-
रशिया आणि युक्रेन या दोन देशादरम्यानचं युद्ध एक महिना उलटूनही सुरूच आहे.
-
२४ फेब्रुवारी रोजी रशियानं युक्रेनवर आक्रमण केलं आणि युद्धाला सुरुवात झाली.
-
हे युद्ध थांबावं, यासाठी दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरू आहे. परंतु अद्याप तोडगा निघालेला नाही.
-
रशिया आणि युक्रेनच्या युद्धामागचं कारण नाटो आहे. नाटो (NATO) म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. (फोटो सौजन्य -AP)
-
नाटो ही एक लष्करी संघटना असून १९४९ मध्ये बारा देशांनी या संघटनेची स्थापना केली होती. कोणत्याही एका सदस्य देशावर सशस्त्र हल्ला झाल्यास इतर जण मदतीला येतील, या उद्देशानं नाटोची स्थापना झाली होती.(Photo : Reuters)
-
युक्रेननं नाटोमध्ये जाण्याची तयारी सुरू केल्यानंतर रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष वाढत गेला.(Photo : Reuters)
-
युक्रेन हा नाटोचा सदस्य देश नसला तरी तो ‘भागीदार देश’ आहे. याचाच अर्थ भविष्यात केव्हाही युक्रेन नाटोचा सदस्य होऊ शकतो. (Photo : Reuters)
-
रशियाला याच गोष्टीचा आक्षेप आहे. त्यामुळे चिघळलेल्या वादाचं रुपांतर युद्धात झालं.
-
गेल्या महिनाभरात या युद्धात फक्त युक्रेनच नाही तर रशियाचं पण मोठं नुकसान झालंय.
-
हजारो रशियन सैनिक मारले गेले असून अनेक पाश्चात्य देशांनी रशियावर आर्थिक आणि आयात-निर्यातीचे निर्बंध लादले आहेत.
-
या युद्धात एकीकडे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की हिरो ठरले, तर दुसरीकडे रशियाचे अध्यक्ष पुतिन व्हिलन ठरले आहेत. पाहुयात याच व्हिलन ठरलेल्या पुतिन यांची गोष्ट..(Photo – AP)
-
व्लादिमिर पुतिन यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९५२ रोजी रशियाच्या सेंट पिटसबर्ग इथं झाला.
-
त्यांच्या वडिलांचं नाव व्लादिमिरोविच पुतिन आणि आईचं नाव मारिया पुतिन होतं. त्यांचे वडील सोव्हिएत नेव्हीमध्ये होते. तर आई एका फॅक्ट्रीमध्ये मजूर होती.
-
पुतिन यांच्या वडिलांनी दुसऱ्या महायुद्धात अॅम्बश स्क्वाडमध्ये काम केले होते. युद्ध संपल्यानंतर ते एका कारखान्यात काम करायचे.
-
पुतिन हे त्यांच्या कुटुंबातील तिसरे अपत्य होते. मात्र, त्यांच्या दोन्ही मोठ्या भावाचा मृत्यू झाला होता.
-
पुतिन यांनी लेनिनग्राड स्टेट युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केले. १९७५ मध्ये त्यांनी बॅचलर पदवी प्राप्त केली, त्यानंतर त्यांनी सोव्हिएत युनियनच्या गुप्तचर संस्थेसाठी काम करण्यास सुरुवात केली. पुतिन यांचा हा प्रवास १९९१ पर्यंत चालला.
-
दरम्यान, व्लादिमीर पुतिन यांच्यावर पुस्तक लिहिणारे लेखक माशा गेसन यांनी त्यांच्या “मॅन विदाऊट अ फेस, द अनलाइकली राईज ऑफ व्लादिमीर पुतिन” या पुस्तकात लिहिले आहे की, “वयाच्या २३ व्या वर्षी केजीबीमध्ये सामील झालेल्या पुतिनच्या अनेक हेरगिरीच्या कथा त्यांच्या समर्थकांनी सांगितल्या आहेत, परंतु काहींच्या मते पूर्व जर्मनीत पुतिन यांचे काम केवळ प्रेस क्लिपिंग गोळा करणे आणि स्थानिक माध्यमांवर नजर ठेवणे हे होते, त्यांना कोणतीही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली नव्हती.
-
१९९० च्या दशकात, सेंट पीटर्सबर्गमध्ये आल्यानंतर पुतिन यांनी महापालिकेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. याठिकाणी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यांची चौकशी झाली आणि ते खरे सिद्ध झाले, परंतु सेंट पीटर्सबर्गच्या तत्कालीन महापौरांशी चांगले संबंध असल्याने ते बचावले.
-
पुतिन यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात १९९६ मध्ये लेनिनग्राडचे महापौर म्हणून झाली.
-
त्यानंतर १९९७ मध्ये तत्कालीन रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्तसिन यांनी पुतिन यांना रशियाचे पंतप्रधान केले.
-
त्यानंतर जेव्हा येल्त्सिन यांनी अचानकपणे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा पुतिन कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष बनले. या पदावर आल्यानंतर पुतिन यांनी येल्तसिन यांच्यावरील सर्व भ्रष्टाचाराच्या आरोपातून त्यांची मुक्तता केली.
-
२००० मध्ये पुतिन ५३ टक्के मतांनी रशियाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांच्या विजयात त्यांच्या ‘इमेज’चा मोठा वाटा होता. कायदा आणि सुव्यवस्थेचे उमेदवार म्हणून पुतिन त्यांच्या बाकीच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वेगळे ठरले होते.
-
हा तो काळ होता, जेव्हा रशियात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत होता. अशा परिस्थितीत देशवासीयांना पुतिन यांच्यामध्ये आशेचा किरण दिसला आणि तेही या अपेक्षेवर खरे उतरले. त्यांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले.
-
देशाला आर्थिकदृष्ट्या चांगले दिवस दिसल्याने पुतिन यांच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली. त्याचा परिणाम असा झाला की २००४ मध्ये लोकांनी त्यांना पुन्हा नेता म्हणून निवडले.
-
अमेरिकेप्रमाणे रशियातही एकच व्यक्ती सलग तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवडला जाऊ शकत नाही. त्यामुळे दिमित्री मेदवेदेव देशाचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी पुतिन यांची पंतप्रधान म्हणून निवड केली.
-
मेदवेदेव हे केवळ नामधारी अध्यक्ष होते आणि देशाची कमान प्रत्यक्षात पुतिन यांच्या हातात होती, असं म्हटलं जातं.
-
मेदवेदेव यांच्या काळात पुढील निवडणुकीपासून राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाळ चार ऐवजी सहा वर्षांचा असेल अशी घोषणा करण्यात आली.
-
त्यानंतर २०१२ मध्ये पुतिन पुन्हा सहा वर्षांसाठी अध्यक्ष झाले. यावेळी त्यांनी मेदवेदेव यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली.
-
२०१८ मध्ये पुतिन पुन्हा एकदा सत्तेवर आले. त्यावेळी त्यांना विक्रमी ७५ टक्के मत मिळाली. त्यांच्यासमोर कोणताही प्रबळ विरोधक नव्हता, त्यामुळे ते निवडून आले आणि सत्तेत आहेत.
-
राष्ट्राध्यक्ष असण्याव्यतिरिक्त, पुतिन हे गुप्तहेर, मार्शल आर्ट मास्टर, नेमबाज, बाइकर, गिर्यारोहक आणि घोडेस्वार आहेत.
-
पुतिन फिटनेसवर खूप लक्ष देतात.
-
ते ज्युदोमध्ये ब्लॅक बेल्ट आहेत. मात्र, या युद्धाच्या काळात जागतिक तायक्वांदो संघटनेने ‘विजयापेक्षा शांतता अधिक महत्त्वाची’ असल्याचं सांगत पुतिन यांच्यावर कारवाई केली आणि त्यांचा ब्लॅक बेल्ट काढून घेतला.
-
पुतिन यांना रशियन भाषेशिवाय जर्मन भाषेचेही ज्ञान असून त्यांना संगीत आवडतं.
-
या युद्धाच्या काळात पुतिन त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहीले.
-
पुतिन यांचे पहिले लग्न १९८३ मध्ये फ्लाइट अटेंडंट ल्युडमिला श्क्रेबनेव्ह यांच्यासोबत झाले होते. तेव्हा ३० वर्षीय पुतिन हे केजीबी एजंट होते. त्यावेळी ल्युडमिला २५ वर्षांच्या होत्या. मात्र, त्यांच्या वैवाहिक जीवनात कलह झाला. त्यानंतर ल्युडमिलाने पुतिन यांच्यावर मारहाण केल्याचा आरोपही केला. तसेच त्यांचे अनेक प्रेमप्रकरण असल्याचं ही त्या म्हणाल्या होत्या.
-
पुतिन आणि ल्युडमिला यांना दोन मुली आहेत. एकीचे नाव मारिया पुतिन आणि दुसरीचे नाव येकातेरिना पुतिन. २०१३ मध्ये पुतिन आणि ल्युडमिला अधिकृतपणे एकमेकांपासून वेगळे झाले.
-
त्यानंतर पुतिन यांच्या कथित गर्लफ्रेंडबाबतही अनेक बातम्या ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केल्या आहेत.
-
गेल्या दशकापासून, पुतिन यांचे नाव ३८ वर्षीय अलिना काबाएवाशी जोडले गेले आहे. ती ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती देखील आहे.
-
अलिना ही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या जुळ्या मुलांची आई असल्याचंही म्हटलं जातं.
-
२००८ साली पुतिन यांचे नाव पहिल्यांदा अलिनासोबत जोडले गेले होते. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर अलिना हिला ‘फर्स्ट लेडी ऑफ रशिया’ म्हटले जाऊ लागले.
-
दोघांनीही जाहीररित्या या गोष्टीला नकार दिला असला तरीही त्यांच्या नात्याच्या अफवा थांबल्या नाहीत. दोघांचा साखरपुडा आणि नंतर लग्न झाल्याचं बोललं जात होतं.
-
अलिना काबाएवा ही एक रशियन राजकारणी, मीडिया मॅनेजर आणि निवृत्त रिदमिक जिम्नॅस्ट आहे.
-
दरम्यान, या युद्धामुळे पुतिन यांची मोठी मुलगी डॉ. मारिया वोरोत्सोवाचा घटस्फोट झालाय.
-
पुतिन यांची मुलगी डॉ. मारिया वोरोंत्सोवा आता तिचा डच उद्योगपती पती जोरीट फासेनपासून विभक्त झाली आहे आणि दोघांचा घटस्फोट झाला आहे.
-
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची मुलगी डॉ. मारिया वोरोंत्सोवा, ही लहान मुलांमधील दुर्मिळ अनुवांशिक रोगांची विशेषज्ञ आहे.
-
(पुतिन यांचे सर्व फोटो इंडियन एक्सप्रेसवरून साभार, तर युद्ध आणि इतर सर्व फोटो रॉयटर्स आणि ट्विटरवरुन साभार))

“आमची मान शरमेने खाली…”, तनिशा भिसेंच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय; यापुढे डिपॉझिट…