ये कोरोना विषाणूच्या दैनंदिन प्रकरणांची नोंद झाली, जी दोन वर्षांतील सर्वाधिक संख्या आहे. (Photo : ANI)
-
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुमारे दोन हजार नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यामध्ये राजधानी बीजिंगमध्ये २० लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. (Photo : AP)
-
त्याच वेळी, रविवारी चीनमध्ये विक्रमी ३,३९३ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. चीनमध्ये जवळपास दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच कोरोना संसर्गाची ३३०० हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. (Photo : AP)
-
नॅशनल हेल्थ कमिशनच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी २०२० नंतर संसर्गाचा हा सर्वात मोठा दैनिक आकडा आहे. (Photo : Reuters)
-
चीनच्या जिलीन प्रांताची राजधानी चांगचूनमध्ये शुक्रवारपासूनच लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. अशात शहरातील ९० लाख लोकांना आपत्कालीन अलर्टनंतर घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Photo : AP)
-
शेडोंग प्रांतातील जवळपास ५ लाख लोकसंख्या असलेल्या युचेंगमध्ये देखील लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. (Photo : AP)
-
मिळालेल्या माहितीनुसार, जिनपिंग सरकारने दक्षिण चीनच्या टेक्नॉलॉजिकल हब शेन्झेनमध्ये १४ मार्चपासून कडक लॉकडाउन जारी केले आहे. यामुळे शहरातील जवळपास १,७०,००,००० लोक आपल्या घरातच बंदिस्त असतील. (Photo : AP)
-
यामुळे चीनमधील एकूण ३ शहरे लॉकडाउनमध्ये असून २,६५,००,००० लोकांना आपल्या घरात बंदिस्त राहावे लागणार आहे. (Photo : Indian Express File Photo)
-
शेन्झेन हे शहर हाँगकाँगच्या सीमेला लागून आहे, जिथे आधीच मोठ्या संख्येने लोकांना करोनाची लागण झाली आहे. (Photo : AP)
-
हाँगकाँगमध्ये अधिकाऱ्यांनी करोनाविषाणूच्या २७,६४७ नव्या प्रकरणांची पुष्टी केली आहे. यामुळे येथील परिस्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे असे दिसत आहे. (Photo : Reuters)
-
हाँगकाँगमध्ये आणखी ८७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यानंतर संसर्गामुळे मृतांची संख्या ३,७२९ झाली आहे. (Photo : Reuters)
-
शांघायमध्ये शाळा-उद्याने बंद करण्यात आली असून बीजिंगमध्ये निवासी भागात प्रवेशावर बंदी घालण्यात आली. (Photo : AP)
-
नवीन प्रकरणे प्राप्त झाल्यानंतर, बीजिंगमधील प्रशासनाने लोकांना घराबाहेर न पडण्यास सांगितले आहे. (Photo : AP)
-
अगदी अत्यावश्यकतेशिवाय शहराबाहेर न जाण्याच्या सूचनाही लोकांना देण्यात आल्या आहेत. (Photo : Reuters)

‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral