-
रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असणाऱ्या युद्धादरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सध्या जगभरामध्ये चर्चेत आहेत.
-
पुतिन यांच्यासोबत सध्या त्यांच्या एका सिक्रेट प्रेयसीची सध्या जगभरामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.
-
पुतिन यांच्या या कथित प्रेयसीचं नाव आहे अलीना काबेवा.
-
युक्रेनविरुद्धच्या युद्धादरम्यान पुतिन यांची कथित प्रेयसी आणि माजी जिमनॅस्टिकपटू अलीना काबेवा भूमिगत झाली आहे.
-
काही वृत्तपत्रांनी दिलेल्या बातम्यांनुसार सध्या अलीना ही स्वित्झर्लंडमध्ये लपल्याचं सांगितलं जातं आहे.
-
असं असतानाच आता बेलारुसमधील जवळजवळ ५९ हजार लोकांनी अलीनाला शोधण्याच्या मागणीसाठी मोहीम सुरु केलीय.
-
ऑनलाइन अर्ज भरण्याच्या या मोहिमेअंतर्गत अलीना ही स्वित्झर्लंडमध्ये लपली असेल तर तिला देशामधून बाहेर कढावं अशी मागणी केली जात आहे.
-
अलिना ही एक रशियन राजकारणी, प्रसारमाध्यम व्यवस्थापक आणि निवृत्त रिदमिक जिमनॅस्ट म्हणून ओळखली जाते.
-
रशियामधील नामवंत, प्रतिष्ठित व्यक्तींच्या यादीमध्ये अलिनाचा समावेश होतो.
-
रशियामधील सर्वात यशस्वी जिमनॅस्ट म्हणून अलीनाचं नाव घेतलं जातं.
-
अलीनाने तिच्या लक्ष्यवेधी करियरदरम्यान दोन ऑलिम्पिक पदकं, १४ वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि २१ युरोपियन चॅम्पियनशिप पदकं जिंकली आहेत.
-
द गार्डियनसारख्या अनेक वृत्तपत्रांनी अलीना ही पुतिन यांची प्रेयसी असल्याचा दावा केलाय.
-
मात्र पुतिन यांनी सार्वजनिक जीवनामध्ये अलीनासोबत आपलं नातं असल्याची गोष्ट मान्य केलेलं नाही.
-
अलिना ही तिच्या तीन मुलांसहीत राहत असल्याचं सांगितलं जातंय.
-
अलिना एका आलिशान बंगल्यामध्ये राहत असल्याचं रशियन टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.
-
बेलारुसमधील नागरिकांनी सुरु केलेल्या ऑनलाइन मोहिमेदरम्यान अलिनाला शोधण्यासाठी आतापर्यंत ५९ हजारांहून अधिक लोकांनी पाठिंबा दर्शवलाय. यामध्ये बेलारुसबरोबरच युक्रेन आणि रशियन नागरिकांचाही समावेश आहे.
-
अलीनाला स्वित्झर्लंडमधून बाहेर काढण्यात यावं अशी या लोकांनी मागणी आहे. तिला आणि तिच्या प्रियकराला भेटण्याची संधी द्यावी तिला देशातून बाहेर काढावं असा उपरोधिक उल्लेखही या ऑनलाइन अर्जात आहे.
-
अलिना ही सध्या ३८ वर्षांची असून मागील सात ते आठ वर्षांपासून तिचं नाव पुतिन यांच्याशी जोडलं जात आहे.
-
अलिना ही रशियामधील सर्वात लवचिक महिला म्हणूनही ओळखली जाते.
-
अलिना पुतिन यांच्या यूनायडेट रशिया पक्षाकडून खासदारही राहिली आहे.
-
पुतिन यांनी त्यांच्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्यांचं नाव अलीनाच्या नावाशी जोडलं जाऊ लागलं.
-
पुतिन यांच्याशी नाव जोडलं जाण्याच्या आधापासूनच अलीना ही क्रीडा क्षेत्रातील तिच्या कामगिरीमुळे रशियामधील लोकप्रिय चेहरा होती.
-
अलीनाला युक्रेनमधील युद्धाच्या कालावधीमध्ये सुरक्षितस्थळी हलवण्याच्या दृष्टीने स्वित्झर्लंडमध्ये पाठवण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर ही मोहीम सुरु करण्यात आलीय.
-
अलीना ही रशियन सरकारच्या राष्ट्रीय प्रसारमाध्यम समुहाच्या कार्यकारी मंडळाची अध्यक्ष राहिली आहे.
-
रशियामधील सर्वाधिक चर्चेत असलेला चेहरा म्हणून अलीनाला प्रसारमाध्यमांमध्ये ओळखलं जातं.
-
ऑनलाइन मोहिमेमध्ये अलिनासंदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार स्वित्झर्लंडने पुतिन यांच्या या खास पाहुण्यांना आश्रय दिलाय. याच अर्जामध्ये अलिनाचा उल्लेख इवा ब्रॉन असा करण्यात आलाय. इवा ब्रॉन ही हिटलरची जोडीदार होती. म्हणजेच या ऑनलाइन अर्जामध्ये पुतिन यांच्या कथित प्रेयसीची हिटलरच्या कथित पत्नीसोबत तुलना करण्यात आलीय.
-
क्रीडा, राजकारण, फॅशन अशा सर्वाच क्षेत्रांमध्ये अलीनाचा वावर आहे.
-
‘द डेली मेल’च्या वृत्तानुसार दरवर्षी अलीनाला ८ मिलियन यूरो इतका पगार दिला जातो.
-
२०२१ मध्ये डिसेंबर महिन्यात अलीना सार्वजनिक जीवनामध्ये शेवटची दिसली होती.
-
त्यानंतर अलिना कुठे आहे काय करते याची माहिती गुप्त ठेवली जात आहे. (सर्व फोटो रॉयटर्स आणि ट्विटरवरुन साभार)

लोकांच्या जीवाशी खेळ! कलिंगड विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल