-
रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असणाऱ्या युद्धादरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सध्या जगभरामध्ये चर्चेत आहेत.
-
पुतिन यांच्यासोबत सध्या त्यांच्या एका सिक्रेट प्रेयसीची सध्या जगभरामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.
-
युक्रेनविरुद्धच्या युद्धादरम्यान पुतिन यांची कथित प्रेयसी आणि माजी जिमनॅस्टिकपटू अलीना काबेवाची चांगलीच चर्चा झाली होती.
-
पण २०१६ मध्ये एका २३ वर्षीय मुलीसोबत पुतिन यांचं अफेअर असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या…जाणून घेऊया कोण होती ती..
-
मीडिया टायकून रुपर्ट मर्डोकची माजी पत्नी वेंडी डेंग यांच्यानंतर, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन याचं नाव रशियन कॅलेंडर गर्ल आणि त्यांच्यापेक्षा ४० वर्षांनी लहान मॉडेल एलिसा खारशेवाशी जोडले गेले होते. ब्रिटिश वेबसाईट डेलीमेलच्या रिपोर्टमध्ये याबाबत दावा करण्यात आला होता.
-
तेव्हा एलिसाने रशियातील सर्वात आलिशान भागात एक फ्लॅट खरेदी केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा फ्लॅट बिझनेसमन ग्रेगरी बेयेव्स्कीचा होता.
-
पुतीन यांच्या कथित गर्लफ्रेंड आणि राष्ट्राध्यक्षांच्या धाकट्या मुलीच्या कुटुंबीयांसाठी फ्लॅट खरेदी करण्यात उद्योगपती ग्रेगरी यांचे नाव पुढे आले होते.
-
एलिसासाठी फ्लॅट खरेदी करणारा व्यावसायिक पुतिनचा मित्र आणि ज्युडो पार्टनर असल्याचं म्हटलं जातं.
-
एलिसा तीच मॉडेल आहे जिने २०१२ मध्ये पुतिन यांना त्यांच्या वाढदिवसाला एक मांजर भेट दिली होती. त्यावेळी एलिसाने पुतीन यांच्या नेतृत्व क्षमतेचे कौतुकही केले होते.
-
२३ वर्षीय अॅलिसा तेव्हा प्रसिद्धीच्या झोतात आली जेव्हा ती राष्ट्रपतींना समर्पित कॅलेंडरमध्ये मिस एप्रिल म्हणून पब्लिश झाली होती
-
एलिसा पत्रकारितेची माजी विद्यार्थिनी आणि मिस रशिया फायनल देखील राहिली आहे.
-
त्यापूर्वी पुतिन यांचे नाव वेंडी डेंग यांच्यासोबतही जोडले गेले होते. वेंडी मर्डोकच्या पुर्वाश्रमीची पत्नी आहे. मर्डोक यांचे तिसरे लग्न वेंडी डेंगशी झाले होते.
-
रुपर्ट मर्डोक आणि डेंग २०१४ मध्ये विभक्त झाले होते.
-
पुतिन आणि डेंग कधीही एकमेकांसोबत दिसले नाही. मात्र, त्यांच्या अफेअरची जोरदार चर्चा होती.
-
हॅकिंग प्रकरणात अडकल्यानंतर मर्डोक संसदेत आपल्या निर्दोषतेचे पुरावे सादर करत असताना वेंग आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.
-
पुतिन यांचे पहिले लग्न १९८३ मध्ये फ्लाइट अटेंडंट ल्युडमिला श्क्रेबनेव्ह यांच्यासोबत झाले होते. तेव्हा ३० वर्षीय पुतिन हे केजीबी एजंट होते. त्यावेळी ल्युडमिला २५ वर्षांच्या होत्या. मात्र, त्यांच्या वैवाहिक जीवनात कलह झाला. त्यानंतर ल्युडमिलाने पुतिन यांच्यावर मारहाण केल्याचा आरोपही केला. तसेच त्यांचे अनेक प्रेमप्रकरण असल्याचं ही त्या म्हणाल्या होत्या.
-
पुतिन आणि ल्युडमिला यांना दोन मुली आहेत. एकीचे नाव मारिया पुतिन आणि दुसरीचे नाव येकातेरिना पुतिन. २०१३ मध्ये पुतिन आणि ल्युडमिला अधिकृतपणे एकमेकांपासून वेगळे झाले.
-
तेव्हापासून आतापर्यंत अनेक महिलांसोबत पुतिन यांच्या अफेअरची चर्चा रंगली आहे. (फोटो – संग्रहित आणि सोशल मीडियावरून साभार)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”