-
शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं व्यक्तिमत्व मानले जातात. अनेकदा आपल्या राजकीय विधानांमुळे ते सोशल मीडियावर चर्चेत असतात.
-
पण सध्या शरद पवार यांची चर्चा एका वेगळ्याच कारणामुळे होताना दिसतेय.
-
शरद पवार यांचा नातू आणि अजित पवार यांचा मुलगा जय पवार याचा लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबतचा एक फोटो व्हायरल झाला आहे.
-
उर्वशी आणि जय पवार यांचा तो फोटो ‘cine riser official’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
-
व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये उर्वशी, जयसोबत आणखी एक व्यक्ती आहे. हा दुबईतील व्यावसायिक आहे.
-
तो फोटो दुबईच्या बुर्ज-अल-अरब येथील असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
-
सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. हा फोटो नेमका कधीचा आहे? जय उर्वशीला डेट तर करत नाही ना? असे प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले होते.
-
जय हे बारामतीतील राजकारणात विशेष सक्रीय होते.
-
जय सोशल मीडियावरही सक्रिय असतात.
-
अजित पवार यांचे ज्येष्ठ पूत्र पार्थ पवार यांच्यासह राजकारणात काम करताना. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होताना दिसतात.
-
असं असलं तरी त्यांनी भविष्यात निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे सांगितले होते.
-
२०१९ मध्ये बारामती विधानसभा निवडणूकीसाठी अवघं पवार कुटुंब पिंपरी-चिंचवड शहरात ठाण मांडून बसले होते.
-
यावेळी त्यांच्या राजकारणाती पदार्पणावर जय म्हणाले होते, “बऱ्याचवेळा त्यांच्या राजकारणाच्या प्रवेशाची चर्चा सुरु असते. जरी त्यांनी राजकारणात पदार्पण केले तरी ते पक्षाचं कोणतं तरी पद घेऊन सामान्य माणसांसाठी काम करतील.”
-
पण ते कोणतीही निवडणूक लढविणार नाही.
-
तर आजोबा शरद पवार आणि वडील अजित पवार यांच्यापेक्षा वेगळी वाट जय निवडणार अशी चर्चा त्यावेळी चांगलीच रंगली होती. (All Photo Credit : Jay Pawar Facebook and Instagram)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य